Current Affairs of 10 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (10 जानेवारी 2016)

दारूगोळ्याची संशोधकांकडून यशस्वी चाचणी :

  • भारताचा सर्वाधिक शक्तिशाली रणगाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जुनसाठी तितकेच ताकदवान तोफगोळे तयार करण्यात आले असून, आज संरक्षण संशोधकांनी याची यशस्वी चाचणी घेतली.
  • ओडिशातील चांदीपूर येथे ही चाचणी घेण्यात आली असून या वेळी रणगाड्यांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
  • पुण्यातील “डीआरडीओ”च्या लॅबोरेटरीज आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट आणि हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च या संस्थांनी हा दारूगोळा तयार केला आहे.
  • तसेच हा दारूगोळा तयार केला जात असताना प्रयोगशाळेत प्रत्येक टप्प्यावर त्याच्या तीव्रतेच्या चाचण्या घेण्यात आल्या.
  • दारूगोळ्याचे भारतातच मूल्यमापन करण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे अर्जुनचे बळ कित्येक पटीने वाढणार आहे.

नव्या राज्यघटनेसाठी श्रीलंकेमध्ये प्रक्रिया सुरू :

  • देशासाठी नवी राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रियेला श्रीलंकेच्या संसदेमध्ये सुरवात झाली.
  • सर्व सदस्यांचे मिळून घटना मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी संसदेमध्ये सादर केला.
  • घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी सर्व सदस्यांचा सहभाग आवश्‍यक असून, त्यावर नियंत्रण आणि समन्वय ठेवण्यासाठी 17 सदस्यांची नियुक्ती करावी, असे विक्रमसिंघे यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.
  • अध्यक्षांना सर्वोच्च अधिकार असलेली 1978 मध्ये स्वीकृत केलेल्या राज्यघटनेऐवजी नवी राज्यघटना अस्तित्वात आणली जाणार आहे.

नेताजींच्या मृत्यूबाबतच्या प्रत्यक्षदर्शींची जबानी प्रसिद्ध :

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातातच मृत्यू झाल्याचा दावा करणाऱ्या ब्रिटनमधील एका संकेतस्थळाने आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ प्रत्यक्षदर्शींनी दिलेली जबानी प्रसिद्ध केली आहे.
  • सुभाषबाबू आणि इतर तेरा ते चौदा जणांना घेऊन जाणाऱ्या जपानच्या हवाई दलाच्या विमानाने व्हिएतनाममधील टर्बन येथून 18 ऑगस्ट 1945 ला उड्डाण केले होते. या विमानामध्ये जपानचे लष्करी अधिकारी ले. जन. सुनामासा शिदेई हेसुद्धा होते.
  • www.bosefiles.info या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.
  • तसेच या अपघाताची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीसमोर साक्षीदारांनी दिलेली माहिती संकेतस्थळावर आहे.

मंत्रालयात ‘सिंगल विंडो सीएसआर सेल’ स्थापन करा :

  • राज्यातील सामाजिक प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंगल विंडो सीएसआर सेल स्थापन करावा, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य सरकारला केली.
  • उद्योगजगताला ज्या क्षेत्रात सीएसआर निधीचा वापर करण्यात स्वारस्य आहे, त्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची मुभा त्यांना मिळावी, जेणेकरून त्यांना त्या कामाची व्यवहार्यता तपासता येईल, अशी सूचना राज्यपालांनी केली.
  • सीएसआर कार्यक्रमांतर्गत उद्योगजगताकडून सरकारकडे येणाऱ्या विविध प्रकल्पांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी तसेच त्यांना आवश्‍यक सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात एका विशेष कार्य अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
  • हा अधिकारी सरकार आणि उद्योगजगत यांच्यात समन्वय साधण्याचे काम करील.

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू :

  • मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर नव्या सरकारच्या स्थापनेला विलंब होत असल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
  • राज्याचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी केलेल्या शिफारशीच्या आधारे, केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यात राज्यपालांची राजवट लागू करण्याची केलेली शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केली.

कृष्णविवर शोधण्याची नवी पद्धती विकसित :

  • भारतीय वंशाच्या एका अमेरिकी प्राध्यापकाच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या पथकाने कृष्णविवर शोधण्याची नवीन पद्धती विकसित केल्याचा दावा केला आहे.
  • ते छोटी आकाशगंगा शोधण्यात आणि आकाशगंगेत असलेल्या बाहेरील थरातील तरंगाचा तपशील देईल.
  • रोसेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील सहायक प्राध्यापक सुकन्या चक्रवर्ती यांनी आकाशगंगेतील अंतर्गत संरचना आणि द्रव्यमान मोजण्यासाठी आकाशगंगेच्या डिस्कमधील तरंगाचा वापर केला.
  • या संशोधनाचे निष्कर्ष चक्रवर्ती यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष अ‍ॅस्ट्रोफिजिकल रिसर्च लेटर्सकडे सोपविण्यात आले आहेत.
  • अदृश्य पार्टिकलला कृष्णविवर किंवा डार्क मॅटर म्हटले जाते. त्यात या ब्रह्मांडाचा 85 टक्के भाग सामावला आहे.

सोनाली कुलकर्णी ‘सखी मंच’ची ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’ :

  • विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोकमतने ‘सखी मंच’हा उपक्रम सुरू केला.
  • महिलांचे केवळ मनोरंजनच नाही, तर त्यांना यामधून काही तरी शिकता यावे, त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचावे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
  • यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन यामध्ये केले जाते. यंदाच्या वर्षी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या लोकमत सखी मंचची 2016-17 वर्षांसाठी अ‍ॅम्बॅसिडर असणार आहेत.

ट्विटर संदेशाची अक्षर मर्यादा दहा हजार पर्यंत करणार :

  • ट्विटर या मायक्रोब्लॉिगग संकेतस्थळावरून पाठवल्या जाणारया संदेशांची अक्षर मर्यादा आता 140 वरून दहा हजार करण्याची शक्यता आहे, सध्या या ब्लॉगचे असलेले 30 कोटी वापरकत्रे त्यामुळे वाढतील अशी अपेक्षा आहे.

दिनविशेष :

  • मार्गारेट थॅचर दिन : फॉकलंड द्वीप
  • 1840 : इंग्लडने पेनी पोस्ट सेवा सुरु केली.
  • 1920 : जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. याच दिवशी युनोचे पहिले अधिवेशन भरले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.