9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 मार्च 2023)

BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:

  • बीएसएनएल ही भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे.
  • आता बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सर्व्हिस लॉन्च करणार आहे.
  • भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) लवकरच भारतात 4G सर्व्हिस लॉन्च करणार आहे.
  • बीएसएनएलने पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये कमर्शिअल 4 जी सेवा सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  • यासाठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कडून काही उपकरणे खरेदी करत आहे.
  • सुरुवातीला पंजाबच्या फिरोजपूर, अमृतसर आणि पठाणकोट या तीन जिल्ह्यांमध्ये 4 जी सेवा लॉन्च केली जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 मार्च 2023)

सापाच्या प्रजातीला मिळाले विदेशात अस्तित्व:

  • तुर्कमेनिस्तान देशातून नुकत्याच एका सुंदर सापाच्या प्रजातीला त्याचे अस्तित्व मिळवून देण्याचे काम वन्यजीव संशोधकांनी केले आहे.
  • या संशोधनामध्ये 11 देशांमधील विविध संशोधकांचा समावेश आसून, भारतामधून अमीत सैय्यद, विवेक शर्मा, एस. आर. गणेश, तसेच एच. टी. लारेमसंगा यांचा मोलाचा वाटा आहे.
  • ‘लायकोडॉन बायकलर’ असे याचे नाव असून, हा ‘लायकोडॉन’ कुळातील साप आहे.
  • या कुळातील सापांना इंग्रजीत ‘उल्फ स्नेक्स’, तर मराठीत ‘कवड्या’ जातीचा साप म्हणतात.
  • ‘लायकोडॉन’ कुळात आतापर्यंत 73 प्रजातींच्या सापांची नोंद आहे. ‘लायकोडॉन बायकलर’ हा पूर्वी ‘लायकोडॉन स्टेयेटस’ नामक एका प्रजातीच्या नावाने ओळखला जात होता.
  • भारत, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, तसेच तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये या सापाची नोंद असल्याचे नमूद केले गेले होते.

ICC टेस्ट रॅंकिंगमध्ये या खेळाडूंनी मारली बाजी:

  • भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) बुधवारी जारी केलेल्या रॅंकिंगमध्ये सहा अंकांचं नुकसान झालं आहे.
  • पण अश्विन इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसनसोबत संयुक्तपणे नंबर वन टेस्ट गोलंदाज बनला आहे.
  • अश्विन मागच्या आठवड्यात टेस्ट गोलंदाजीच्या रॅंकिंगमध्ये नंबर एकवर पोहोचला होता.
  • ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियोनही अव्वल स्थानापासून जास्त दूर नाही.
  • फलंदाजीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज उस्मान ख्वाजा दोन नंबर पुढे जाऊन नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
  • भारतीय संघाचा कर्णधार टॉप-10 मधून बाहेर झाला आहे.
  • ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन पहिल्या स्थानावर आहे.
  • स्मिथ दुसऱ्या आणि जो रूट तिसऱ्या स्थानावर आहे.

दिनविशेष:

  • पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचा जन्म 9 मार्च 1934 मध्ये झाला होता.
  • प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचाजन्म 9 मार्च 1951 मध्ये झाला.
  • पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म 9 मार्च 1952 रोजी झाला.
  • बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सन 1959 पासून सुरूवात झाली.
  • सन 1992 या वर्षी कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के.के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.