6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

राष्ट्रीय दंतचिकित्सक दिन
राष्ट्रीय दंतचिकित्सक दिन

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 मार्च 2023)

सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप:

  • टेनिस कारकीर्दीला जेथून सुरुवात केली, त्याच हैदराबादमध्ये प्रदर्शनीय सामना खेळत भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने आपल्या कारकीर्दीला रविवारी पूर्णविराम दिला.
  • हैदराबाद येथील लाल बदाहूर टेनिस कोर्टवर सानियाने रोहन बोपण्णा, युवराज सिंग, खास मैत्रीण बेथनी माटेक-सँड्स, इव्हान डोडिग, कॅरा ब्लॅक आणि मारियन बाटरेली यांसारख्या आपल्या लाडक्या सहकाऱ्यांबरोबर मैत्रीपूर्ण लढती खेळल्या.
  • याच कोर्टवर जवळपास दोन दशकांपूर्वी कारकीर्दीतील पहिले ‘डब्ल्यूटीए’ एकेरीचे विजेतेपद मिळवत सानियाने आपल्या उदयाची झलक दाखवली होती.
  • त्यानंतर एकेरीत नाही, पण दुहेरीत सानियाने आपले वेगळे स्थान निर्माण केले.
  • सानियाची अखेरची सव्‍‌र्हिस पाहण्यासाठी केंद्रीय विधिमंत्री किरेन रिजिजू, माजी क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उथप्पा, अनन्या बिर्ला, हुमा कुरेशी अशा प्रथितयश व्यक्तींबरोबर असंख्य चाहते, सानियाचे कुटुंबीय, सानिया मिर्झा अकादमीतील भावी खेळाडू यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 मार्च 2023)

क्रिकेटमध्ये झाले मोठे बदल:

  • दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील महिला प्रीमियर लीग सामन्यादरम्यान नो-बॉल तपासण्यासाठी DRS चा वापर करण्यात आला होता, जो चालू स्पर्धेत नियम बदलल्यानंतर शक्य झाला आहे.
  • यापूर्वी असे काहीही पाहिले नाही.
  • तिसऱ्या पंचाने नो-बॉल शोधण्यासाठी बॉल ट्रेसिंग सिस्टमचा वापर केला.
  • दिल्ली कॅपिटल्सची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स ही तिसऱ्या अंपायरकडून अशी मागणी करणारी पहिली फलंदाज ठरली आहे.
  • दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या शेवटच्या षटकात ही घटना घडली.

दिनविशेष:

  • 6 मार्च हा दिवस ‘राष्ट्रीय दंतचिकित्सक दिन’ आहे.
  • सन 1840 मध्ये बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
  • के.आर. नारायण यांच्या हस्ते सन 1999 यावर्षी जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
  • सन 2000 मध्ये शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब केला.
  • देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे 6 मार्च 2005 रोजी सुरु झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 मार्च 2023)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.