Current Affairs of 10 February 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (10 फेब्रुवारी 2016)
महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरणाला मान्यता :
- आगामी पाच वर्षांत जागतिक पातळीवर इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून महाराष्ट्राची प्रतिमा निर्मिती करण्याचे सामर्थ्य असलेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरणाला (दि.9) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
- तसेच या धोरणाच्या पुढील पाच वर्षांच्या कालावधीत राज्यात 300 कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीसह 1200 कोटी डॉलर्सच्या उलाढालीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, एक लाख अतिरिक्त रोजगाराची निर्मिती अपेक्षित आहे.
- गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी राज्यात अनुकूल वातावरण निर्माण करून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन करण्यास चालना देणे.
- राज्यातील इलेक्ट्रॉनिक्स व अभियांत्रिकी क्षेत्रात नावीन्यपूर्ण बदल करण्यासह राज्यात संशोधन व विकास प्रणाली निर्माण करून या क्षेत्राचा शाश्वत विकास करणे.
- इलेक्ट्रॉनिक्स रचना प्रणाली व उत्पादक उद्योग या क्षेत्राशी संबंधित कौशल्यवृद्धी व प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेणे.
- इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक उद्योग घटक स्थापन करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करणे आदींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
11 मार्च रोजी महाजेल भरो आंदोलन :
- गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर राज्य सरकारने चालढकल धोरण स्वीकारले आहे, त्यामुळे कामगार वर्गात सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
- याविरुद्ध गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने 11 मार्च रोजी महाजेल भरो आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
- ‘महाजेल भरो आंदोलना’साठी कामगार संघटनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत गिरणगावात सर्वत्र सभा पार पडत आहेत.
- 28 फेब्रुवारीपर्यंत या सभा शहर-उपनगरातील विविध ठिकाणी होणार आहेत.
भारत प्रथम क्रमांकावर :
- भारतीय खेळाडूंनी जलतरण, तिरंदाजी, अॅथलेटिक्स, भारोत्तोलन, सायकलिंग क्रीडा प्रकारात सुवर्णपदकांची लयलूट करून 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी आपला दबदबा कायम राखला.
- भारत (दि.9) पर्यंत एकूण 76 सुवर्ण, 36 रौप्य व 10 कांस्य (एकूण 122) जिंकून प्रथम क्रमांकावर आहे.
- श्रीलंका संघ 17 सुवर्ण, 36 रौप्य व 31 कांस्य पदके (एकूण 84) जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- मैदानी स्पर्धेत (दि.9) भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या श्रद्धा घुलेला लांब उडीत तृतीय तर 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत स्वाती गाढवेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
देशभरात एकच वैद्यकीय सीईटी :
- देशभर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सरकारी आणि खासगी महाविद्यालयांत एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे.
- लवकरच या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार आहे.
- तसेच यासाठी 1956 च्या इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्यातही सुधारणा करण्यात येणार आहे.
- देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
भारतीय युवा क्रिकेट संघ अंतिम फेरीत :
- विश्वकरंडक युवक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेचा 97 धावांनी पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला, यामुळे भारतीय युवा संघही यंदा विश्वकरंडक उंचावण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
- श्रीलंकेच्या संघाला 170 धावांमध्ये तंबूत परत लावत सामना जिंकला. अनमोलप्रीत सिंग (72 धावा) आणि सर्फराज खान (59 धावा) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने श्रीलंकेपुढे विजयासाठी 268 धावांचे आव्हान ठेवले होते.
- भारताने या एकोणिस वर्षांखालील युवकांच्या स्पर्धेत आतापर्यंत एकही लढत गमावलेली नाही, तर श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर चांगलीच भरारी घेतली.
कोकण रेल्वे मार्गावर 11 नवीन स्थानकांचा समावेश :
- कोकण रेल्वेवर कोलाड ते ठोकुर दरम्यान दुहेरीकरण करण्याबरोबरच या मार्गावर 11 नवीन स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे.
- कोकण रेल्वे मार्गावर कोलाड ते ठोकुर या 741 किलोमीटरपर्र्यतचे टप्प्याटप्यात दुहेरीकरण केले जाणार आहे.
- कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करताना प्रवाशांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार नव्या अकरा स्थानकांचा समावेशही करण्यात आला आहे.
- सध्या कोलाड ते ठोकुरपर्यंत 65 स्थानके असून आता ही संख्या 76 होणार आहे.
- कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनीही 11 नवीन स्थानकांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे सांगितले.
पहिले ‘एव्हिएशन पार्क’ गुजरातमध्ये :
- देशातील पहिले ‘एव्हिएशन पार्क’ गुजरातमध्ये साकारले जाणार आहे.
- राज्यातील हवाई उड्डयन क्षेत्र मजबूत करण्यासाठी गुजरात शासनाने हा निर्णय घेतला आहे.
- तसेच या पार्कमध्ये धावपट्टी, प्रशिक्षण केंद्र, हेलिपॅड, तसेच लघुनिर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात येतील.
- हवाई उड्डयन क्षेत्रातील क्षमतेबाबत विद्यार्थी, उद्योजक, धोरण निर्माते, तसेच व्यवसाय क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी या एकीकृत ‘पार्क’चे निर्माण करण्यात येत आहे, अशी माहिती ‘गुजसेल’च्या (गुजरात स्टेट एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लि.) अधिकाऱ्यांनी दिली.
- राज्य शासनाने या प्रकल्पाची जबाबदारी ‘गुजसेल’कडे दिली आहे.
- तसेच हे ‘पार्क’ तयार करण्यासाठी ‘गुजसेल’ने बागडोरा येथील 60 हेक्टर जमीन निर्धारित केली आहे.
- जगात अशा प्रकारचे केवळ 3 ते 4 ‘एव्हिएशन पार्क’ आहेत.
दिनविशेष :
- 1921 : काशी विद्यापीठाचे गांधीजींच्या हस्ते उदघाटन झाले.
- 1929 : राष्ट्रीय विद्यापिठाची स्थापना झाली.
- 1931 : भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
- 1949 : पुणे विद्यापीठाची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा