Current Affairs of 6 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (6 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (6 फेब्रुवारी 2016)

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार जाहीर :

  • राज्य सरकारतर्फे उत्कृष्ट मराठी वाङ्‌मयनिर्मितीसाठी दिले जाणारे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार-2014 जाहीर करण्यात आले आहेत.
  • एक लाख व 50 हजार रुपये अशा दोन विभागांत हे पुरस्कार आहेत.
  • उत्कृष्ट साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी दर वर्षी उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार दिले जातात.
  • ‘सकाळ’चे विजय नाईक, गजेंद्र बडे यांचा यात समावेश आहे.
  • काव्य विभागातील प्रथम प्रकाशनाचा एक लाख रुपयांचा कवी केशवसुत पुरस्कार मनोहर जाधव यांच्या ‘तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात’ या संग्रहाला.
  • तसेच याच विभागातील 50 हजारांचा बहिणाबाई चौधरी पुरस्कार विनायक येवले यांच्या ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरून’ या संग्रहाला मिळाला.
  • नाटक-एकांकिका विभागातील राम गणेश गडकरी पुरस्कार प्रा. मधू पाटील यांच्या ‘कामस्पर्शिता- पाच एकांकिका’ला जाहीर झाला.
  • कादंबरी विभागात एक लाख रुपयांचा हरी नारायण आपटे पुरस्कार राजन खान ‘रजे हो ऊर्फ मुद्दाम भरकटलेली कथा’ला आणि प्रथम प्रकाशन विभागातील 50 हजारांचा श्री. ना. पेंडसे पुरस्कार व्यंकट पाटील यांच्या ‘घात’ या कादंबरीला मिळाला.

जगातील सर्वात हिंसक शहर :

  • मेक्सिको सिटिजन कौन्सिल फॉर पब्लिक सिक्युरिटीने प्रसिध्द केलेया अहवालानुसार व्हेनेझुएलामधील कराकस शहर जगातील सर्वात हिंसक शहर ठरले आहे.
  • तसेच प्रत्येक वर्षी तेथे एक लाख लोकांमध्ये 120 लोकांची हत्या होत असते.
  • व्हॉयलन्स ऑब्झर्व्हेटरीच्या अंदाजानुसार, 2015 मध्ये कराकस शहरात 27 हजारापेक्षा जास्त खुन झाले आहेत.
  • मागील चार वर्षांपासून हॉन्डूरसचा सेन पेड्रो सुला शहर यादीत वरच्या क्रमांकावर होते, मात्र यंदा कराकसने आता हे स्थान मिळवले आहे.
  • सेन पेड्रो सुला हे शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अल सल्व्हाडोरचे सेन सल्वाडोर शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

‘एमसीएक्स’ला अॅसोचॅमचा पुरस्कार :

  • भारतातील क्रमांक एकचा वस्तू वायदा बाजार मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. (एमसीएक्स)ने अॅसोचॅमने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या 14 व्या कमॉडिटी फ्युचर्स मार्केट समीट आणि प्रावीण्य पुरस्कार सोहळ्यात मानाचा पुरस्कार पटकावला.
  • भारताच्या वस्तू वायदा बाजारामध्ये विविध किंमत आणि जोखीम व्यवस्थापनाचे मजबूत आणि कार्यक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल एमसीएक्सला या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
  • केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते एमसीएक्सचे सह व्यवस्थापकीय संचालक पी. के. सिंघल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

माणसाचे मन जाणून घेणारी आज्ञावली विकसित :

  • माणसाचे मन कधी कुणाला कळत नाही, एखाद्याने आपल्या मनातली गोष्ट सांगितली तर आपण त्याला मनकवडा म्हणतो खरे, पण तो केवळ योगायोग असतो.
  • एखाद्या व्यक्तीच्या मेंदूतून आलेले संदेश गोळा करून त्यांचे विश्लेषण करून लोकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयोग वैज्ञानिकांनी यशस्वी केला असून त्यात एका भारतीय वैज्ञानिकाचा समावेश आहे.
  • तसेच या प्रयोगात माणसाच्या मनातील विचार ओळखण्यात 96 टक्के यश आले आहे.
  • माणसाचे मन म्हणजे त्याचे विचार सांगणारी आज्ञावली तयार करण्यात आली आहे.
  • वॉशिंग्टन विद्यापीठातील मेंदूवैज्ञानिक राजेश राव यांनी सांगितले की, मानवी मेंदूला वस्तूंचे आकलन कसे होते व दुसरे म्हणजे एखादी व्यक्ती वास्तवात काय विचार करीत आहे हे संगणकाद्वारे कसे सांगता येईल हे आमचे दोन उद्देश होते.
  • वैद्यकीयदृष्टया तुम्ही आमचे निष्कर्ष हे सकारात्मक कारणासाठी वापरू शकता.
  • तसेच जे लोक विकलांग आहेत त्यांना मेंदूचे संदेश अवयवांपर्यंत न पोहोचल्याने हालचाली करता येत नाहीत, ही अडचण आमच्या संशोधनातून दूर होऊ शकते.

जगातील पहिली लस झिका व्हायरसवर :

  • भारत बायोटेक इंटरनॅशनलने झिका व्हायरसवर जगातील पहिली लस निर्माण केली आहे.
  • भारत बायोटेकचे प्रमुख डॉ. कृष्णा एल्ला यांनी सांगितले की, ‘आम्ही अशा प्रकारची लस निर्माण करणारी पहिली कंपनी आहोत.’
  • झिका लसीसाठी 9 महिन्यांपूर्वीच आपण पेटंट अर्ज दाखल केला आहे.
  • कंपनीने आपल्या लसीचा प्रयोग मनुष्य आणि प्राण्यांवर करण्याची परवानगी भारत सरकारकडे मागितली आहे.

रशियासोबतचा हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार :

  • रशियाच्या रोस्टेक स्टेट कार्पोरेशनच्या रोसोबोरॉन एक्सपोर्ट या कंपनीशी आधी केलेल्या करारानुसार कझान हेलिकॉप्टर प्रकल्पातून एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टर्सचा शेवटचा टप्पा भारताला देण्यात आला.
  • एकूण 151 हेलिकॉप्टर्स भारताने विकत घेतली आहेत.
  • रशियन हेलिकॉप्टर्सचा भारत हा महत्त्वाचा ग्राहक आहे.
  • रशियाकडून भारताने 400 हेलिकॉप्टर्स घेतली आहेत.
  • आता भारतीय हवाई दल आणखी 48 हेलिकॉप्टर्स घेणार असून त्यांचा वापर वाळवंटी व पर्वतीय प्रदेशात केला जाणार आहे.

दिनविशेष :

  • न्यूझीलँड वैतंगी दिन
  • जमैका, इथियोपिया बॉब मार्ली दिन
  • 2001 : पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.