5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

कपिल सिबल
कपिल सिबल

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 मार्च 2023)

कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:

  • ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी देशातील अन्यायाचा सामना करण्यासाठी इन्साफ या मंचाची स्थापना करण्याची घोषणा केली.
  • देशातील विरोधी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री यांच्यासह सर्वानी आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन सिबल यांनी केले.
  • या मंचातर्फे 11 मार्चला जंतर मंतर येथे सार्वजिक सभा आयोजित केली जाईल असे त्यांनी सांगितले.
  • देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अन्याय होत आहे, नागरिक, संस्था, राजकीय विरोधक, पत्रकार, शिक्षक, आणि मध्यम व लघु उद्योगांना अन्यायाचा सामना करावा लागतो असे सिबल म्हणाले.
  • त्यासाठी इन्साफ का सिपाही ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे, त्यावर कोणीही नाव नोंदवू शकतो अशी माहिती सिब्बल यांनी दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 मार्च 2023)

अयोध्येतील मशिदीच्या आराखडय़ास अंतिम मंजुरी:

  • बाबरी मशीद-रामजन्मभूमी निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अयोध्या विकास प्राधिकरणाने येथे धन्नीपूर मशिदीच्या बांधकामाच्या आराखडय़ाला अंतिम मंजुरी दिली.
  • उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या पाच एकर जागेवर ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्ट’द्वारे (आयआयसीएफ) एक मशीद, रुग्णालय, संशोधन संस्था, समूदाय स्वयंपाकघर आणि ग्रंथालय बांधले जाणार आहे.
  • शुक्रवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत आम्ही अयोध्या मशिदीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
  • मंजूर नकाशे ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’कडे काही विभागीय औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सुपूर्द केले जातील.
  • 9 नोव्हेंबर 2019 रोजी ऐतिहासिक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले व सरकारला जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्यास आदेश दिले होते.

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी रेल्वेचं हे नवं फिचर:

  • भारतीय रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी सातत्याने सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करते.
  • आता आयआरसीटीसी (IRCTC) प्रवाशांसाठी अशी एक सुविधा आणत आहे ज्यात तुम्ही बोलताच तुमचं रेल्वे तिकीट बुक होणार आहे.
  • यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुक करताना माहिती भरण्याची गरज भासणार नाही.
  • यासाठी आयआरसीटीसी नवी सुविधा घेऊन येत आहे.
  • आस्क दिशा 2.0 या नावाने प्रवाशांना ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे.

हरमनप्रीत कौर आणि मुंबई इंडियन्सने रचला इतिहास:

  • महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे.
  • मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • मुंबईने पहिल्याच सामन्यात 200 धावांचा टप्पा पार केला.
  • त्याचबरोबर मुंबई इंडियन्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे.
  • ती या स्पर्धेतील अर्धशतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरली आहे.
  • त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने पहिल्याच डावात 200 धावांचा टप्पा पार करत इतिहास रचला आहे.

यशस्वी जैस्वाल ठरला ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय:

  • मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात द्विशतक झळकावल्यानंतर रेस्ट ऑफ इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावातही आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली.
  • इराणी चषकाच्या चौथ्या दिवशी यशस्वी जैस्वालने लंच टाईमपूर्वी यशस्वीने आक्रमक खेळी करत शतक पूर्ण केले.
  • त्याचबरोबर त्याने एक इतिहास रचला आहे.
  • इराणी चषकाच्या एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
  • या सामन्यात यशस्वीने आता 300 हून अधिक धावा पूर्ण केल्या आहेत.
  • इराणी चषकात अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
  • याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवनने इराणी चषकात एका सामन्यात 300 धावांचा टप्पा पार केला होता.

दिनविशेष:

  • 5 मार्च 1851 रोजी जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
  • 1997 यावर्षी संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
  • धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना सन 1997 मध्ये जाहीर करण्यात आला.
  • रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत सन 1998 मध्ये आगमन झाले होते.
  • सन 2000 मध्ये कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 मार्च 2023)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.