Current Affairs of 10 November 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 नोव्हेंबर 2016)

चालू घडामोडी (10 नोव्हेंबर 2016)

भारतीय वंशाच्या तीन सदस्यांची अमेरिकेतील संसदेत निवड :

  • अमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या तीन सदस्यांनी बाजी मारली आहे.
  • वॉशिंग्टनमधून प्रमिला जयपाल प्रतिनिधी सभेवर निवडून आल्या आहेत.
  • तर कमला हॅरिस कॅलिफोर्नियामधून सिनेटर म्हणून निवडून आल्या आहेत.
     
  • तसेच त्याबरोबरच राजा कृष्णमूर्थी हेसुद्धा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडून आले आहेत.
  • भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकन सिनेटर म्हणून निवडून येत इतिहास रचला आहे.
  • सिनेटर म्हणून निवडून येणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक ठरल्या आहेत.

‘बिझनेस वुमन ऑफ द इअर पुरस्कार’ उपमा विरदी यांना जाहीर :

  • ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या उपमा विरदी यांनी यंदाच्या ‘बिझनेस वुमन ऑफ द इअर’ पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
  • व्यवसायाने वकील असलेल्या उपमा यांनी छंद म्हणून चहाचा बिझनेस सुरू केला आणि यशाची पताका फडकावली.
  • ऑस्ट्रेलियासारख्या कॉफीवेड्या देशात लोकांना चहाची तलफ लावण्याची किमया मेलबर्नमध्ये राहणाऱ्या या तरुणीने करून दाखवली आहे.
  • तसेच उपमाच्या या यशाचा इंडियन ऑस्ट्रेलियन बिझनेस अॅण्ड कम्युनिटी पुरस्कारात ‘बिझनेस वुमन ऑफ द इअर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

टाटा समूहाचे हंगामी अध्यक्षपदी इशात हुसैन :

  • गेल्या महिन्यात टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून ‘सायरस मिस्त्री’ यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अखेर पंधरवड्यानंतर दिवसांनी समूहास नवा अध्यक्ष मिळाला आहे.
  • मिस्त्री यांच्याजागी इशात हुसैन यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मोठ्या उमेदीने ज्याच्या हाती देशातील अवाढव्य अन् शिस्तप्रिय उद्योगसमूहाची कमान काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती, त्याच मिस्त्री यांना 25 ऑक्टोबर रोजी समूहानेच अचानक पदावरून बरखास्त केले.
  • नवा चेअरमन मिळेपर्यंत चार वर्षांनी पुन्हा एकदा रतन टाटा यांनी समूहाची धुरा आपल्या हाती घेतली होती.
  • मात्र अखेर दोन आठवड्यांनी समूहाला नवा अध्यक्ष मिळाला असून इशात हुसैन यांना हंगामी अध्यक्षपद देण्यात आले आहे.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प :

  • सगळ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वांचे अंदाज चुकवत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (वय 70वर्ष) यांनी बाजी मारली.
  • डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांचा त्यांनी पराभव केला.
  • निवडणूक जिंकण्यासाठी आवश्‍यक असलेला प्रातिनिधिक मतांचा (इलेक्‍टोरल कॉलेज) पाठिंबा ट्रम्प यांना मिळाला.
  • अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला 538 प्रातिनिधिक मतांपैकी 270 प्रातिनिधिक मते आवश्‍यक असतात.
  • ट्रम्प यांना 289, तर हिलरींना 218 प्रातिनिधिक मते मिळाली.
  • डोनाल्ड जॉन ट्रम्प यांनी अमेरिका या जगातील बलाढ्य राष्ट्राचे 45 वे राष्ट्राध्यक्ष होण्याचा बहुमान पटकाविला.

एएमपीसीच्या सरचिटणीसपदी नामदेव शिरगावकर यांची निवड :

  • भारतीय मॉडर्न पेन्टॅथलॉन फेडरेशनचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांची आशियाई मॉडर्न पेन्टॅथलॉन महासंघाच्या (एएमपीसी) सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
  • किरगिझीस्तान येथे नुकतीच एएमपीसीची निवडणूक झाली. यात 34 वर्षीय शिरगावकर यांनी कोरियाचे सांकेओंग येओ यांच्यावर विजय मिळविला.
  • शिरगावकर यांच्या निवडीने या पदावरील कोरियाची 25 वर्षांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.
  • मॉडर्न पेन्टॅथलॉन या ऑलिम्पिक क्रीडाप्रकारात तलवारबाजी, पोहणे, घोडेस्वारी, धावणे व लेझर गन शूटिंग अशा 5 खेळांचा समावेश असतो.
  • शिरगावकर यांची सरचिटणीसपदी निवड झाल्यामुळे एएमपीसीचे मुख्यालय भारतात स्थलांतरित होणार आहे.
  • तसेच शिरगावकर हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.