Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Nobel Prize 2015 Complete Information

Nobel Prize 2015 Complete Information

 वैद्यकशास्त्रातील नोबेल 2015 :

 • मानवी शरीरामध्ये असलेल्या परजीवी कृमींवर उपचार शोधून काढणारे आर्यलडचे विल्यम कॅम्पबेल, जपानचे सातोशी ओमुरा आणि चीनच्या श्रीमती योउयू तू यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल यंदाच्या वर्षी (2015) जाहीर करण्यात आले आहे.
 • साडेनऊ लाख अमेरिकी डॉलर आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • ओमुरा आणि कॅम्पबेल यांनी परजीवींमार्फत होणारे संक्रमण रोखण्यासाठी उपचारपद्धती विकसित केली, तर युयु तू यांनी मलेरियावरील नव्या उपचारांवर संशोधन केले आहे.

युयु तू-

 • मलेरियासाठी तयार करण्यात आलेल्या आर्टेमिसाईनिन आणि हायड्रोआर्टेमिसाईनिन या औषधांची निर्मिती युयु तू यांनी केली आहे. या औषधांमुळे दक्षिण आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील लोकांच्या आरोग्यात प्रचंड सुधारणा झाली.
 • विसाव्या शतकातील महत्त्वाच्या संशोधनांमध्ये तू यांच्या संशोधनाचा समावेश केला जातो. यासाठीच त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात येत आहे. तू यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल 2011 मध्ये लॅस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. विशेष म्हणजे चीनमधील पारंपरिक औषधी वनस्पतींच्या आधाराने त्यांनी संशोधन केले.
 • चिनी संशोधक असलेल्या यांनी बीजिंग वैद्यकीय विद्यापीठातून 1955 मध्ये पदवी मिळविली. त्या 1965 पासून 1978 पर्यंत चायना ऍकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये सहायक प्राध्यापक होत्या. त्यानंतर 2000 पासून त्या त्याच संस्थेत मुख्य प्राध्यापक आहेत.

ओमुरा-

 • ओमुरा हे बायोकेमिस्ट आहेत. त्यांनी व कॅम्पबेल यांनी परजीवींपासून होणारे संक्रमण रोखण्यासाठी औषधांमध्ये सूक्ष्मजीवांचा (मायक्रोऑरग्यानिजम) वापर करण्याची पद्धती विकसित केली.
 • ‘रिव्हर ब्लाइंडनेस’ (नदी पात्रात वाढणाऱ्या काळ्या माशा चावल्याने येऊ शकणारे अंधत्व) आणि ‘लिंफॅटिक फिलारिऍसिस’ या दोन रोगांवरील औषधे तयार करण्यासाठीची पद्धती त्यांनी विकसित केली.
 • टोकियो विद्यापीठातून फार्मास्युटिकल सायन्समध्ये पीएचडी मिळविणारे सतोशी ओमुरा यांनी 1965 ते 1971 या कालावधीत किटासातो इन्स्टिट्यूटमध्ये काम केले, तसेच किटासातो विद्यापीठात 1975 ते 2007 पर्यंत प्राध्यापकपदी काम केले. सध्या ते तेथेच मानद प्राध्यापक आहेत.

कॅम्पबेल-

 • कॅम्पबेल यांचा जन्म 1930 मध्ये झाला. त्यांनी ट्रिनिटी कॉलेजमधून ‘बीए’ची पदवी मिळविली.

 

 • विस्कॉन्सिन्स विद्यापीठातून त्यांनी 1957 मध्ये ‘पीएचडी’ पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी 1957 ते 1990 या कालावधीत मर्क इन्स्टिट्यूट फॉर थेरॅप्युटिक रिसर्चमध्ये काम केले.

 

 • सध्या ते अमेरिकेतील ड्रू विद्यापीठात ‘रिसर्च फेलो एमिरेट्‌स’ आहेत.

 भौतिकशास्त्रातील नोबेल 2015 :

 • न्यूट्रिनों कणांविषयी सखोल ज्ञान देणाऱ्या संशोधनासाठी जपानचे ताकाकी काजिता व कॅनडाचे आर्थर मॅकडोनल्ड यांना यंदा भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.
 • न्यूट्रिनो कणांचे गुणधर्म रंग बदलणाऱ्या थॉमेलिऑन सरडय़ासारखे बदलत असतात व त्यांचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत असते, असे या अभ्यासकांनी संशोधनाद्वारे दाखवून दिले.
 • काजिता व मॅकडोनल्ड यांनी अनुक्रमे सुपर कामियोकँडे डिटेक्टर (जपान) व सडबरी न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी (कॅनडा) येथे संशोधन केले आहे.
 • विजेत्यांना 80 लाख क्रोनर म्हणजे 9 लाख 60 हजार अमेरिकी डॉलर्स विभागून मिळणार आहेत.

ताकाकी काजिता-

 • काजिता (वय 56) हे टोकियो विद्यापीठात प्राध्यापक असून ‘इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्मिक रे रीसर्च’ या संस्थेचे संचालक आहेत.
 • 1998 मध्ये काजिता यांनी न्यूट्रिनो कण पकडले होते व वातावरणामध्ये त्यांच्यावर होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला होता.
 • 2002 मधील नोबेल विजेते मासतोशी कोशिबा यांचे विद्यार्थी आहेत. कोशिबा यांचे संशोधनही न्यूट्रिनोवरच आहे.

आर्थर मॅकडोनल्ड-

 • मॅक्‌डोनाल्ड (72) हे कॅनडातील किंग्स्टनमधील क्विन्स विद्यापीठात ‘प्रार्टिकल फिजिक्‍स’ चे प्राध्यापक आहेत.

 रसायनशास्त्रातील नोबेल 2015 :

 • ‘गुणसूत्रांतील दुरुस्तीचा तांत्रिक अभ्यास’ याविषयीच्या संशोधनासाठी स्वीडनचे संशोधक थॉमस लिंडाल, अमेरिकेचे पॉल मॉड्रीच व अमेरिकन-तुर्कीश शास्त्रज्ञ अझीज सॅंसर यांना या वर्षीचा रसायनशास्त्रातील ‘नोबेल’ पारितोषिक जाहीर झाला.
 • या तीनही शास्त्रज्ञांना तब्बल 80 लाख स्वीडिश क्रोनर (साडेनऊ लाख डॉलर) पुरस्कार स्वरूपात मिळणार आहेत.

लिंडाल-

 • हे फ्रान्सिस क्रीक इन्स्टिट्यूट या संस्थेचे प्रमुख व ब्रिटनस्थित क्‍लॅरे हॉल लॅबोरेटरीमधील कर्करोग संशोधन विभागाचे संचालक म्हणून ते काम पाहत आहेत.

मॉड्री-

 • हे सध्या हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक असून, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना प्रांतातील ड्युरहॅममधील ड्यूक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडीसीन येथे ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
 • मॉड्रिच यांनी डीएनए शिवण्याची प्रक्रिया शोधून काढली आहे.

सॅंसर-

 • नॉर्थ कॅरोलीना प्रातांतील चॅपेल हिल भागातील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये सॅंसर (69) प्राध्यापक आहेत.
 • तुर्कीतील सावूर येथे जन्मलेले सँकार यांनी अतिनील किरणांनी डीएनएची जी हानी होते ती दुरुस्त करण्याची यंत्रणा शोधून काढली आहे.

 अलेक्‍सिविच यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक :

 • बेलारूसच्या लेखिका आणि पत्रकार स्वेतलाना अलेक्‍सिविच यांना यंदाचे साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
 • दुसरे महायुद्ध, सोव्हिएत महासंघाची पडझड आणि अफगाणिस्तानमधील सोव्हिएत महासंघाचे युद्ध याबाबतचे विदारक वास्तव मांडल्याबद्दल त्यांची या पारितोषिकासाठी निवड झाली.
 • स्वेतलाना अलेक्‍सिविच (वय 67) या राजकीय विश्‍लेषक असून, साहित्याचे नोबेल मिळविणाऱ्या त्या पहिल्या पत्रकार ठरल्या आहेत.
 • रशियातील चेर्नोबिल दुर्घटनेवरील ‘व्हॉइसेस फ्रॉम चेर्नोबिल’ आणि सोव्हिएत महासंघ आणि अफगाणिस्तान यांच्या युद्धाच्या प्राथमिक अहवालावरील ‘झिंकी बाइज्‌’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 • दुसऱ्या महायुद्धात लढण्यासाठी उतरलेल्या शेकडो महिलांच्या मुलाखतींतून त्यांनी लिहिलेले ‘वॉर्स अनवुमनली फेस’ हे त्यांचे पुस्तक सर्वाधिक गाजले.
 • त्यांची पुस्तके 19 देशांमध्ये प्रकाशित झाली असून, पाच पुस्तकांचे इंग्रजीमध्ये रूपांतर झाले आहे. त्यांनी तीन नाटकेही लिहिली असून, 21 माहितीपटासाठी पटकथा लिहिली आहे.
 • स्वेतलाना अलेक्‍सिविच यांचा जन्म 1948 मध्ये युक्रेनमधील इव्हानो फ्रॅंकिस्क या गावात झाला. त्यांचे वडील बेलारूस आणि आई युक्रेनची होती.
 • वडिलांची लष्करी सेवा पूर्ण झाल्यानंतर हे कुटुंब बेलारूसला स्थायिक झाले. येथेच स्वेतलाना यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले.
 • 1985 मध्ये त्यांनी ‘द अनवूमनली फेस ऑफ द वॉर’ हे पहिले पुस्तक लिहिले.
 • साहित्यासाठी नोबेल मिळविणाऱ्या त्या 14 व्या महिला ठरल्या आहेत.
 • 1901 ते 2015 या काळात 112 जणांनी साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळविले आहे.

 शांततेचे नोबेल 2015 :

 • ट्युनिशियामध्ये 2011 मध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर अराजकतेच्या उंबरठ्यावर असलेल्या या देशात लोकशाही टिकविण्यात भरीव कामगिरी केलेल्या ‘नॅशनल डायलॉग क्वार्टलेट’ या संस्थेला यंदाचे शांततेचे नोबेल पोरतोषिक जाहीर झाले.
 • ट्युनिशियातील चार प्रमुख संस्थांची मिळून द क्वार्टलेट ही संस्था बनली आहे. यामध्ये द ट्युनिशियन जनरल लेबर युनियन, द ट्युनिशियन कॉन्फडरेशन ऑफ इंडस्ट्री ट्रेड अँड हॅंडिक्राफ्ट्‌स, द ट्युनिशियन ह्युमन राइट्‌स लीग आणि द ट्युनिशियन ऑर्डर ऑफ लॉयर्स यांचा समावेश आहे.

नॅशनल डायलॉग क्वार्टेट –

   द टय़ुनिशियन जनरल लेबर युनियन –

 • स्थापना – 1946

 • कार्य – कामगारांच्या हिताचे रक्षण करणे.

   द टय़ुनिशियन कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्री, ट्रस्ट अँड हँडीक्राफ्ट्स –

 • स्थापना – 1947

 • कार्य – लघुद्योगांमध्ये सहभाग

   द टय़ुनिशियन ह्य़ूमन राइट्स लीग –

 • स्थापना – 1976

 • कार्य – मानवी हक्कांचे रक्षण
 • ‘द टय़ुनिशियन ऑर्डर ऑफ लॉयर्स’ कायदेतज्ज्ञांच्या या संस्थेने टय़ुनिशियामध्ये लोकशाही प्रस्थापनात महत्त्वाचा सहभाग नोंदविला होता.
 • या सर्व संस्थाद्वारे ट्युनिशियातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांमध्ये मानवाधिकार, कायद्याचे पालन, समाजकल्याण अशा मूल्यांचा प्रसार केला जातो.
 • द क्वार्टलेट या संस्थेने आपल्या नैतिक सामर्थ्याच्या जोरावर ट्युनिशियामध्ये शांततापूर्ण मार्गाने लोकशाहीचा विकास होण्यासाठी प्रमुख माध्यम म्हणून काम केले.
 • चार संस्थांनी मिळून बनलेल्या या संस्थेची स्थापना 2013 ला करण्यात आली.
 • राजकीय हत्यासत्र आणि देशात पसरलेल्या अराजकतेमुळे लोकशाही प्रक्रिया संकटात सापडली असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही स्थापना झाली होती. या संस्थेने शांततापूर्ण मार्गाने समाजातील अशांत घटकांबरोबर चर्चा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
 • ट्युनिशियाअंतर्गत यादवीच्या उंबरठ्यावर असताना या संस्थेने पर्यायी राजकीय चर्चेचे वातावरण तयार केले.

जस्मिन रिव्होलुशन –

 • ट्युनिशियामध्ये 2010 मध्ये सरकारविरोधी वातावरण तयार होऊन ही लाट सर्व अरबजगतात पसरली. म्हणूनच उठावांना ‘अरब स्प्रिंग’ म्हणूनही ओळखले जाते.
 • ट्युनिशियामध्ये याला ‘जस्मिन रिव्होलुशन’ म्हणतात.
 • ट्युनिशियामध्ये सुरवात होऊनही दोन वर्षांत येथे चर्चेची प्रक्रिया सुरू झाली. या उलट सीरिया, येमेन आणि इतर अरब देशांमध्ये सरकार उलथविले गेले अथवा तसे प्रयत्न होऊन अराजकता माजली.

  द क्वार्टलेटने मात्र देशाच्या इस्लामवादी आणि इतर पक्षांमध्ये राष्ट्रीय चर्चा घडवून आणली. त्यामुळे येथे लोकशाही वाचू शकली.

 प्रा. अँगस डेटन यांना अर्थशास्त्राचे नोबेल  :

 • अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ प्रा. अँगस डेटन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे.
 • उपभोग, गरिबी आणि विकास यावरील अभ्यासासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे.
 • वैयक्तिक उपभोग निर्णय आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यांच्यातील संबंध डेटन यांनी उलगडून दाखविला.
 • या त्यांच्या कामामुळे लघू, सूक्ष्म आणि विकसित अर्थव्यवस्थांना परिवर्तनाची दिशा मिळाली.
 • जनतेचे कल्याण आणि गरिबी निर्मूलनासाठी अर्थव्यवस्थेची रचना कशी असावी, याबाबत त्यांनी संशोधन केले.
 • या कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे.
 • ग्राहक त्यांचे उत्पन्न विविध वस्तूंवर कशा प्रकारे विभागून खर्च करतो, समाज उत्पन्नातील किती पैसा खर्च करतो आणि किती पैशांची बचत करतो, विकास (कल्याण) आणि गरिबी मोजण्यासाठी सर्वोत्तम मापदंड कोणते, या तीन महत्त्वपूर्ण प्रश्नांवर डेटन यांनी अभ्यास केला आहे.
 • डेटन हे अमेरिकेत प्रिन्स्टन विद्यापीठात अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे प्राध्यापक आहेत.
 • सन्मान पदक आणि रोख साडेनऊ लाख अमेरिकी डॉलर असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • स्टॉकहोमध्ये 10 डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण होणार आहे.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World