Current Affairs of 8 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 फेब्रुवारी 2017)

चालू घडामोडी (8 फेब्रुवारी 2017)

ED प्रमुखांना 2 वर्षांचा स्थिर कार्यकाळ :

 • सक्त वसुली संचलनालयाचे (ईडी) प्रमुख कर्नालसिंग यांना दोन वर्षांचा स्थिर कार्यकाळ केंद्र सरकारने 7 फेब्रुवारी रोजी जाहीर केला. सिंग यांना कार्यकाळ देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
 • कर्नालसिंग हे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) 1984 च्या बॅचचे अधिकारी आहेत. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये सिंग यांची ‘ईडी’च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते या वर्षी ऑगस्ट महिन्यात निवृत्त होत आहेत.
 • आता मंत्रिमंडळाच्या निवड समितीने त्यांना दोन वर्षांचा स्थिर कार्यकाळ देण्यास मंजुरी दिली आहे. हा कार्यकाळ 27 ऑक्‍टोबर 2016 पासून गृहीत धरण्यात येणार आहे.
 • केंद्रीय दक्षता आयोग कायद्यातील तरतुदीनुसार सिंग यांना किमान दोन वर्षांचा कार्यकाळ देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच केंद्र सरकारला दिले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 फेब्रुवारी 2017)

भारतीय महिला संघाचा शानदार विजय :

 • दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी व युवा महिला फलंदाज देविका वैद्यकर्णधार मिताली राज यांची वैयक्तिक अर्धशतकी खेळी याच्या जोरावर भारताने 7 फेब्रुवारी रोजी यजमान श्रीलंकेचा 114 धावांनी पराभव केला आणि आयसीसी महिला विश्वकप पात्रता फेरीच्या स्पर्धेत शानदार सुरुवात केली.
 • ‘अ’ गटातील या लढतीत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दीप्ती शर्मा (54), देविका (89)मिताली (नाबाद 70) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 50 षटकांत 4 बाद 259 धावांची दमदार मजल मारली.
 • तसेच प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेचा डाव 8 बाद 145 धावांवर रोखला गेला. या विजयासह भारताने दोन गुणांची कमाई केली. भारतीय फिरकीपटूंनी सुरुवातीपासून श्रीलंकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

भारतीय वंशाच्या शिल्पकारला इस्राईलकडून पुरस्कार :

 • भारतीय वंशाचे प्रसिद्ध ब्रिटिश शिल्पकार अनिश कपूर (वय 62) यांना 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा इस्राईलमधील प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सीरियन निर्वासितांच्या हक्कासाठी त्यांनी केलेल्या कामाबाबत आणि ज्युईश मूल्यांच्या बांधिलकीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
 • सरकारने निर्वासितांसाठी राबविलेल्या योजनांवर त्यांनी कडाडून टीका केली होती. पुरस्कार देणाऱ्या समितीचे अध्यक्ष नतन शारांस्किए यांनी कपूर हे एक अतिशय प्रभावशाली आणि नावीन्यपूर्ण कलाकार असल्याचे या वेळी सांगितले.
 • मुंबईत जन्म झालेल्या कपूर यांचे वडील भारतीय, तर आई ज्युईश होती. पुरस्कारातून मिळालेला पैसा हा त्यांनी युद्धातील गरजूंना देण्याचे ठरविले आहे.
 • कपूर यांच्यासोबतच इत्झहाक पर्लमन, न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर मायकल ब्लुमबर्ग आणि अभिनेते दिग्दर्शक मायकल डग्लास यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

अण्णा हजारे यांना लायन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर :

 • लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे.
 • 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
 • या कार्यक्रमासाठी उद्योजक अरुण फिरोदिया, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती लायन्स क्लबचे प्रांतपाल चंद्रहास शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 • या सोहळ्यात लायन्स क्लबच्या माध्यमातून सलग 50 वर्षे व 25 वर्षे सेवा करणाऱ्या लायन्स सदस्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
 • तसेच लायन्स क्लबच्या माजी प्रांतपालांनी केलेल्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

दिनविशेष :

 • भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 रोजी झाला.
 • 8 फेब्रुवारी 1926 हा हिंदुस्थानी थोर गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.