Current Affairs of 4 November 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (4 नोव्हेंबर 2016)
संपूर्ण देशात अन्न सुरक्षा कायदा लागू :
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आता संपूर्ण देशात लागू झाला आहे.
- तामिळनाडू आणि केरळ आतापर्यंत या कायद्याच्या कक्षेबाहेर होते. तथापि, 1 नोव्हेंबरपासून ही राज्येही पटलावर आली आहेत.
- तसेच या कायद्यामुळे 80 कोटी लोकांना सवलतीत धान्य मिळणार असून, केंद्राला त्यापोटी वार्षिक 1 लाख 40 हजार कोटी एवढे अनुदान द्यावे लागणार आहे.
- अगोदर केवळ 11 राज्यांत या कायद्याची अंमलबजावणी होत होती. मात्र, आता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात याचा अंमल सुरू झाली.
- धान्य थेट विक्रेत्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचते करण्यात येत असून, विक्रेत्यांचे कमिशनही वाढविण्यात आले आहे, असे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान म्हणाले.
- 2013 मध्ये संसदेने संमत केलेल्या या कायद्यांतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीला केवळ एक ते तीन रुपये किलो दराने दरमहा 5 किलो धान्य पुरविणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
खानोलकर यांच्या छायाचित्राला पुरस्कार :
- डोंबिवली येथील रहिवासी व प्रसिद्ध छायाचित्रकार नयन खानोलकर यांना ‘बीबीसी’तर्फे ‘फोटोग्राफर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
- या पुरस्कारासाठी जगभरातून 50 हजार अर्ज आले होते. त्यातून 10 जणांची निवड करण्यात आली.
- इंग्लंडच्या राजघराणाच्या प्रतिनिधींच्या हस्ते लंडन येथील ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’ येथे हा पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
- तसेच 2012 मध्ये त्यांना उद्योगरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मागील 10 वर्षांत तीन भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विघ्नेशला रौप्यपदक :
- मुंबईमध्ये बहारीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात ठाणेकर विघ्नेश देवळेकरने रोहन कपूरच्या साथीने अंतिम फेरीत धडक मारली.
- मात्र, मोक्याच्यावेळी झालेल्या चुकांचा फटका बसल्याने विघ्नेश-रोहन यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
- अंतिम सामन्यात विघ्नेश-रोहन जोडीला सोव्हिएत रशियाच्या इव्हेगनीज ड्रीमन-डेनिस ग्रेचेव्ह जोडीकडून 18-21,17-21 असा पराभव पत्कारावा लागला.
- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पोलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विघ्नेशने आपले पहिले आंतरराष्ट्रीय कांस्य पदक पटकावले होते.
- आगामी बांग्लादेश आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली विघ्नेशने तयारी सुरु केली आहे.
मिसेस महाराष्ट्र टॅलेन्टेड पुरस्कार 2016 :
- पुणे रेसिडेन्सी क्लब येथे पार पडलेल्या ‘मिसेस महाराष्ट्र 2016 ब्यूटी पॅजेंट’ स्पर्धेत नम्रता सुभेदार (टांकसाळे) यांना मिसेस महाराष्ट्र टॅलेन्टेडचा पुरस्कार मिळाला आहे.
- राज्यातून 500 महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यातून 18 महिलांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये ग्रामीण भागातून बारामतीच्या नम्रता सुभेदार यांची निवड करण्यात आली.
- स्पर्धेतील वेगवेगळ्या चाचण्या पार करून सुभेदार या पहिल्या 10 मध्ये पोहोचल्या.
- टॅलेन्ट राऊंडमध्ये त्यांनी ‘शेतकऱ्याची आत्महत्या’ या विषयावर एकपात्री नाटक सादर केले. त्याला परीक्षक व प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
- तसेच अंतिम फेरीत त्यांना मिसेस महाराष्ट्र टॅलेन्टेड हा किताब मिळाला.
दिनविशेष :
- भारतीय क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा 4 नोव्हेंबर 1845 रोजी जन्म झाला.
- अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतला देवी यांचा 4 नोव्हेंबर 1939 रोजी जन्म झाला.
- 4 नोव्हेंबर 1952 रोजी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, अमेरिका (N.S.A.) ची स्थापना करण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा