Current Affairs of 7 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 जानेवारी 2016)
महत्त्वाकांक्षी “स्टॅंडअप’ योजनेला मंजुरी :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी “स्टॅंडअप इंडिया‘ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
- अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांमध्ये तसेच महिलांमध्ये उद्योगक्षमता वाढविण्यासाठी ही योजना महत्त्वाची असून, 2.5 लाख जणांना याचा फायदा मिळेल, असा सरकारचा दावा आहे.
- यासोबतच “मुद्रा‘ योजनेसाठी कर्ज हमी निधी बनविण्यावरही मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.
Must Read (नक्की वाचा):
एका क्लिकवर वर्ल्ड ई-बुक लायब्ररी :
- एक लाख विषय पाच लाख लेखक आणि तब्बल नव्वद लाख पुस्तकं तेही एका क्लिकवर वर्ल्ड ई-बुक लायब्ररीचा हा खजिना देशभरातल्या ग्रंथालयांपर्यंत पोचवणे शक्य झाले आहे.
- केंद्र सरकारची “डिलिव्हरिंग लायब्ररी नेटवर्क‘ अर्थात डेलनेट यंत्रणा देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्रंथालये आणि वर्ल्ड ई-बुक लायब्ररीमधील दुवा ठरते आहे.
- डेलनेटचे सदस्य असणाऱ्या सुमारे साडेपाच हजार ग्रंथालयांना जागतिक ग्रंथालयाच्या पुस्तकांचा खजिना उपलब्ध असल्याची माहिती डेलनेटच्या प्रकल्प व्यवस्थापक संगीता कौल यांनी दिली.
नेपाळचे पंतप्रधान प्रथम भारतातच :
- नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली भारताला भेट देणार असल्याची माहिती उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री कमल थापा यांनी दिली.
- नेपाळच्या नव्या पंतप्रधानांनी सत्तेवर आल्यावर प्रथम भारताला भेट देण्याची परंपरा आहे.
- भारतीय वंशाचे असलेले मधेशी सध्या नेपाळच्या नव्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करीत असून, आणखी हक्कांची मागणी त्यांनी केली आहे.
विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्णपदक पटकावले :
- स्वीडिश ग्रांप्री स्पर्धेत भारताची नेमबाज अपूर्वी चंदेलाने महिला गटात दहा मीटर एअर रायफल प्रकारात 211.2 गुणांसह नव्या विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्णपदक पटकावले.
- तिने चीनच्या ऑलिम्पिक सुवर्णविजेत्या यी सिलिंगच्या 211 गुणांचा विक्रम मोडीत काढला.
- स्वीडनच्या एस्ट्रीड स्टीफेन्सनने 207.6 गुणांसह रौप्य, तर स्टीन नीलसनने 185.0 गुण मिळवित कांस्यपदक संपादन केले.
- चंदेलाने गत महिन्यात झालेल्या राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.
बीएस-6 नियम देशात एप्रिल 2020पासून :
- वाहनांच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने 1 एप्रिल 2020पासून भारत स्टेज (बीएस) 6 हा कडक उत्सर्जनाचा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला.
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंतरमंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- सरकारने 1 एप्रिल 2020पासून बीएस-4वरून थेट बीएस-6 नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री यांचे निधन :
- जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांचे दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले.
- श्वसनास त्रास होऊ लागल्याने सईद यांना काही दिवसांपूर्वी उपचारांसाठी ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- ते 79 वर्षांचे होते.
- गेल्यावर्षी काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर 1 मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा