Current Affairs of 9 August 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2015)
पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर जाणार :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर जाणार आहेत.
- गेल्या 34 वर्षांमध्ये यूएईचा दौरा करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान असतील.
- दुबईतील भारतीय समुदायाच्या समितीकडून (आयसीडब्लूसी) पंतप्रधान मोदींचा दुबई क्रिकेट स्टेडियमवर भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
- पंतप्रधान 16 व 17 ऑगस्टला यूएईच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे, सांगण्यात येत आहे.
- यापूर्वी यूएईच्या दौऱ्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी 1981 मध्ये गेल्या होत्या.
Must Read (नक्की वाचा):
मायकेल क्लार्कची ऍशेस मालिकेनंतर निवृत्त होणार असल्याची घोषणा :
- मायकेल क्लार्क याने ऍशेस मालिकेनंतर निवृत्त होणार असल्याची शनिवारी घोषणा केली.
- मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे होणार आहे.
- मायकेल क्लार्कने सर्वोत्तम फलंदाज म्हणून 34 वर्षीय कारकिर्दीमध्ये त्याने 114 सामन्यांत 28 शतके झळकाविली आहेत.
अण्णा हजारे यांच्या जीवनावर “अण्णा” हा हिंदी चित्रपट :
- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावर “अण्णा” हा हिंदी चित्रपट येत आहे.
- त्यात शशांक उदापूरकर अण्णांची व्यक्तिरेखा साकारत आहे.
- तसेच 1947 पासूनचा त्यांचा जीवनप्रवास यात दाखवण्यात येणार आहे.
- ‘द राईज पिक्चर्स’ बॅनरखाली निर्माते मणिंद्र जैन हा चित्रपट बनवत आहेत.
राज्यपालपदी रामनाथ कोविंद आणि आचार्य देव व्रत यांची नियुक्ती :
- बिहार आणि हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी अनुक्रमे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रामनाथ कोविंद आणि आचार्य देव व्रत यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
- उत्तर प्रदेशातील कानपूरचे 69 वर्षीय कोविंद हे दोन वेळेस राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत.
- तसेच काही महिन्यांतच बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर कोविंद यांची नियुक्ती केंद्र सरकारने केली आहे.
- पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे सध्या बिहारच्या राज्यपाल पदाचा कार्यभार आहे.
ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव एका जागतिक उपग्रहाला दिले जाणार :
- माजी दिवंगत राष्ट्रपती व थोर वैज्ञानिक ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव एका जागतिक उपग्रहाला दिले जाणार आहे.
- पृथ्वी निरीक्षण व आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी ग्लोबल स्टॅट फॉर डीआरआर हा उपग्रह संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून सोडला जाणार असून त्याला कलाम यांचे नाव दिले जाईल.
- सीएएनइयूएसच्या अवकाश तंत्रज्ञान संघटनेचे ( कॅनडा, युरोप, अमेरिका व आशिया यांची संस्था) अध्यक्ष मिलिंद पिंपरीकर यांनी ही माहिती दिली.
- या संस्थेचे मुख्यालय कॅनडातील मॉंट्रियल येथे आहे.
- तसेच 1999 मध्ये सीएएनइयूएस ही संस्था स्थापन झाली असून अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सामुदायिक पातळीवर समस्या निर्मूलनाचा या संस्थेचा उद्देश आहे.
- आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी उपग्रहांचा उपयोग करण्याचे ठरवण्यात आले असून त्यासाठी हा नवीन उपग्रह सोडला जाणार आहे.
- संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आपत्ती निवारण परिषदेच्या निमित्ताने जपानमध्ये सेंदाई येथे मार्च महिन्यात हा उपग्रह सोडण्याची घोषणा करण्यात आली होती.
- ग्लोबल सॅट उपग्रह जगातील आपत्ती व्यवस्थापन एकत्रित करता यावे तसेच पर्यावरणाचे नियोजनही करता यावे यासाठी उपयोगी पडणार आहे.
- त्या उपग्रहात अनेक संवेदक असून हवामान अंदाज व पूर, दुष्काळ, चक्रीवादळे, भूकंप व वणव्याच्या काळात माहिती पुरवण्याची व्यवस्था आहे.
दिनविशेष :
- 9 ऑगस्ट – क्रांतिदिन