Current Affairs of 9 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (9 जानेवारी 2016)

माहिती आयुक्तांची नियुक्ती :

    • केंद्रीय माहिती आयोगात बऱ्याच काळापासून रिक्त असलेल्या तीन पदांवर माहिती आयुक्तांची सहा आठवडय़ांत नियुक्ती करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे.
    • तीन माहिती आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी सरकारने मागितलेली मुदत आम्ही यापूर्वीच दिली होती, असे सांगून आता सहा आठवडय़ांच्या मुदतीत या नियुक्त्या कराव्यात, असे न्या. जे.एस. खेहर व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने सांगितले.
    • दिल्ली उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सरकारने सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

‘अतुल्य भारत’ या मोहिमेसाठी अमिताभ बच्चन यांची नियुक्ती :

  • गेल्या दहा वर्षांपासून ‘अतुल्य भारत’ या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदी आमिर खान होता.
  • परंतु आता अतुल्य भारत मोहिमेच्या जाहिरातील अभिनेता आमिर खानऐवजी अमिताभ बच्चन  दिसणार आहेत.
  • आमिर खानबरोबरचा करार संपल्यानंतर आता पर्यटन मंत्रालयाने अमिताभ बच्चन यांची नियुक्ती केली आहे.
  • यापूर्वी, अमिताभ बच्चन हे गुजरात पर्यटन खात्याच्या ‘खुशबू गुजरात की’ या मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसिडर होते.

‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा मान महाराष्ट्राला :

  • भारताची औद्योगिक शक्ती जगाला दाखिवण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ‘मेक इन इंडिया सप्ताह’ आयोजित करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे.
  • मुंबईमध्ये होणारा हा जागतिक औद्योगिक सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्वांनी ‘टीम महाराष्ट्र’ म्हणून काम करु या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
  • या सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
  • ‘मेक इन महाराष्ट्र’ सप्ताहाच्या लोगो अनावरणाचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृहात झाला.

जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी :

  • केंद्राच्या नमामि गंगे योजनेअंतर्गत खासगी आणि सरकारी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • कंपनी कायद्यानुसार सुरु होणारा हा विशेष प्रकल्प आहे.
  • त्यासाठी सरकारने यंत्रणेचे स्वरूप, नियामक मंडळ, बाजारपेठ इत्यादी सर्व मुद्द्यांचा विचार करून त्याची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.
  • गंगा नदीच्या पाण्यावर ही प्रक्रिया केली जाणार आहे.
  • जलस्रोत मंत्रालयाने अगोदरच रेल्वेशी करार केला आहे. त्यानुसार रेल्वे अशा प्रकल्पातील शुद्धीकरण केलेले पाणी खरेदी करेल.

घड्याळ बनवणाऱ्या एचएमटी कंपनी बंद करण्याचा निर्णय :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घड्याळ बनवणाऱ्या कंपन्या एचएमटी वॉचेस आणि एचएमटी चिनार वॉचेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • याच समूहाची आणखी एक कंपनी एचएमटी बेअरिंग्जदेखील बंद होणार आहे.
  • या तीनही कंपन्या अनेक दिवसांपासून तोट्यात आहेत. या कंपन्यांना पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
  • सप्टेंबर 2014 मध्येच सरकारने एचएमटीला बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

‘पवन हंस लिमिटेड’ या कंपनीबरोबर सहकार्य करार :

  • महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने ‘पवन हंस लिमिटेड’ या कंपनीबरोबर सहकार्य करार करून मुंबईत हेली-टुरिझमला प्रारंभ केला आहे.
  • राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते या हवाई पर्यटनाचा शुभारंभ करण्यात आला.
  • ‘हेली-टुरिझममुळे पर्यटकांना अधिकाधिक चांगला अनुभव मिळावा’, अशी मूळ संकल्पना असणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे.
  • भारतात अशाप्रकारे राबवण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम आहे.
  • हेलिकॉप्टर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना करांसहित प्रतिव्यक्ती 32,000 रुपये शुल्क भरावे लागेल.

दिनविशेष :

  • शहीद दिन : पनामा.
  • राष्ट्रीय पर्यटन दिन : भारत
  • 1917 : पहिले महायुद्ध – रफाची लढाई.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.