4 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

हिप्पो
हिप्पो

4 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 मार्च 2023)

दहशतवादविरोधी गट स्थापण्याची ‘क्वाड’ची घोषणा:

 • मुक्त आणि खुल्या हिंदू-प्रशांत प्रदेशासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पुन्हा एकदा दिली.
 • या भागामध्ये कायद्याचे राज्य, स्वायत्तता, प्रादेशिक अखंडता आणि विवादांवर शांततापूर्ण समझोता या बाबींना जोरदार समर्थन देत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
 • क्वाड गटाची ही भूमिका म्हणजे नाव न घेता चीनला इशारा दिल्याचे मानले जात आहे.
 • परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन, जपानचे परराष्ट्रमंत्री आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांची शुक्रवारी बैठक झाली.
 • त्या वेळी या दहशतवादविरोधी गटाची घोषणा करण्यात आली.
 • हा गट दहशतवादाचे नवे स्वरूप, धार्मिक मूलगामित्वामध्ये वाढ आणि हिंसक अतिरेकी गट यांचा सामना करण्याच्या उपाययोजनांचा शोध घेईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 मार्च 2023)

60 हिप्पो गुजरातमध्ये येणार:

 • 1980 च्या दशकात ड्रग लॉर्ड पाब्लो एस्कोबारने आफ्रिकेतून बेकायदेशीरपणे आयात केलेल्या चार पाणघोड्यांची संख्या मागील काही दशकात वाढलेली आहे.
 • अशावेळी प्राणिसंख्या नियंत्रणाचा भाग म्हणून ड्रग लॉर्डच्या पूर्वीच्या घराजवळ राहणारे किमान 70 पाणघोडे भारत आणि मेक्सिकोमध्ये हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
 • सध्या सरकारने या पाणघोड्यांना विषारी आक्रमक प्रजाती घोषित केले आहे.
 • सध्या बोगोटापासून 200 किमी अंतरावर मॅग्डालेना नदीकाठी असलेल्या हॅसिंडा नेपोल्स रॅंचच्या पलीकडे 3 टन वजनाचे पाणघोडे राहतात.
 • पर्यावरण अधिकार्‍यांचा अंदाज आहे की अँटिओक्विया प्रांतात सुमारे 130 हिप्पो आहेत आणि त्यांची लोकसंख्या आठ वर्षांत 400 पर्यंत पोहोचू शकते.
 • भारतातील गुजरातमधील ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन किंगडममध्ये 60 पाणघोडे पाठवण्याची योजना आहे तर आणखी 10 पाणघोडे मेक्सिकोतील प्राणीसंग्रहालय आणि सिनालोआ येथे असलेल्या ओस्टोक सारख्या अभयारण्यांमध्ये जातील.

2010 नंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरला दुसरा कर्णधार:

 • भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धा खेळली जात आहे.
 • या मालिकेतील आतापर्यंत तीन सामने पार पडले आहे.
 • मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले.
 • त्याचबरोबर मालिकेतील तिसरा सामना स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला.
 • स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाला तिसरा सामना जिंकून एक मोठा विक्रम नावावर केला आहे.
 • 2010 नंतर मायदेशात भारताला दोन कसोटीत पराभूत करणारा तो दुसरा कर्णधार ठरला.
 • त्याच्या आधी हा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकच्या नावावर होता.

दिनविशेष:

 • सन 1837 मध्ये शिकागो शहराची स्थापना झाली.
 • नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते सन 1951 मध्ये पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
 • भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म 4 मार्च 1980 मध्ये झाला.
 • 2001 या वर्षी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 मार्च 2023)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.