Current Affairs of 15 November 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (15 नोव्हेंबर 2016)
राज्यात माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार :
- राज्यातील नागरिकांना माफक दरामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचे ध्येय हाती घेण्यात आले असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जात असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
- सीबीडीतील पारसिक हिल येथे अपोलो रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
- भविष्यात माफक दरात उत्तमोत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
- आरोग्य मंत्र्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे ग्रामीण भागात डॉक्टर उपलब्ध करून देणे.
- पण जर डॉक्टर रुग्णांपर्यंत पोहोचू शकत नसतील तर अशा ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णापर्यंत डॉक्टरांना पोहोचविता येऊ शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
- कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, आरोग्य मंत्री दीपक सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
Must Read (नक्की वाचा):
जयंत सावरकर नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी :
- 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची निवड करण्यात आली.
- बुजुर्ग रंगकर्मीचा उचित सन्मान झाल्याची भावना नाट्यसृष्टीत व्यक्त होत आहे.
- तथापि, संमेलनस्थळासंदर्भात येत्या काही दिवसांत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निर्णय घेणार आहे.
- अ.भा. मराठी नाट्य परिषदेची कार्यकारिणी आणि नियामक मंडळाच्या 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत जयंत सावरकर यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी सांगितले.
जागतिक फोटोग्राफी स्पर्धेत बैजू पाटील यांना सुवर्णपदक :
- औरंगाबादेतील प्रख्यात वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी फेडरेशन इंटरनॅशनल आर्ट फोटोग्राफी (एफआयएपी) या जागतिक फोटोग्राफी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारताची मान जगात उंचावली आहे.
- युरोपमधील सर्बिया येथे दर दोन वर्षांनी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत तब्बल 45 देशांनी सहभाग घेतला होता.
- जागतिकस्तरावर ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. बैजू पाटील यांना उत्कृष्ट फोटोग्राफीबद्दल आतार्पंयत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
- तसेच छायाचित्रणामध्ये ‘एफआयएपी’ ही स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते.
- भारतातून बंगळुरू, कोलकाता, चेन्नई येथील वन्यजीव छायाचित्रकार या स्पर्धेत भाग घेत असले तरी आपल्या देशाला सुवर्णपदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- जून 2016 मध्ये फेडरेशन इंटरनॅशनल आर्ट फोटोग्राफी (एफआयएपी) या स्पर्धेसाठी त्यांनी आपला फोटो पाठविला.
द असोसिएटेड जर्नल लिमिटेडकडून इंग्रजी वेबसाइट सुरू :
- द असोसिएटेड जर्नल लिमिटेडने 14 नोव्हेंबर रोजी आपली इंग्रजी वेबसाइट (बिटा व्हर्जन) सुरू केली.
- (www.nationalheraldindia.com) अशी ही इंग्रजी वेबसाइट आहे.
- द असोसिएटेड जर्नल लिमिटेड ही कंपनी 1937 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केली होती.
- तसेच ही डिजिटल वेबसाइट पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या तत्त्वाला अनुसरूनच काम सुरू ठेवणार आहे.
- जवाहरलाल नेहरू यांनी 1938 मध्ये द नॅशनल हेरॉल्डची सुरुवात केली. स्वातंत्र्य चळवळीतील सैनिकासारखी त्याची भूमिका होती.
- स्वातंत्र्य संकटात आहे, आपल्या सर्व शक्तिनिशी त्याचे संरक्षण करा, असा संदेश होता.
- स्वातंत्र्यानंतर हेरॉल्डने हिंदीत ‘नवजीवन’ व उर्दूत ‘कौमी आवाज’हे दैनिक सुरू केले होते.
दिनविशेष :
- ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी नेते आचार्य विनोबा भावे यांचा 15 नोव्हेंबर 1982 हा स्मृतीदिन आहे.
- 15 नोव्हेंबर 1986 हा भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचा जन्मदिन आहे.
- सचिन तेंडुलकरने भारताकडून 15 नोव्हेंबर 1989 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा