Current Affairs of 8 August 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2015)
वर्षात नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना व्याजात सवलत मिळणार :
- सन 2014-15 या आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्तीग्रस्त जिल्ह्यात कर्जाची फेररचना करून या कर्जाचा प्रथम हप्ता भरणाऱ्यांना सहा टक्के व्याजात सवलत मिळणार आहे.
- या निर्णयामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याजदर कमी होण्यास मदत होईल शिवाय वाढत्या व्याजदरातून मुक्तता होणार आहे.
- याबाबत राज्य शासनाने 2014-15 व 2015-16 या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षांतील सहा टक्के व्याज शासनामार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच मागील व चालू वर्षातील व्याजात सहा टक्के सवलत मिळणार असून हीच सवलत 2019-20 पर्यंत पुढे चालू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
- यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन 2014-15 या वर्षातील पीक कर्जाच्या व्याजासह पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी रूपांतर करण्याबाबत यापूर्वी सहकारी व व्यापारी बँकांना निर्देश देण्यात आले आहेत.
- त्यानुसारच राज्यभरातील सहकारी व मापारी बँकांनी जून, जुलै 2015 मध्ये सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे कर्जाचे रूपांतरित कर्जावर विविध बँकांकडून सुमारे 11.5 व 12 टक्के व्याजदर आकारण्यात येत आहे.
Must Read (नक्की वाचा):
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय :
- पाकिस्तानमध्ये होणा-या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
- पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये 61 व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेचे आयोजन 30 सप्टेंबर ते 8 आक्टोंबरच्या दरम्यान करण्यात आले आहे.
- तसेच या परिषदेचे पाकिस्तानकडून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह इतर राज्यातील विधानसभा अध्यक्ष्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.
- मात्र, जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना या परिषदेचे आमंत्रण देण्यात न आल्यामुळे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
सर्वाधिक काळ सुरू असलेला वाढदिवस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद :
- जगात सर्वाधिक काळ सुरू असलेला वाढदिवस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नुकतीच एका जर्मन व्यक्तीच्या नावाची नोंद करण्यात आली.
- या व्यक्तीचे नाव स्वेन हॅग्मेईर असून त्यांनी सलग 46 तास स्वत:च्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला.
- यादरम्यान, स्वेग हे विमानातून विविध देशांमध्ये प्रवास करत आपल्या वाढदिवसाची मजा लुटत होते.
- गेल्यावर्षी 4 ऑगस्ट रोजी झालेल्या वाढदिवसाच्यावेळी स्वेग यांनी हा विक्रम केला होता.
- त्यांनी ऑकलंडमधून (न्यूझीलंड) आपल्या प्रवासाची सुरूवात केली.
- त्यानंतर ब्रिस्बेन(ऑस्ट्रेलिया), होनालुलू (हवाई) असा प्रवास करत त्यांनी या अविस्मरणीय विक्रमाची नोंद केली.
- यापूर्वी कराचीतील नर्गिस भीमजी यांच्या नावावर 1998 मध्ये 35 तास 25 मिनिट सर्वाधिक काळ वाढदिवस साजरा करण्याचा विक्रम जमा होता.
त्यावेळी नर्गीस भीमजी यांनी कराची, सिंगापूर आणि सॅनफ्रान्सिस्को असा प्रवास केला होता.
दिनविशेष :
- पितृ दिन : तैवान
- 1942 : चले जाव आंदोलन – मुंबईतील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसने चले जावचा ठराव मंजूर केला.
- 1945 : सोवियेत संघाने जपानविरुद्ध युद्ध पुकारले व मांचुरियावर आक्रमण केले.
- 1949 : भुतानच्या राष्ट्राची स्थापना.
- 1932 : दादा कोंडके, मराठी लोकप्रिय अभिनेते यांचा जन्म.