Current Affairs of 11 November 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 नोव्हेंबर 2016)

चालू घडामोडी (11 नोव्हेंबर 2016)

केंद्र सरकारकडून देशभरात बेहिशेबी काळा पैश्यांवर छापे :

  • केंद्र सरकारने चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर अनेक ठिकाणांवरून बेहिशेबी काळा पैसा बाहेर पडू लागला आहे.
  • काही महाभागांनी आपले पैसे कचराकुंड्यांमध्ये टाकल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्राप्तिकर विभागाने दिल्ली, मुंबईसह अन्य बड्या शहरांत अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत.  
  • सराफा व्यावसायिक आणि हवाला ऑपरेटर्स यांच्यावर ही कारवाई झाली.
  • तसेच बॅंकांत पैसे बदलून घेण्यासाठी होत असलेली गर्दी लक्षात घेऊन ‘एनईएफटी’ आणि धनादेश वटविण्याचे व्यवहार येत्या शनिवार आणि रविवारी देखील सुरू ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने घेतला आहे.
  • अनिवासी भारतीयांना बॅंकांमध्ये पैसे जमा करायचे असतील अथवा त्यांना नोटा बदलून घ्यायच्या असतील तर त्यांना व्यवहार करताना जबाबदार अधिकाऱ्याचे पत्र सोबत जोडावे लागणार आहे.
  • आज देशभरातील बॅंकिंग व्यवहारामध्ये 20 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे आढळून आल्याचे स्टेट बॅंक ऑफ इंडियाने म्हटले आहे.
  • एखाद्या प्रसंगी एक अथवा दोन बनावट नोटा आढळल्या तर तो मोठा मुद्दा नाही; पण बनावट नोटांचे प्रमाण अधिक असल्यास मात्र पोलिस त्याची चौकशी करणार आहे.

इतर देश नवीन नोटेची नक्कल करू शकत नाही :

  • भारत सरकारने नव्याने तयार केलेल्या 500 व 2000 रुपयांच्या नोटेची पाकिस्तान व तेथील गुन्हेगारी संघटना नक्कल करू शकत नाही, असे गुप्तचर विभागाने म्हटले आहे.
  • भारत सरकारने नव्याने तयार केलेल्या नोटांची नक्कल होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली आहे.
  • तसेच यामुळे पाकिस्तानला व तेथील गुन्हेगारी संघटनांना नव्या नोटांची नक्कल करणे अवघड होणार आहे, असे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
  • पाकिस्तानमधील पेशावरमध्ये भारतीय नोटांची सर्वाधीक छपाई होते. या नोटांमध्ये 5001000 च्या नोटांचा मोठा सहभाग होता.
  • भारत सरकारने 5001000 च्या नोटा बंद केल्यामुळे छपाई केलेल्या नोटांबाबत पाकची मोठी पंचाईत झाली आहे, असे गुप्तचर विभागाने अहवालात नमूद केले आहे.

ई-कॉमर्स कंपन्यांकडून कॅश ऑन डिलेव्हरीचा पर्याय रद्द :

  • ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडिल या कंपन्यांनी कॅश ऑन डिलेव्हरीचा पर्याय रद्द केला आहे.
  • भारत सरकारकडून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.
  • तसेच त्यामुळे आता 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा फक्त रुग्णालये, पेट्रोल पंप, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके आणि औषधांच्या दुकानांमध्येच वापरता येतील.
  • 11 नोव्हेंबरनंतर या ठिकाणीदेखील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा वापरता येणार नाहीत.
  • एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास ई-कॉमर्स कंपन्यांकडून डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा पर्याय उपलब्ध करुन दिला जातो आहे.

पतंजलीचे दुग्ध व्यवसाय स्पर्धेत पदार्पण :

  • पतंजलीने आता दुग्ध व्यवसायात पदार्पण करत असून, नगर जिल्ह्य़ातील खडकाफाटा (ता. नेवासे) येथे त्यांचा पहिला दूध प्रकल्प सुरू होत आहे.
  • बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच आता त्यांच्या दुग्धजन्य पदार्थाची टक्कर राज्यातील सहकार तसेच खासगी क्षेत्रांबरोबर होणार आहे.
  • पतंजलीचा तूप व दुग्धजन्य पदार्थनिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ 16 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, योगगुरू  रामदेवबाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
  • खासगी कंपन्यांकडून गायीचे तूप व दुधाची पावडर खरेदी करून त्याची विक्री पतंजलीच्या बॅण्डनेमने केली जात होती.
  • पहिल्या टप्यात कॅडबरीला टक्कर देणारा एनर्जीबार, बोर्नविटाशी स्पर्धा करणारा पॉवरविटा ही दुग्धजन्य उत्पादने बाजारात आणली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ते डेअरी उत्पादनात उतरले आहे.
  • शुद्ध प्रतीच्या देशी गायींची निर्मिती करण्याकरिता सुमारे 250 कोटींचे 50 वळू ब्राझिलवरून आयात केले असून, जागा मिळाल्यानंतर नेवाशात गोशाळा सुरू करण्यात येणार आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.