Current Affairs of 8 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (8 फेब्रुवारी 2016)

उद्योजकांसाठी ‘स्टार्ट अप्स महाराष्ट्र’ ही योजना :

  • रोजगारनिर्मिती करून अर्थव्यवस्था बळकट करणाऱ्या नव्या उद्योजकांसाठी राज्य सरकारने ‘स्टार्ट अप्स महाराष्ट्र’ ही योजना आखली आहे.
  • तसेच या योजनेमुळे उद्योग उभारणीची प्रक्रिया सुलभ होणार असून, तिचे स्वतंत्र धोरण ठरविण्यात येत आहे, अशी माहिती राज्याच्या उद्योग खात्याचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी दिली.
  • राज्यातील ‘स्टार्ट अप्स’निर्मितीची गरज ओळखून त्यांना नेमक्‍या सवलती देण्याचा योजनेचा उद्देश आहे.
  • देशात प्रथमच राज्याच्या पातळीवर अशा प्रकारची स्वतंत्र योजना राबविली जाणार आहे.
  • ‘नव्या उद्योगाच्या उभारणीच्या प्रक्रियेत प्रशासकीय हस्तक्षेप होणार नाही,’ याची काळजी नव्या धोरणात घेतली जाणार आहे.
  • उद्योजकांशी संवाद साधूनच हे धोरण ठरविण्यात येत असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन :

  • न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात उत्तर सादर करण्यापूर्वी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याचा (दि.7) निर्णय घेतला.
  • व्यवसायाने वकील असलेले बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आपल्या विधी समितीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.
  • बीसीसीआयच्या नियमानुसार एजीएमच्या आयोजनासाठी 21 दिवसांपूर्वी नोटीस देणे आवश्यक आहे, पण विशेष अधिकाराचावापर करीत अध्यक्ष सचिवांना कमी वेळेच्या नोटीसवर एजीएमचे आयोजन करण्याची सूचना करू शकतात.
  • तसेच अशा परिस्थितीत किमान 10 दिवसांपूर्वी नोटीस देणे आवश्यक आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने 4 फेब्रुवारी रोजी स्पष्ट केले होते की, ‘समितीच्या शिफारशी साध्या सरळ, तर्कसंगत, समजण्यायोग्य आणि आदर करण्यासारख्या आहे.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्णमय कामगिरी कायम :

  • यजमान भारताने 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही सुवर्णमय कामगिरी कायम राखली.
  • भारताने जलतरण, कुस्ती आणि भारोत्तोलन या क्रीडाप्रकारांमध्ये वर्चस्व कायम राखताना जास्तीत जास्त सुवर्णपदकांवर नाव कोरले.
  • भारताने 28 सुवर्ण, 12 रौप्य आणि 3 कांस्यपदकांसह एकूण 43 पदकांची कमाई करताना अव्वल स्थान कायम राखले.
  • श्रीलंका 8 सुवर्ण, 17 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.
  • भारताने(दि.7) सर्वाधिक पदकांची कमाई जलतरणामध्ये केली, भारताने जलतरणामध्ये 10 पदके पटकावली, त्यात चार सुवर्ण, पाच रौप्य व एक कांस्यपदकांचा समावेश आहे.
  • जलतरणामध्ये (दि.7) सात स्पर्धा झाल्या, त्यात पाच नवे विक्रम नोंदवले गेले.
  • भारताच्या संदीप सेजवालने नवा विक्रम नोंदवताना सुवर्णपदक जिंकले.

अमेरिकेतील निवडणुकीविषयी :

  • अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून, नोव्हेंबर 2016 मध्ये होणाऱ्या या निवडणुकीची जगभर चर्चा होताना दिसत आहे.
  • अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीविषयी खास ‘ईसकाळ‘साठी कनेक्टिकट राज्यातील स्टॅमफोर्ड शहरात राहणारे वाचक प्रदीप जाधव वार्तांकन करणार आहेत.
  • जगभरातील ईसकाळच्या वाचकांना प्रदीप जाधव सहजसोप्या भाषेतून निवडणुकीविषयी इत्यंभूत माहिती पुरविणार आहेत.
  • प्रदीप जाधव हे मुळचे पुण्याचे रहिवाशी असून, ते 1977 पासून अमेरिकेत स्थायिक आहेत.
  • आतापर्यंत अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुका जवळून पाहिलेले प्रदीप जाधव यंदाची निवडणूक आपल्यापर्यंत पोचविणार आहेत.
  • अमेरिकन घटनेने लेजिस्लेटिव्ह ब्रँचला काही मुख्य व महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत:  
  • आर्थिक (फायनान्स), अर्थसंकल्प (बजेट) व कर (टॅक्सेशन) संदर्भात अधिकार
  • कर जमा करुन मिळविलेल्या उत्पन्नातून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत व कल्याणकारी प्रकल्पांकरिता आर्थिक तजवीज करणे
  • पेटंट्स (वस्तु हक्क) व कॉपी राईट्स (मालकी हक्क) मंजूर करणे व मान्यता देणे
  • अमेरिकेच्या टपाल खात्याची जबाबदारी देखील या खात्यावर आहे.
  • युद्ध घोषित करण्याचे अधिकार या ब्रँचला देण्यात आले आहेत. तो अधिकार अध्यक्षांना नाही.
  • सिनेटर्स व काँग्रेसमन्सच्या परवानगीशिवाय अमेरिका युद्ध करू शकत नाही
  • समतोलता आणि संतुलन राखण्याच्या तरतुदीनुसार ‘एक्झेक्युटिव्ह‘ ब्रँचवर देखरेख ठेवणे व कारभाराची चौकशी करणे.

उत्तर कोरियाकडून उपग्रह प्रक्षेपण :

  • उत्तर कोरियाने अग्निबाणाच्या मदतीने पृथ्वी निरीक्षण उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला.
  • जगातील अनेक देशांनी ही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचीच छुपी चाचणी होती असे सांगून निषेध केला आहे.
  • तसेच या घटनेमुळे संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे उल्लंघन झाले असून उत्तर कोरियाने अलीकडेच हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती.
  • आंतरराष्ट्रीय समुदाय उत्तर कोरियाला शिक्षा करण्यासाठी प्रयत्नशील असून अनेक र्निबध आधीच लादले आहेत, त्यात आता भर पडणार आहे.
  • अग्निबाणाने कक्षेचा अंतिम टप्पा यशस्वीरीत्या गाठला की नाही हे खात्रीलायकरीत्या समजलेले नाही पण अमेरिकी संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा अग्निबाण अवकाशात यशस्वीरीत्या उडाला.

‘यिन’ मंत्रिमंडळाची स्थापना :

  • नव्या दमाचे, नव्या उमेदीचे व युवा नेतृत्वाच्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या पहिल्या मंत्रिमंडळाची स्थापना झाली असून, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ने (यिन) या अभिनव उपक्रमाचा (दि.7) यशस्वी शुभारंभ केला.
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘यिन’च्या राज्यव्यापी नवनियुक्‍त महाविद्यालयीन प्रतिधिनींचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळाला माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी राष्ट्रहिताची व सामाजिक कर्तव्याची शपथ दिली.
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रांत निकोप व सक्षम नेतृत्व उभारण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात ‘यिन’ची बांधणी करण्यात आली आहे.
  • राज्यातील तीन हजार महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान करत आपले प्रतिनिधी निवडले आहेत.
  • तसेच या प्रतिनिधींच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात दोन या प्रमाणे 72 जिल्हा विद्यार्थी प्रतिनिधींची मतदानातूनच निवड करण्यात आली आहे.
  • प्रतिनिधींच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सरकारच्या यंत्रणेप्रमाणेच खातेनिहाय मंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

दिनविशेष :

  • भारतीय ज्ञानपीठाची स्थापना
  • 1897 : डॉ. झाकीर हुसेन, भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म.
  • 1963 : मोहम्मद अझहरुद्दीन, भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.