शिक्षण अधिकार कायदा – 2009

शिक्षण अधिकार कायदा – 2009

 

  1. 1 एप्रिल, 2010 पासून अंमलबजावणी सुरू.
  2. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण-बालकाचा मूलभूत अधिकार.
  3. प्रत्येक बालकास शाळेत आणणे, टिकविणे, त्यास, गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देणे.
  4. शाळेत कधीच न आलेल्या व शाळेतून गळती झालेल्या बालकांना शाळेत आणणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे.
  5. वयानुरूप योग्य इयत्तेत प्रवेश देऊन विशेष शिक्षणाव्दारे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे-शिक्षक व शाळांची जबाबदारी.
  6. कोणत्याही बालकास इयत्ता 8 वी पर्यंत नापास करता येणार नाही.
  7. बालकाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकता येणार नाही.
  8. समाधानकारक प्रगती नसलेल्या विषयांचे विशेष शिक्षण देऊन बालकाला अपेक्षित पातळीपर्यंत आणणे.
  9. अपंग बालकाला वयाची 18 वर्ष पूर्ण करेपर्यंत मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे.
  10. बालकास शाळेत दाखल करणे हे प्रत्येक माता-पित्याचे/पालकाचे कर्तव्य.
  11. प्रवेशासाठी बालक/ पालकांचा मुलाखत/ परीक्षेस प्रतिबंध, प्रवेशासाठी देणगी/ शूल्कास प्रतिबंध.
  12. प्रवेशासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब.
  13. शाळांनी बालकांना इयत्ता 8 वी पर्यंत नापास करून त्याच वर्गात ठेवल्यास, प्रवेश नकारल्यास शाळांवर कठोर कारवाई.
  14. अनाधिकृत शाळांवर दंडात्मक कठोर कारवाई.
You might also like
1 Comment
  1. मंगनाळे माधव says

    नववा वर्गातील मुलींना परीक्षा नाही दिली तर पास करता येईल काय?

Leave A Reply

Your email address will not be published.