Current Affairs of 16 November 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (16 नोव्हेंबर 2016)
ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार :
- सणांनिमित्त होणा-या आतषबाजीमुळे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली आहेत.
- ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद असून यासंदर्भात कठोर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र शासनाने पोलीस नियंत्रणास दिले आहेत.
- ध्वनीप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगीक क्षेत्रात दिवसा 75 डेसीबल तर रात्री 70 डेसीबल एवढी ध्वनीमर्यादा असावी.
- व्यापारी क्षेत्रात दिवसा 65 डेसीबल तर रात्री 55 डेसीबल एवढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसीबल तर रात्री 45 डेसीबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा 50 डेसीबल ते रात्री 40 डेसीबल पर्यंत ध्वनीमर्यादा आहे.
Must Read (नक्की वाचा):
डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन :
- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2016 या कालावधीत नागपूर येथे होणार आहे.
- तसेच या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयके व विधान परिषदेतील सहा प्रलंबित विधयेकांवर चर्चा होणार असून, चार नवीन आणि 11 प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.
- विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झाली.
- माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त विशेष चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील चंद्र :
- सुधील चंद्र यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या (सीबीडिटी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
- सुशील चंद्र हे 1980 च्या तुकडीतील भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहे.
- 2015 पासून ते प्रत्यक्ष कर मंडळाच्या चौकशी विभागाचे सदस्य देखील आहेत.
- तसेच प्राप्तिकर खात्यात त्यांनी मुख्य आयुक्त, प्राप्तिकर आयुक्त व प्राप्तिकर महासंचालक अशी पदे भूषवली आहेत.
सीआरपीएफची पहिली महिला तुकडी कार्यरत :
- झारखंडमधील नक्षलविरोधी मोहिमेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाकडून (सीआरपीएफ) पहिल्यांदाच महिलांची तुकडी तैनात करण्यात आली.
- 232 बटालियन डेल्टा कंपनीच्या 135 महिला जवान सध्या 133 बटालियनकडून जबाबदारी समजून घेत आहेत.
- रांचीमधील खूंती भागात नक्षलग्रस्त जंगलात ही मोहीम राबविण्यात येणार असून, यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- सीआरपीएफचे पोलिस महासंचालक संजय ए. लाठकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबरला या तुकडीचा सीआरपीएफमध्ये समावेश करण्यात आला.
- झारखंडमधील नक्षली घुसखोरी थांबविण्यासाठी ही तुकडी काम करणार असून त्यांनी मोहिमा राबविण्यास सुरवातही केली आहे.
- महिला बटालियन क्रमांक 133 चे प्रमुख नीरज पांडे यांनी तर या महिला शूर असून त्यांना सध्या नक्षलविरोधी मोहिमांचा अनुभव दिला जात असल्याचे सांगितले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा