Current Affairs of 9 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (9 जानेवारी 2018)

जगातील सर्वात मोठ्या आईस फेस्टिवलला सुरवात :

 • जगातील सर्वात मोठ्या आईस फेस्टिवलला उत्तरपूर्व चीनच्या हार्बिन शहरात सुरवात झाली आहे. येत्या महिन्यात हजारो पर्यटकांना हे फेस्टिवल आकर्षित करण्याची अपेक्षा केली जात आहे.
 • 34 व्या हार्बिन इंटरनॅशनल आईस अँड स्नो स्कल्पचर फेस्टिवलची सुरवात 5 जानेवारीला झाली आहे. हे फेस्टिवल फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत चालणार आहे.
 • येथील संगणक-नियंत्रित एलईडीज हे इतिहासातील अत्यंत महत्वाकांक्षी कलाकृती दर्शविते. या कलाकृतींमध्ये बीजिंगचे टेम्पल ऑफ हेव्हन, मॉस्कोचे रेड स्क्वेअर आणि बँगकॉकचे बुद्ध मंदिर यांच्या प्रतिकृती उभ्या केलेल्या आहेत.
 • 2017 मध्ये झालेल्या या फेस्टिवलने शहरासाठी अंदाजे 28.7 अब्ज युआन (4.4 अब्ज) इतका पर्यटन महसूल मिळवून दिला होता. तसेच या फेस्टिवलची सुरवात 1983 मध्ये झाली होती.

अलोक कुमार बेळगांव विभागाचे नवे आयजीपी :

 • उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून अलोक कुमार यांनी पदभार स्वीकारला. गेल्या महिन्यात डॉ. रामचंद्र राव यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
 • जिल्हा पोलिस मुख्यालयातील पटांगणावर अलोक कुमार यांनी पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली. त्यानंतर ओळख परेड झाली. अलोक कुमार यांनी आय.जी.पी. कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला.  
 • पोलीस आयुक्त डॉ.डी.सी राजप्पा, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.बी.आर रवीकांते गौडा यांच्यासह अन्य जिल्ह्यातील पोलीसप्रमुखांनी त्यांचे स्वागत केले.
 • उत्तर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच येथील गुन्हेगारी व अपघात कमी करण्यासाठी आपण निश्चितच आराखडा आखू, असे आश्वासन आयजीपी अलोक कुमार यांनी दिले.

जिल्हा रुग्णालयांमध्ये सुरू होणार ‘मेमरी क्‍लिनिक’ :

 • अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ जाणवत आहे. यासाठी राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये मेमरी क्‍लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला असून पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग येथे अशा रुग्णांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
 • राज्यात अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाणे येथील मनोरुग्णालयात दर आठवड्याला साधारणता 1400 जणांची तपासणी केली जाते. त्यातील किमान सहा ते सात रुग्ण अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाचे आढळून येत आहेत. याकरिता आरोग्य विभागामार्फत अभियान स्वरूपात जाणीवजागृतीचे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.
 • तसेच या क्‍लिनिकच्या माध्यमातून अल्झायमरविषयी अर्ली डिटेक्‍शन सेंटर सुरू करण्यात येईल. त्याद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल.
 • पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग या सहा ठिकाणी पहिल्या टप्प्यात डे केअर सेंटर सुरू केले जाणार आहेत. त्यामध्ये रुग्णाच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 • दरम्यान, मुंबईतील मालवणी भागातील आरोग्य विभागाच्या सामान्य रुग्णालयात टाटा कर्करोग रुग्णालयाच्या सहाय्याने 26 जानेवारीपासून कर्करोग निदान केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

माटुंगा स्थानक लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये :

 • महिला विशेष असलेल्या मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे.
 • स्थानकातील विविध कामांसह स्थानकातील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला अधिकारी-कर्मचारी यांच्यावर आहे.
 • महिलांमार्फत कामकाज करणारे स्थानक म्हणून देशातील पहिले उपनगरीय रेल्वे स्थानकाचा मानदेखील माटुंगा स्थानकाला मिळाला आहे.
 • जुलै 2017 रोजी 34 महिलांची नियुक्ती करून हे स्थानक महिला विशेष स्थानक घोषित करण्यात आले.
 • माटुंगा स्थानकाजवळ विविध महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ येथे सर्वाधिक असते.

पंतप्रधान आवास योजना पीएमआरडीएकडे :

 • प्रधान मंत्री आवास योजना पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) वर्ग करण्यात आली असून, येत्या 15 जानेवारीपासून पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर या योजनेचे अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
 • शासकीय व खासगी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना या योजनेंतर्गत घर मिळू शकते, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 • केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटकांना (निम्न मध्यमवर्ग) 30 ते 60 चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळापर्यंत नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या घराची वाढ करण्यासाठी बँकांमार्फत अत्यल्प व्याजदराने कर्ज मिळणार आहे.
 • तसेच याप्रमाणे केंद्र व राज्य शासनाकडून 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे ज्यांच्या नावावर घर नाही, अशा नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, याबाबत जागृती केली जात आहे. त्यातच आता प्रधान मंत्री आवास योजना राबविण्याची जबाबदारी पीएमआरडीएकडे देण्यात आली आहे.

दिनविशेष :

 • 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.
 • मार्क्सवादी विचारवंत लेखक ‘प्रभाकर उर्ध्वरेषे’ यांचा जन्म 9 जानेवारी 1918 रोजी झाला.
 • नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला 9 जानेवारी 2001 रोजी अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
 • 9 जानेवारी 2007 रोजी स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.