Current Affairs of 9 November 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 नोव्हेंबर 2016)

चालू घडामोडी (9 नोव्हेंबर 2016)

पंतप्रधान यांचा बनावट नोटा रोखण्यासाठीचा ऐतिहासिक निर्णय :

  • काळा पैसा आणि अवैध व्यवहार रोखण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा 8 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून चलनातून बंद करण्यात आल्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला.
  • दूरचित्रवाणीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी ही अतिमहत्त्वाची घोषणा केली.
  • तसेच यातील एक हजाराच्या नोटा चलनातून पूर्णपणे बंद होणार असून, पाचशे रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येतील.
  • दोन हजार रुपयांची नोटही चलनात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
  • काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक होणार आहे.
  • काळ्या पैशाबाबत विशेष तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे.
  • परदेशांत ठेवलेला काळा पैसा साठ टक्के कर भरून तीन महिन्यांत जाहीर करण्यासाठी 2015 मध्ये कायदा संमत.
  • बॅंक व्यवहारांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांबरोबर करार.
  • भ्रष्टाचारातून मिळालेल्या काळ्या पैशाला (बेनामी व्यवहार) आळा घालण्यासाठी ऑगस्ट 2016 पासून कडक कायदा अस्तित्वात आला.
  • मोठा दंड भरून काळा पैसा जाहीर करण्यासाठी योजना आखण्यात आली.

महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाला जपानकडून मदत :

  • जगभरातील व देशाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांना औरंगाबाद येथील अजिंठा-वेरूळ लेण्यांचे मोठे आकर्षण आहे.
  • तसेच त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील संवर्धनासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जेआयसीए) आता महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाला (एमटीडीसी) मदत करणार आहे.
  • बाह्य मूल्यांकनाविषयी नुकतेच जेआयसीएच्या भारतातील कार्यालयाने ‘एमटीडीसी’ला पत्र पाठवले होते.
  • 27 नोव्हेंबरपासून 24 डिसेंबरपर्यंत ‘जेआयसीए‘चे प्रतिनिधी या स्थळांना भेट देतील. त्यानंतर जवळपास वर्षभर म्हणजेच ऑक्‍टोबर 2017 पर्यंत याविषयी अभ्यास केला जाईल.
  • निश्‍चित करण्यात आलेल्या समितीवर केंद्र सरकारच्या ‘एएसआय’, ‘एएआय’ या संस्थांबरोबर ‘एमटीडीसी’ आणि इतर राज्यांतील सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींचीही निवड करण्यात आली आहे.
  • अजिंठा आणि वेरूळ येथे पर्यटकांच्या सोईबरोबर वास्तूंचे संवर्धन करणेही अत्यंत आवश्‍यक आहे.
  • पहिला टप्पा 1993 ते 2004 दरम्यान पूर्ण झाला. दुसरा टप्पा 2016 आणि 17 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.

केअर वर्ल्ड वरील बंदीस 24 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती :

  • आक्षेपार्ह बाबी दाखवल्याने केंद्र सरकारने आरोग्याविषयी माहिती देणाऱ्या केअर वर्ल्ड टीव्ही या चॅनेलवर वर सात दिवस प्रसारणबंदी घातली. या बंदीविरुद्ध चॅनलने उच्च न्यायालयात धाव घेतली.
  • सुटीकालीन न्यायालयाने सरकारच्या निर्णयावर 24 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली.
  • केअर वर्ल्ड टी.व्ही चॅनेल 24*7 असून या चॅनेलवर आरोग्याविषयी माहिती देण्यात येते.
  • गेले दहा वर्षे हा चॅनेल सुरू असल्याचे चॅनेलचे अध्यक्ष अतुल सराफ यांनी न्यायालयाला सांगितले.
  • माहिती व प्रसारण मंत्रालयाने घातलेल्या सात दिवसांच्या बंदीवर न्या. एम. एस. कर्णिक यांनी 24 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली.
  • आयएमसीच्या शिफारशीनुसार माहिती व प्रसारण मंत्रालयाने सात दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

भारतीय वास्तुरचनाकार एम. एन. शर्मा यांचे निधन :

  • चंडीगढ हे भारतातील पहिले सुनियोजित शहर वसवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले एम. एन. शर्मा यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले.
  • चंदीगडचे पहिले भारतीय मुख्य वास्तुरचनाकार अशी त्यांची ख्याती होती.
  • तसेच त्यांनी ‘द मेकिंग ऑफ चंदीगड : ल कॉर्बुझिए अँड आफ्टर’ हा ग्रंथ लिहिला.
  • चंदीगडच्या संकल्पनेवर निस्सीम प्रेम असणारे शर्मा हे कवीप्रमाणे भावनांच्या प्रकाशात या शहराबद्दल चिंतन करणारे विचारी कलावंत होते.
  • संपूर्ण चंदीगड युनिसेफने वास्तु-वारसा म्हणून घोषित करावे या मागणीचा पाठपुरावा ते अखेपर्यंत करीत होते.

दिनविशेष :

  • 9 नोव्हेंबर 1947 रोजी जुनागढ भारतात विलीन झाले.
  • भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या ‘सारे जहाँसे अच्छा’चे कवी मोहम्मद इक्बाल यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1877 रोजी झाला.  
  • मराठी समाजसुधारक आणि भारतरत्न पुरस्कर्ते धोंडो केशव कर्वे यांचा 9 नोव्हेंबर 1962 हा स्मृतीदिन आहे.
  • 9 नोव्हेंबर 2005 हा माजी भारतीय राष्ट्रपती के. आर. नारायणन यंचा स्मृतीदिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.