Current Affairs of 8 November 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 नोव्हेंबर 2016)

चालू घडामोडी (8 नोव्हेंबर 2016)

उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला चार पारितोषिके :

 • आर्थिक व्यवहार, सर्वसमावेशी विकास, पायाभूत सुविधा आणि ई-गव्हर्नन्स या चार क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला ‘इंडिया टुडे’ नियतकालिकातर्फे पुरस्कृत करण्यात आले.
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी हे पुरस्कार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते स्वीकारले.
 • वर्षभरातील आर्थिक व्यवहारविषयक पाहणीत राज्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी, सर्वसमावेशी विकासाच्या आघाडीवर मोठ्या राज्यांच्या श्रेणीत पहिला क्रमांक, तर पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वाधिक सुधारित राज्य म्हणून महाराष्ट्राला पुरस्कृत करण्यात आले.
 • ई-गव्हर्नन्सद्वारे राज्याने केलेली श्रमांची बचत ही मोठ्या राज्यांच्या श्रेणीतील अग्रगण्य ठरल्याने यासाठीही महाराष्ट्राला पुरस्कार देण्यात आला.

दहशतवाद मुकाबल्यासाठी भारत-चीनचे सहकार्य :

 • दहशतवादाशी मुकाबला व अन्य क्षेत्रांत उच्च पातळीवर मैत्रीपूर्ण संबंध ठेवून देवाणघेवाण करण्याचे भारत व चीनने ठरविले आहे.
 • तसेच दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या चर्चेत हा निर्णय झाला.
 • भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांग जियेची यांची हैदराबाद येथे चर्चा झाली.
 • गेल्या दोन महिन्यांत यांग हे तिसऱ्यांदा भारत भेटीवर आले आहेत. या चर्चेत द्विपक्षीय, या प्रदेशातील तसेच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
 • राजकीय, आर्थिक, संरक्षण व दहशतवादाशी मुकाबला या क्षेत्रांत उच्च पातळीवर माहितीची देवाणघेवाण करीत शांततेचे वातावरण ठेवण्याचे या वेळी ठरविण्यात आले.

भारतीय व्यावसायिकांसाठी ब्रिटनची खास व्हिसा योजना :

 • सीआयआय च्या वतीने आयोजित शिखर परिषदेत ब्रिटिश पंतप्रधान टेरेसा मे यांनी भारतीय व्यावसायिकांसाठी विशेष व्हिसा योजनेची घोषणा केली.
 • भारतीय नागरिकांसाठी आम्ही ‘नोंदणीकृत प्रवास योजना’ सादर करीत आहोत, असे टेरेसा मे यांनी सांगितले.
 • तसेच नियमितपणे ब्रिटनला जाणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ होईल.
 • पंतप्रधान टेरेसा मे यांनी आपल्या भाषणात टाटा उद्योग समूहाचा विशेष उल्लेख केला.
 • ब्रिटनमध्ये 800 भारतीय कंपन्या आहेत. जग्वार लँड रोव्हरची मालक कंपनी टाटा ही त्यांची सर्वांत मोठी वस्तू उत्पादन कंपनी आहे.

राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय नोकरी :

 • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
 • राज्यातील क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे, यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे विशेष धोरण आहे.
 • राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशा गुणवंत खेळाडूंबाबत चर्चा केली.
 • तसेच त्यानंतर या समितीने आठ खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यास मुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मान्यता दिली आहे. 

विशाल सानप अहमदाबाद विभागाचे नवे सहसंचालक :

 • सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) अहमदाबाद विभागाचे सहसंचालक म्हणून परभणी जिल्ह्यातील 36 वर्षीय विशाल सानप यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
 • अहमदाबाद विभागाच्या कार्यक्षेत्रात गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांसह दीव व दमण या केंद्र शासित प्रदेशांचा समावेश होतो. त्याचे प्रभारी अधिकारी म्हणून विशाल सानप काम पाहतील.
 • तसेच मूळचे परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील शेवाडी गावाचे असलेले सानप हे सध्या ईडीच्या मुंबई परिमंडळामध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.
 • माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व त्यांच्या कुंटुंबीयांविरुद्धच्या प्रकरणाचा तपास त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरू आहे.
 • निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. माधवराव सानप यांचे पुत्र असलेले विशाल हे 2005 साली केंद्रीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले असून, महसूल विभागात (आरआरएस) निवडले गेले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World