Current Affairs of 9 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (9 फेब्रुवारी 2016)

नेट निरपेक्षता कायम राखण्याचा निर्णय :

  • इंटरनेट वापराच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्याच्या प्रयत्नांना टेलिकॉम ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) दणका दिला असून नेट निरपेक्षता (नेट न्यूट्रॅलिटी) कायम राखण्याचा निर्णय दिला आहे.
  • तसेच वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वापरण्यासाठी मोबाईल ऑपरेटर कंपन्यांनी देऊ केलेल्या प्रस्तावांवर ‘ट्राय’ने बंदी घातली आहे.
  • आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना दररोज 50 हजार रुपये असा दंड आकारला जाईल.
  • इंटरनेट सेवेसाठीच्या भेदभावपूर्ण दरआकारणीवर प्रतिबंध घालणारा ‘प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेटरी टेरिफ फॉर डेटा सर्व्हिसेज रेग्युलेशन, 2016’ आदेश ‘ट्राय’ने जारी केला.
  • ‘ट्राय’चे अध्यक्ष आर. एस. शर्मा हे आहेत.
  • तसेच आणीबाणीच्या काळात इंटरनेट सेवा पुरवठाधारक ‘टेरिफ प्लॅन’ कमी करू शकतात.

ज्येष्ठ उर्दू साहित्यिक निदा फाजली यांचे निधन :

  • ज्येष्ठ उर्दू साहित्यिक व शायर निदा फाजली यांचे (दि.8) वर्सोवा येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले, ते 78 वर्षांचे होते.
  • फाजली यांची ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता, कभी जमीं तो कभी आसमां नही मिलता’, ‘होशवालो को खबर क्या.’, ‘तू इस तरह मेरी जिंदगी मे शामिल है’, ‘दुनिया जिसे कहते है’ आदी गझलांनी खूप वर्चस्व केले.
  • मुक्तिदा हसन निदा फाजली असे त्यांचे पूर्ण नाव होते.
  • दिल्ली येथे एका काश्मिरी कुटुंबात 12 ऑक्टोबर 1938 मध्ये त्यांचा जन्म झाला.

भारतीय संघाचे निर्विवाद वर्चस्व :

  • भारतीय खेळाडूंनी कुस्ती, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, वुशू, सायकलिंग क्रीडाप्रकारांमध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.  
  • कुस्ती प्रकारात भारतीय मल्लांनी एकूण 14 सुवर्ण व 2 रौप्यपदके जिंकली.
  • वेटलिफ्टिंगमध्ये चार, जलतरणमध्ये तीन, तिरंदाजीमध्ये दोन, स्क्वॅशमध्ये एक, सायकलिंगमध्ये दोन आणि वुशूमध्ये एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले.
  • भारतीय संघाने (दि.8) पर्यंत 53 सुवर्ण, 20 रौप्य व 6 कांस्यपदके जिंकली आहेत.
  • वुशू : भारताला 1 सुवर्ण, 1 रौप्य
  • सायकलिंग : पुरुष व महिला संघांना सुवर्ण
  • स्क्वॉश : ज्योत्स्ना चिन्नप्पाला सुवर्ण
  • बॅडमिंटन : सांघिक स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण
  • तिरंदाजी : भारताला दोन सुवर्ण
  • भारोत्तोलन : कबितादेवी आणि विकास ठाकूर यांना सुवर्ण
  • भारतीय मल्लांना : 16 पैकी 14 सुवर्ण

आयकर विभागाकडून आर्थिक वर्षात रिफंड :

  • आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे.
  • केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ही माहिती दिली.
  • तसेच अधिया यांनी म्हटले की, 2015-16 या आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत 1.75 कोटी करदात्यांना 1 लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी करण्यात आला आहे.
  • करदात्यांना रिफंड लवकरात लवकर मिळावा यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) गेल्या वर्षी अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या.
  • 50 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे रिफंड लवकरात लवकर अदा करण्यात येतील.

विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विराट’ निवृत्त :

  • भारतीय नौदलाच्या सेवेत एकूण 29 वर्ष राहिलेली आणि जगातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल 57 वर्षे कार्यरत राहिलेली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विराट’ येत्या जून महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहे.
  • ‘आयएनएस विक्रांत’ या भारताच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेची निर्मिती इंग्लंडतर्फे 1945 साली करण्यात आली,तिचे सुरुवातीचे नाव ‘एचएमएस हक्र्युलस’ होते.
  • 4 मार्च 1961 रोजी ती भारतीय नौदलात दाखल झाली. त्यानंतर ‘एचएमएस हर्मिस’ भारताने ब्रिटनकडून विकत घेतली.
  • 12 मे 1987 रोजी ती भारतीय नौदलात रीतसर दाखल झाली, त्यानंतर 1997 सालपर्यंत या दोन्ही विमानवाहू युद्धनौकांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली.
  • ‘आयएनएस विक्रांत’च्या नावावर तर 1971 च्या युद्धातील गौरवास्पद कामगिरीही नोंदलेली होती.

ब्रेंडन मॅकल्‌मला विजयी निरोप :

  • न्यूझीलंड क्रिकेट संघाने (दि.8) माजी कर्णधार ब्रेंडन मॅकल्‌म याला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकून विजयी निरोप दिला.
  • तसेच तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडने 55 धावांनी विजय मिळविला.
  • मॅकल्‌मचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. या मालिकेनंतर निवृत्त होणार आहे.

अग्निशामक दलातही महिला ब्रिगेड :

  • अग्निशामक दलासारख्या आव्हानात्मक क्षेत्रातही आता महिलांना चमक दाखवण्याची संधी मिळणार आहे.
  • राज्य सरकारने ‘फायर अकादमी’साठी पुढाकार घेतल्याने महिलांनाही या क्षेत्रात कामगिरीची संधी मिळणार आहे.
  • ही अकादमी पालघर येथे होणार आहे.
  • तसेच या आधी नवी मुंबई आणि भिवंडीत हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार होता; पण पालघरमध्ये नवनवीन आस्थापनांचे जाळे तयार होत असल्याने फायर अकादमी तिथेच सुरू करण्याचे ठरले आहे.
  • आपत्कालीन स्थितीत अद्ययावत संभाषण यंत्रणेसाठी महिलांची मदत होऊ शकेल.
  • तसेच यंत्रणेशी संबंधित कामासाठी महिलांची मदत उपयुक्त ठरेल, असे राज्य सरकारचे अग्निशामक सल्लागार मिलिंद देशमुख यांनी संगितले

दिनविशेष :

  • 1874 : स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद यांचा जन्म.
  • 1951 : स्वतंत्र भारताच्य पहिल्या जनगणेचे काम सुरु झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.