Current Affairs of 10 August 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2015)
अनाथांच्या मूलभूत हक्कांकरिता सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेला यश :
- अठरा वर्षांपुढील अनाथांच्या मूलभूत हक्कांकरिता सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेला यश मिळाले आहे.
- या मुलांकरिता सर्वंकष धोरण राबवू, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर याचिका निकाली काढण्यात आली.
- यामुळे या मुलांच्या सामाजिक पुनर्वसनातील अडचणी दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.
- घटनेच्या कलम 32 नुसार या अनाथ मुलांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण केले जावे आणि पुनर्वसन हा अनाथ मुलांचा मूलभूत अधिकार म्हणून जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
- याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे :
- वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात कोणतीच तरतूद, योजना नाही
- शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती नाही
- विविध प्रकारचे दाखले दिले जात नाहीत
- अनाथ असल्याचा दाखला त्यांना देण्याची मागणी
- त्यांच्या पुनर्वसनाचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून जाहीर करावा
गायत्री व पारिजात यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये :
- सलग 18 तास 33 मिनिटे गायन करून 222 मराठी, हिंदी गीते सादर करणाऱ्या गायत्री व पारिजात चव्हाण यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
- सोलो (वैयक्तिक) गायनाच्या 12 तासांच्या विक्रमाची यापूर्वी नोंद आहे.
Must Read (नक्की वाचा):
नासाचे ड्रोन चंद्र व मंगळावरील जागांचा शोध घेऊ शकतील:
- नासाचे अभियंते नव्या पद्धतीचे ड्रोन विकसित करीत असून, हे ड्रोन रोव्हर जिथे पोहोचत नाहीत अशा चंद्र व मंगळावरील जागांचा शोध घेऊ शकतील.
- मंगळावरील खड्डे, लघुग्रह व चंद्रावरील न पोहोचलेल्या जागांचे नमुने हे ड्रोन घेऊन येतील, असे संशोधकांनी म्हटले आहे.
- तसेच नवी यंत्रणा एक्स्ट्रीम अॅक्सेस फ्लायर्स या नावाने विकसित केली जात आहे.
- त्यांची रचनाच अशी आहे की, कायम अंधार असलेल्या, खड्ड्यांच्या कोपऱ्यात हे रोबो काम करतील.
- तसेच तिथून ते मातीचा नमुना बाहेर काढतील. मंगळाच्या मातीत खरोखरच बर्फ आहे का? याचा शोधही यातून लागू शकेल.
- हे रोबो अगदी छोटे असतील, त्यामुळे यानात एकाच वेळी अनेक रोबो ठेवता येतील व पृष्ठभागावरही एकाच वेळी अनेक रोबो सोडले जातील.
- त्यामुळे एका रोबोचे काम बंद पडले तरीही काम थांबणार नाही.
- या ड्रोनचे काम कसे होते, ते पाहण्यासाठी पृथ्वीवरील कठीण जागांवर हे ड्रोन प्रथम सोडले जातील.
- स्वॅम्प वर्कस् या प्रयोगशाळेत असे अनेक डिझाईनचे रोबो वा ड्रोन तयार करण्यात आले आहेत.
दिनविशेष :
- 1986 – लेफ्ट जनरल अरुकुमार वैद्य यांची हत्या.