Current Affairs of 8 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (8 जानेवारी 2018)

महाराष्ट्रातील 15 महिलांचा राष्ट्रीय गौरव :

 • विविध क्षेत्रांत प्रथम पाऊल टाकत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील 113 महिलांचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे फर्स्ट लेडी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 15 महिलांचा समावेश आहे.
 • राष्ट्रपती भवनात 20 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
 • समाजातील दमनकारी प्रवृत्तींचा विरोध झुगारून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या, वेगळी वाट चोखाळणाऱ्या महिलांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

निवडणूक रोख्यांचा पुन्हा एकदा पुरस्कार :

 • निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना निधी मिळण्याच्या पद्धतीत पारदर्शिता आणण्याच्या हेतूने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवडणूक रोख्यांचा (इलेक्टोरल बाँड्स) पुन्हा एकदा पुरस्कार केला आहे.
 • या प्रस्तावाचा त्यांनी सर्वप्रथम गतवर्षीच्या अर्थसंकल्पी भाषणात उल्लेख केला होता. त्यानंतर गेल्या आठवडय़ात त्यांनी संसदेत या रोख्यांची रूपरेषा मांडली.
 • अर्थमंत्री जेटली यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या मजकुरात निवडणूक रोख्यांची गरज अधोरखित केली. यासंदर्भात आणखी सूचनांचे त्यांनी स्वागत केले.
 • भारतासारख्या महान लोकशाही देशात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना निधी देण्याच्या प्रक्रियेत मात्र पारदर्शिता नाही. राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी निधी देण्याच्या सध्याच्या प्रक्रियेत मोठय़ा त्रुटी आहेत.
 • बहुतांशी पैसा बेहिशेबी असतो. यातून भ्रष्टाचाराला चालना मिळते. मात्र अनेक राजकीय पक्षांना आहे ही यंत्रणा सुरू ठेवण्यात काही गैर वाटत नाही. त्यामुळे कोणतीही नवी व्यवस्था आणण्याचे प्रयत्न हाणून पाडल्याचे दिसून येते, असे जेटली यांनी म्हटले आहे.

बॉम्ब नामक वादळाने नायगारा गोठला :

 • अमेरिकेत बॉम्ब नावाच्या चक्रीवादळाने पूर्व किनाऱ्याला फटका दिला असून तेथे मोठय़ा प्रमाणात हिमवृष्टी झाली तर गोठवणारी थंडी पडली आहे. त्यामुळे या भागात प्रवास करणे अशक्य बनले आहे. या वादळात आतापर्यंत आग्नेयेकडील उत्तर व दक्षिण कॅलिफोर्नियात चार जण मरण पावले असून बर्फाळ रस्त्यावर वाहने चालवणे अशक्य बनले आहे.
 • राष्ट्रीय हवामान वेधशाळेने म्हटले आहे की, या भागात तापमान कमालीचे घसरले असून थंड वारे वाहत आहेत. अमेरिकेच्या अनेक भागांत थंडीची लाट पसरली असून त्यात काही जणांचे मृत्यू झाले आहेत. अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
 • बर्फ सगळीकडे साचला असून ईशान्येकडे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. ला गार्डिया व केनेडी विमानतळावर वाहतूक बंद करण्यात आली आहे.
 • उत्तर न्यूयॉर्कमध्ये तापमान इतके कमी आहे की, नायगारा धबधबा गोठला आहे. हा धबधबा अमेरिका व कॅनडाच्या सीमेवर आहे. बॉम्ब चक्रीवादळात तापमान झपाटय़ाने खाली जाते. त्यातून वादळी वारे निर्माण होतात.

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार :

 • नव्या वर्षातील (2018-19) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात होणार आहे. तर, 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी ही माहिती दिली.
 • यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे.
 • तर दुसरा टप्पा 5 मार्च ते 6 एप्रिल या काळात होईल. दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे.

साने गुरुजी युवा पुरस्कार जाहीर :

 • सोनगीर येथील पंचायत समिती सदस्या आणि तनिष्का गटप्रमुख रुपाली रविराज माळी यांना मुंबईच्या हुंडाविरोधी चळवळीने यंदाचा ‘साने गुरुजी युवा पुरस्कार’ जाहीर केला आहे.
 • 12 जानेवारीला विलेपार्ले (मुंबई) येथील साठे महाविद्यालयाच्या नाट्यगृहात पुरस्काराचे वितरण होणार आहे. 10 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.  
   
 • स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण होणार आहे. संस्थेचे युवा पुरस्कार देण्याचे हे 30 वे वर्ष आहे.
 • हुंडाविरोधी चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डी.बी. ऊर्फ मामासाहेब कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त यंदा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
 • तसेच युवा पुरस्कारासाठी रुपाली माळी व इस्रोमधील मुंबईचे पहिले शास्त्रज्ञ प्रथमेश हिरवे यांची निवड झाली आहे.             

पालकमंत्री दीपक केसरकर बनले स्वच्छतादूत :

 • राज्यमंत्री असूनसुद्धा मंत्री पदाचा कुठेही बडेजाव नाही साथीला अधिकाऱ्यांची फौज नाही, नेहमीची नम्र व सौम्य भाषा आणि साथीला स्वच्छ सावंतवाडी ठेवण्याचे आवाहन करीत खुद्द पालकमंत्री दीपक केसरकर सावंतवाडीकरांसाठी स्वच्छतादूत बनले आहे.
 • महास्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी 7 जानेवारी रोजी सकाळी सावंतवाडीत दाखल होत स्वतः हात हातात झाडू घेतला आणि स्वच्छतेचा मूलमंत्र दिला आहे. त्यांनी शहरातील विविध भागात जाऊन नागरिकांना स्वच्छतेबाबत आव्हान केले.

दिनविशेष :

 • संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत 8 जानेवारी 1889 मध्ये गणकयंत्राचे पेटंट मिळाले होते.
 • ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म 8 जानेवारी 1909 मध्ये झाला.
 • सन 1947 मध्ये 8 जानेवारी रोजी राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.
 • 8 जानेवारी 2000 रोजी लता मंगेशकर यांची 1999 साठीच्या एन.टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.