6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

आदित्य एल 1
आदित्य एल 1

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023)

आदित्य एल-1 ची मोठी झेप:

  • सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’चं आदित्य एल-1 हे अवकाशयान 2 सप्टेंबरआकाशात झेपावलं.
  • सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी या यानामध्ये सात वेगवेगळी उपकरणं (पेलोड) बसवण्यात आली आहेत.
  • सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम, सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर आणि अंतराळातील हवामान या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही मोहीम हाती घेतली आहे.
  • लाँचिंगनंतर चार दिवसांनी 5 सप्टेंबर सकाळी इस्रोने एक ट्वीट करून सांगितलं की, आदित्य एल-1 ने दुसऱ्यांदा यशस्वीपणे त्याची कक्षा (ऑर्बिट) बदलली आहे.
  • आदित्य एल-1 हे अवकाशयान आधी 245 किमी X 22459 किमी कक्षेतून जात होतं. या यानाने आता त्याची कक्षा बदलून ते 282 किमी X 40225 किमी या कक्षेतून पुढे सरसावत आहे.
  • आदित्य एल-1 मोहिमेतलं हे इस्रोचं दुसरं यश आहे.
  • आता 10 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य एल-1 हे यान तिसऱ्यांदा त्याची कक्षा बदलेल.

अमेरिकेत ‘सनातन दिना’ची घोषणा:

  • अमेरिकेच्या एका शहरात 3 सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • अमेरिकेतील केंटुकी येथील लुईव्हिल शहराच्या महापौरांनी शहरात 3 सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून घोषित केला आहे.
  • उपमहापौर बार्बरा सेक्स्टन स्मिथ यांनी महापौर क्रेग ग्रीनबर्ग यांच्या वतीने लुईसविले येथील केंटुकीच्या हिंदू मंदिरात महाकुंभ अभिषेक सोहळ्यादरम्यान सनातन धर्म दिनाची अधिकृत घोषणा वाचून दाखवली.
  • आध्यात्मिक गुरू चिदानंद सरस्वती, परमार्थ निकेतन, ऋषिकेशचे अध्यक्ष श्री श्री रविशंकर आणि भगवती सरस्वती, लेफ्टनंट गव्हर्नर जॅकलिन कोलमन, डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ केशा डोर्सी आणि इतर अनेक आध्यात्मिक गुरू आणि मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

दिनविशेष :

  • सन 1522 मध्ये फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.
  • भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म 6 सप्टेंबर 1901 मध्ये झाला.
  • सन 1965 मध्ये 6 सप्टेंबर रोजी पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.
  • सन 1993 मध्ये ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड झाली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.