Current Affairs of 9 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 फेब्रुवारी 2017)

चालू घडामोडी (9 फेब्रुवारी 2017)

भारताच्या ज्युनिअर संघाने इंग्लंडविरूद्ध मालिका जिंकली :

 • भारताच्या अंडर 19 संघाने इंग्लंडच्या ज्युनिअर संघाविरुद्ध पाचवा आणि अखेरचा एकदिवसीय सामना टाय ठरल्याने पाच सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली.
 • मालिकेत निर्णायक आघाडी घेतलेल्या भारतीय संघाला अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज होती; परंतु दहाव्या क्रमांकावरील फलंदाज इशान पोरेल झेलबाद झाला. त्यामुळे भारताचा संघ 226 धावांवर सर्व बाद झाला. तत्पूर्वी, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 226 धावा केल्या होत्या.
 • भारतीय संघ 50 षटकांत सर्व बाद 226 या मध्ये एस. राधाकृष्णन 65, आयुष जामवाल 40, यश ठाकूर 30 धावा काढल्यात तर गोलंदाजी मध्ये आयुष जामवाल 3/52, ईशान पोरेल 2/25 अशी कामगिरी केली.

राज्य वनविभागात गुप्तहेर खाते स्थापन होणार :

 • वन्यजीव, चंदन, सागवान वृक्षांची तस्करी, वाघांच्या शिकारींचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आदींवर अंकुश ठेवण्यासाठी, राज्य वनविभागातही गुप्तहेर खाते स्थापन केले जाणार आहे. त्यासाठी सध्या पुणे येथील ‘इंटेलिजन्स’ अकादमीत निवडक वनाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
 • केंद्रीय अन्वेषण विभागाने व्याघ्र शिकारीसंदर्भात दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाने वन्यजीव, वनांच्या संरक्षणासाठी कृती आराखडा तयार केला आहे. या अहवालाच्या आधारे वनविभागात स्वतंत्र गुप्तहेर खाते स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • तसेच या गुप्तहेर खात्यात तज्ज्ञ, प्रशिक्षित वनाधिकारी असावेत, यासाठी पहिल्या टप्प्यात पुण्यात प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे.
 • पोलीस, लष्कराच्या धर्तीवर वनाधिकाऱ्यांना वन्यजीव गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा मागोवा, तपासकार्यात श्वानाची मदत, सीमेपार तस्करांचे जाळे शोधणे, आरोपींना जेरबंद करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र, खबऱ्यांचे जाळे निर्माण करणे आदी गोष्टींचे प्रशिक्षण दिले जात आहे.
 • वाघांसह वनविभागाची संपदा सुरक्षित ठेवण्यासाठी राज्याचे 11 वनविभाग, सहा व्याघ्र प्रकल्पात या खात्याची स्थापना केली जाणार आहे. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशातही अशा प्रकारचे गुप्तहेर खाते स्थापन केले जाणार आहे.

ऑनलाइन वेतन कायदयास संसदेची मंजुरी :

 • औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन धनादेशाव्दारे किंवा थेट त्यांच्या बँक खात्यांत जमा करण्याबाबतच्या विधेयकाला संसदेने 8 फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली. या कायद्यामुळे वेतनाची ही पद्धत अवलंबण्याची गरज असलेले उद्योग निश्चित करण्याचा राज्य व केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे. वेतनातील पारदर्शकतेसाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जाते.
 • वेतन (दुरुस्ती) विधेयक 2017 ला राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजुरी मिळाली. या कायद्यानुसार रोजगारदात्याला कर्मचाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय त्याचे वेतन धनादेशाव्दारे किंवा थेट त्याच्या बँक खात्यात जमा करता येईल. या विधेयकाला लोकसभेत मिळाली होती.
 • कर्मचाऱ्यांना धनादेश किंवा त्यांच्या बँक खात्यात वेतन जमा करणे आवश्यक असलेली औद्योगिक व इतर आस्थापने निश्चित करण्याचा अधिकार या कायदयाव्दारे सरकारला मिळाला आहे.
 • वेतनाचा हा मार्ग अवलंबिणे, आवश्यक असलेल्या उद्योगांबाबत राज्यांना अधिसूचना काढता येईल.
 • तसेच या कायद्यातील कलम 20 नुसार कायद्याचे उल्लंघन केल्यास सहा महिन्यांची कैद होऊ शकते. शिवाय कारखाना कायदा 1948 नुसारही निरीक्षक कारवाई करू शकतो.

तांदळाची कीडमुक्त प्रजाती चीनमध्ये विकसित :

 • चिनी वैज्ञानिकांनी तांदळाची नवी प्रजाती तयार केली असून ती रोगप्रतिकारककीटकांना दाद न देणारी आहे.
 • जनुकाधारित ब्रीडिंग चीप तंत्रज्ञान त्यात वापरण्यात आले आहे. भाताची नवीन प्रजाती एप्रिलमध्ये हेलाँगजियांग प्रांतात तयार करण्यात आल्याचे राष्ट्रीय बियाणे गटाने जाहीर केले आहे.
 • तांदळाची नवीन प्रजाती रोगप्रतिकारककीटकरोधी आहे व तशा प्रकारची ती जगातील पहिलीच प्रजाती असल्याचे सांगण्यात आले.
 • मध्य चीनमधील हुबेई प्रांतात रोंगझांग कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ग्रुप या संस्थेशी बियाणाबाबत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • कीडनाशकांचा वापर हा पर्यावरण व अन्न सुरक्षेला हानिकारक असतो विशेष करून रासायनिक खतेही आरोग्याचे नुकसान करीत असतात असे चायनीज अ‍ॅकॅडमीज ऑफ सायन्सेस या संस्थेचे झांग क्विफा यांनी सांगितले.

दिनविशेष :

 • स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1874 रोजी झाला.
 • साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना सन 1933 मध्ये श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
 • 9 फेब्रुवारी 1951 रोजी स्वतंत्र भारताच्य पहिल्या जनगणेचे काम सुरु झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World