Current Affairs of 12 November 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 नोव्हेंबर 2016)

चालू घडामोडी (12 नोव्हेंबर 2016)

भारत व जपानमध्ये ऐतिहासिक अणू करार :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौ-यात मोठे यश मिळाले आहे.
 • भारत आणि जपान दरम्यान ऐतिहासिक अणू करार झाला आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या उपस्थितीत नागरी अणू करारावर स्वाक्ष-या झाल्या.
 • भारतासोबत अणूकरार करणारा जपान हा 11 वा देश आहे.
 • तसेच, जपानने अणू पुरवठादार गटात(NSG) भारताच्या कायम सदस्यत्वाचंही समर्थन केले आहे.
 • जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.

राज्यांना त्यांच्या उत्पादनांवर प्रवेशकराचा अधिकार :

 • राज्यांना त्यांच्या उत्पादनांवर प्रवेशकर आकारण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने 11 नोव्हेंबर रोजी दिला.
 • राज्याच्या करविधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी आवश्‍यक नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील नऊ सदस्यीय खंडपीठाने हा निर्वाळा दिला.
 • राज्यांना उत्पादनांवर प्रवेशकर आकारण्याचा अधिकार असून, यात उत्पादनांमध्ये मात्र भेदभाव करता येणार नाही.
 • राज्याने तेथेच उत्पादित होणाऱ्या उत्पादनावर प्रवेशकर आकारल्यास अन्य राज्यांतून येणाऱ्या त्याच उत्पादनांवर जादा कर आकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
 • एका राज्यातून दुसऱ्या राज्यात उत्पादन नेताना त्यावर राज्य प्रवेशकर आकारते. ज्या राज्यात उत्पादन जाणार ते राज्य हा कर आकारत नाही.

महावितरणाकडून वीज ग्राहकांसाठी अभय योजना लागू :

 • कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक, उच्चदाब व अतिउच्चदाब वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणने अभय योजना जाहीर केली आहे.
 • तसेच या योजनेत सहभागी होणाऱ्यांना व्याज, दंड व विलंब आकारणीबाबत माफी मिळणार असून, ही योजना 30 एप्रिल 2017 पर्यंत लागू राहील.
 • कायमस्वरूपी वीज खंडित असलेले ग्राहक त्यांच्याकडील मूळ थकबाकीचा शंभर टक्के भरणा करतील; त्यांना शंभर टक्के व्याज व दंड आणि विलंब आकार माफ करण्यात येणार आहे.
 • तसेच मूळ रकमेत पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यानंतर 31 जानेवारी 2017 पूर्वी मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकारणी माफ होणार आहे.
 • 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल 2017 या कालावधीत योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना थकीत मूळ रक्कम भरल्यानंतर 100 टक्के विलंब आकार माफ करण्यात येणार आहे.

व्ही.आर. रघुनाथ करणार भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व  :

 • आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय सीनियर पुरुष संघाच्या यशानंतर 23 नोव्हेंबरपासून चार देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेसाठी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
 • तसेच संघाचे नेतृत्व ड्रॅग फ्लिकर व्ही. आर. रघुनाथ करणार आहे.
 • भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत खेळेल. त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली जाईल.
 • नियमित कर्णधार आणि गोलकिपर पी.आर. श्रीजेश हा गुडघ्याच्या जखमेमुळे संघाबाहेर असल्याने रघुनाथकडे कर्णधारपद सोपविण्यात आले.
 • संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी बचाव फळीतील खेळाडू आणि ड्रॅग फ्लिकर रूपिंदरपालसिंग याच्याकडे असेल.
 • चार देशांच्या स्पर्धेत अन्य संघ न्यूझीलंड आणि मलेशिया हे राहतील.

दिनविशेष :

 • 12 नोव्हेंबर 1952 रोजी ‘युनेस्को’च्या अध्यक्षपदी सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांची निवड झाली होती.
 • भारतीय स्वातंत्र्यसैनिक एस.एम. जोशी यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1904 रोजी झाला.
 • बनारस हिंदू विद्यापीठाचे निर्माते पं. मदन मोहन मालवीय यांचा 12 नोव्हेंबर 1946 हा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.