महत्वाच्या योजना भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती

महत्वाच्या योजना भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती

पोलिओ लस योजना

  • 25 एप्रिल 2016 पासून जगात टीओपीव्ही ऐवजी बिओपीव्ही लस, देण्यास सुरुवात झाली. याला भारताने नॅशनल स्विच डे म्हटले. टीओपीव्ही म्हणजे ट्रायव्हॅलट ओरल पोलिओ व्हॅक्सिन यामध्ये पोलिओच्या तिन्ही विषाणूचा (ब्रुनहिल्ड, लॉन्सिंग, लिऑन) समावेश आहे. आता टाईप 2 विषाणूंचे जगातून 1999 मध्ये कायमचे उच्चाटन झालयं यासाठीच बीओपीव्ही मध्ये टाईप 2 (लॉन्सिंग) विषाणू नाही. म्हणून याला बायव्हंटलट पोलिओ व्हॅक्सिन म्हणतात. टीओपीव्ही 9 मे 2016 पासून पूर्णबंद झाली आहे.
  • भारत सरकारने इम्युनाइज इंडिया मोहीम सुर केली असून या मोहिमेव्दारे मातांच्या मोबाईलवर आठवणीसाठी तीन वेळा लसीकरणाच्या तारखा पाठविल्या जाणार आहे.
  • सध्या जगातील 80 टक्के नागरिक पोलिओ-विरहित देशांमध्ये राहतात. यास अपवाद पाकिस्तान व अफगणिस्तान (अधिक पोलिओग्रस्त रुग्ण आहेत.)
  • 13 जाने. 2011 नंतर भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळला नाही.
  • 27 मार्च 2014 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले.
  • 1951 मध्ये जोनास सॉलक यांनी पोलिओचे विषाणू शोधून लस तयार केली.
  • ब्रुनहिलडे विषाणूंमुळे अर्धांगवायू होतो, लॉन्सिंग आणि लिऑन विषाणूमुळे अपंगत्व येते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.