महत्वाच्या योजना भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती

महत्वाच्या योजना भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती

पंतप्रधान-उज्वाला योजना

  • सुभारंभ – 1 मे 2016, स्थळ – बालिया (उत्तरप्रदेश)
  • उद्देश : गरीबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यासंदर्भात, या योजनेत एका गॅस जोडणीचा 1600 रुपये इतका प्रशासकीय खर्च केंद्र सरकार करणार आहे, या योजनेसाठी 8 हजार कोटींची तरतुद करण्यात आली. ज्यांना गॅसवरील अंशदानाची तितकीशी गरज नाही, अशा एक कोटीहून अधिक मध्यमवर्गीयांनी, उच्चवर्गीयांनी ते सोडून दिल्यामुळे, त्यातून झालेली 2 हजार कोटींची राष्ट्रीय बचत हे योजनेचे वैशिष्ट्य आहे.
  • पाच कोटी गृहीणींच्या नावाने स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी करण्यात येणार आहे.
  • 2 ऑक्टो. 2019 महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती पर्यंत गॅस जोडणी योजना पुर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे.

 

स्टँडअप इंडिया योजना

  • योजनेचा शुभारंभ – 5 एप्रिल 2016 नोएडा
  • उद्घाटक – पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • योजनेचा उद्देश – देशातील अनुसूचित जाती – जमातीतील आणि महिला उद्योजक यांना पतपुरवठा करणे.
  • काय आहे योजना – स्टँडअप योजने अंतर्गत 10 लाख रुपयापासून एक कोटी रुपयापर्यंत कर्ज अनुसूचित जाती जमाती व महिला या गटातील उद्योजकांना दिला जाणार आहे.
  • आयडीआयबी बँकेने ही योजना सुर केली. (20 एप्रिल 2016)
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.