3 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

3 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 मार्च 2023)

राष्ट्रपतींद्वारे होणार मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती :

 • निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
 • मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
 • तसेच विरोधी पक्षनेते नसतील तर, तेव्हा संसदेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते या समितीचे सदस्य असतील असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 • निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तींबाबत सर्वोच्च न्यायालयाने संसदेला नवीन कायदा बनविण्याचे निर्देश दिले आहेत.
 • तसेच जोपर्यंत हा कायदा बनत नाही तोपर्यंत निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या समितीद्वारे करण्यात यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. दे
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 मार्च 2023)

IRCTC ने HDFC सोबत लाँच केलं नवं ‘ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड’:

 • रेल्वे प्रवाशांना आता तिकीट बुकिंगमागे मोठी बचत करणं आता शक्य होणार आहे.
 • रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेने भागीदारीत बुधवारी एक को- ब्रँडेड ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड लाँच करण्याची घोषणा केली आहे.
 • या कार्डला आयआरसीटीसी – एचडीएफसी बँक ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड म्हणून ओळखले जाईल.
 • हे नवं ट्रॅव्हल को ब्रँडेड कार्ड एकाच प्रकारात उपलब्ध असणार आहे.
 • पण ते केवळ एनपीसीआयच्या रुपे नेटवर्कवर आधारित असणार आहे.
 • यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाने आयआरसीटीसीसोबत ट्रॅव्हल कार्डसाठी करार केला होता.
 • यानंतर आयआरसीटीसीचा हा तिसरा करार आहे.

टीम इंडियाविरुद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच गोलंदाज:

 • भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदोरमध्ये खेळला जात आहे.
 • या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने भारताविरुद्ध मोठी कामगिरी केली आहे.
 • त्याने भारताच्या दुसऱ्या डावात एकूण ८ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
 • तसेच नॅथनने दुसऱ्यांदा भारताविरुद्ध आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवली.
 • कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या पाहुण्या गोलंदाजाने दुसऱ्यांदा 8 बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 • इंदोरच्या होळकर स्टेडियमवर भारत विरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नॅथन लायनने तीन बळी घेतले.

रविचंद्रन अश्विनने ने मोडला कपिल देव चा विक्रम:

 • टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली.
 • आर अश्विनने भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव यांचा विक्रम मोडला.
 • भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
 • आर अश्विनने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हँड्सकॉम्बला श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद करताच, त्याने कपिल देवच्या विक्रमाशी बोरबरी केली होती.
 • त्यानंतर त्याने यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीला एलबीडब्ल्यू आऊट करून त्याने कपिल देव यांना मागे टाकले.
 • त्याचबरोबर भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
 • हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे सध्या त्याच्या पुढे आहेत.

दिनविशेष :

 • टेलिफोनचा जनक ‘अॅलेक्झांडर ग्राहम बेल’ यांचा जन्म सन 1847 मध्ये 3 मार्च रोजी झाला.
 • नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 मार्च 1930 रोजी सत्याग्रह केला.
 • सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध 3 मार्च 1938 मध्ये लागला.
 • 3 मार्च 1973 रोजी भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
 • जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना सन 1994 मध्ये 3 मार्च रोजी ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 मार्च 2023)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.