5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

आदित्य एल 1
आदित्य एल 1

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023)

डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर पुरस्कार :

  • देश-विदेशात शिक्षण आणि वैद्यकीय संस्था, नवी मुंबईतील खेळाचे भव्य मैदान आदी ठिकाणी ठोस कामगिरी करून उत्तुंग यश मिळणाऱ्या डॉ. डी. वाय पाटील यांना यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
  • एक लाख रुपये आणि सन्मानपत्र शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • या पुरस्काराचे यंदाचे 27 वे वर्षे आहे.
  • यापूर्वी राज्यातील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

चंद्रयान मोहिमेतील रोव्हरनंतर लँडरही 22 सप्टेंबपर्यंत निद्रावस्थेत :

  • चंद्रयान-3 मोहिमेंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या ‘विक्रम’ या लँडरने सोमवारी चक्क पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिंग केले.
  • एक लहानशी उडी मारून विक्रम सुमारे 40 सेंटीमीटर उंचीवर जाऊन 30 ते 40 सेंटीमीटर मागे सरकून पुन्हा उतरविण्यात आले.
  • एका अर्थी ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उडी (हॉप टेस्ट) मारू शकतो का, याची चाचपणी करण्यात आली.
  • भविष्यात चंद्रावरील माती, खडक याचे नमूने आणण्यासाठी किंवा मानवी मोहिमांसाठी चंद्राच्या पृष्ठभागावरून पुन्हा उड्डाण करण्याच्या दिशेने हा प्रयोग करण्यात आला.
  • सोमवारी ‘विक्रम’ला निद्रावस्थेत पाठविण्यात आले. त्याच्यावरील उपकरणे बंद करण्यात आली असले तरी, रिसिव्हर चालू ठेवण्यात आला आहे.
  • ‘प्रज्ञान’ या रोव्हरनंतर विक्रमलाही निद्रावस्थेत पाठविण्यात आले असून आता 22 सप्टेंबपर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र असेल.
  • पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर दोन्ही याने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘आदित्य एल 1’ची पहिली प्रक्रिया यशस्वी:

  • देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल 1’ उपग्रहाची पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली.
  • ही प्रक्रिया येथे असलेल्या ‘इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क’द्वारे (आयएसटीआरएसी-इस्ट्रॅक) पार पडली.
  • हा उपग्रह अगदी सुस्थितीत असून योग्यरित्या काम करत असल्याचेही ‘इस्रो’ने स्पष्ट केले.
  • पहिली पृथ्वी कक्षा परिभ्रमण मोहीम (ईबीएन#1) बंगळुरूच्या ‘आयएसटीआरएसी’येथून यशस्वीरित्या पार पडली.
  • या उपग्रहाने प्राप्त केलेली नवीन कक्षा 245 किलोमीटर 722,459 किमी आहे.
  • ‘आदित्य एल 1’ला शनिवारी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले गेले.
  • ‘आदित्य-एल 1’ ही अवकाशीय सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहे.
  • हा उपग्रह सूर्यावर उतरणार नाही किंवा त्याच्या जवळही जाणार नाही.

दिनविशेष :

  • 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन तसेच आंतरराष्ट्रीय दान दिन म्हणून पाळला जातो.
  • भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये झाला होता.
  • भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म 5 सप्टेंबर 1895 मध्ये झाला.
  • सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म 5 सप्टेंबर 1928 रोजी झाला.
  • सन 1984 मध्ये एस.टी.एस. 41-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.