Current Affairs of 8 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (8 जानेवारी 2016)

युद्धनौकाही ‘मेड इन इंडिया’ :

  • स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस कदमत‘ या पाणबुडीविरोधी युद्धनौकेचे नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर. के. धवन यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले.
  • या युद्धनौकेमधील बहुतांश भाग हे स्वदेशी बनावटीचे आहेत, मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत या युद्धनौकेची निर्मिती करण्यात आली आहे.
  • या वेळी आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना धवन यांनी विस्ताराने आपले विचार मांडले.
  • ते म्हणाले, ही युद्धनौका म्हणजे भारतीय नौदलाच्या स्वयंनिर्भरतेच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे.
  • आपले नौदल हे निर्मिती करणारे असून, ते केवळ खरेदी करणारे नाही. ही पाणबुडी नौदलाच्या पूर्व आघाडीचा अविभाज्य भाग असेल.

इस्राईलमधील भारताच्या राजदूतपती नियुक्ती :

  • ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी पवन कपूर यांची इस्राईलमधील भारताच्या राजदूतपती नियुक्ती करण्यात आली आहे.
  • कपूर हे सध्या मोझांबिकमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत.
  • या वर्षी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानूह भारत दौऱ्यावर येणार असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर कपूर यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मुद्रा लिमिटेडचे रूपांतर मुद्रा बँकेत :

  • बिगरबँक वित्तसंस्था असलेल्या मुद्रा लिमिटेडचे रूपांतर मुद्रा बँकेत करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
  • त्याचबरोबर प्रधानमंत्री मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी (मुद्रा) योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जांसाठी पतहमी निधीची उभारणी करण्यासही सरकारने मान्यता दिली आहे.
  • यामुळे मागासवर्गीय तसेच छोटे उद्योजक यांना पतपुरवठा होणे अधिक सोपे जाणार आहे.
  • यापुढे मुद्रा लिमिटेड ही मुद्रा स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अर्थात मुद्रा सिडबी या नावे ओळखली जाणार आहे.
  • मुद्रा सिडबी बँक पुनर्वित्त पुरवठ्याकडे लक्ष देतानाच पूरक सेवाही पुरवणार आहे.

भारताचे फिफा मानांकनामध्ये स्थान सुधारले :

  • सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने फिफा मानांकनामध्ये 3 स्थानांनी सुधारणा केली.
  • भारतीय संघ ताज्या क्रमवारीमध्ये 163 व्या स्थानी आहे.
  • भारताने 3 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या सॅफ कप फायनल्समध्ये अफगाणिस्तानचा 3-2 असा पराभव केला.
  • भारताच्या खात्यावर 139 मानांकन गुणांची नोंद आहे.

‘नेटफ्लिक्‍स’ या कंपनीने भारतीय बाजारात पदार्पण :

  • ‘ऑन-डिमांड व्हिडिओ स्ट्रिमिंग’ सेवा देणाऱ्या ‘नेटफ्लिक्‍स’ या कंपनीने भारतीय बाजारात पदार्पण केले आहे.
     
  • नव्या बाजारांमध्ये पदार्पण केल्याने नेटफ्लिक्‍सची सेवा आता जगातील 190 देशांमध्ये सुरू झाली आहे.
  • भारतातील वाढत्या संख्येच्या ‘नेटकऱ्यां’साठी’ ही चांगली बातमी असली तरीही यामुळे ‘ऑन-डिमांड व्हिडिओ स्ट्रिमिंग’ सेवा देणाऱ्या सध्याच्या कंपन्यांसमोर तगडा प्रतिस्पर्धी उभा ठाकणार आहे.

प्रियंकाला अमेरिकेत पीपल्स चॉईस अवॉर्ड :

  • बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने 2016 चा ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ पटकावला आहे.
  • अमेरिकन टी.व्ही. मालिका ‘क्वान्टिको’ तील भूमिकेसाठी प्रियंकाला हा अवॉर्ड मिळाला.
  • या मालिकेत तिने प्रशिक्षणार्थी एफबीआय एंजटची भूमिका साकारली होती.
  • हा अवॉर्ड पटकावणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

पृथ्वीपेक्षाही जुनी उल्का :

  • ऑस्ट्रेलियन संशोधकांना साधारण साडेचार अब्ज वर्षांपूर्वीची म्हणजेच पृथ्वीपेक्षाही जुनी समजली जाणारी उल्का कोरड्या पडलेल्या सरोवराच्या तळाशी सापडली.
  • मावळत्या वर्षाच्या सायंकाळी उत्तर-दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या कटी थांडा-एरे सरोवरात ही उल्का सापडली.
  • ही उल्का पृथ्वीपेक्षाही जुनी आहे.
  • साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला आकाराला येण्याच्या प्रारंभीच्या काळातील साहित्य म्हणून ती उदाहरणादाखल उपलब्ध असल्याचे ब्लांद यांनी एबीसीला सांगितले.

उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्बची चाचणी यशस्वी :

  • उत्तर कोरियाने पेइचिंग येथील केंद्रावर पहिल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली.
  • स्फोट इतका शक्तिशाली होता की त्या भागात भूकंप झाला आणि रिश्टर स्केलवर त्याची 5.1 इतकी नोंद झाली.
  • अण्विक क्षमतेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने उ.कोरियाचे हे महत्त्वाचे पाऊल आहे.

दिनविशेष :

  • विसावे शतक : जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना.
  • 1908 : बालवीर चळवळीस प्रारंभ

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.