Current Affairs of 8 September 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 सप्टेंबर 2017)
अनिल जगधनी पनवेल महापालिकेच्या सचिवपदी :
- खासगी कारणावरून पनवेल महापालिकेचे प्रभारी नगरसचिव गणेश साळवे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर महापालिकेचे सहायक उपायुक्त अनिल जगधनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर तत्कालीन उपायुक्त मंगेश चितळे यांच्या शिफारशीनुसार प्रशासन अधिकारी पदावर काम करणार्या गणेश साळवे यांची नियुक्ती नगरसचिव पदावर केली होती. साळवे यांच्यावर नगरसचिव पदासह अन्य चार विभागांचे काम होते. मात्र त्यांना कर्मचारी अपुरे असल्यामुळे कामाचा ताण वाढला होता.
- पालिकेच्या आतापर्यंत पार पडलेल्या महासभेत विरोधकांसह सत्ताधार्यांनी त्यांना सतत टार्गेट केले होते. या सार्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी खासगी कारण पुढे करत आयुक्तांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता.
- अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी अनिल जगधनी हे नव्याने पनवेल महानगर पालिकेच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):
ब्लू व्हेल गेमच्या ग्लोबल मास्टरमाइंडला अटक :
- जगभरातील अनेक तरुण मुलांना थेट मृत्यूच्या दारात घेऊन जाणाऱ्या ‘ब्लू व्हेल गेम’ या महाभयंकर गेमच्या ग्लोबल मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे.
- आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या विनाशकारी खेळाचा सापळा रचून तरुणाईच्या जिवाशी खेळणारी व्यक्ती ही 17 वर्षीय तरुणी आहे. अनेक तरुणांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप या रशियन तरुणीवर ठेवण्यात आलाय.
- ‘ब्लू व्हेल गेम’ खेळणाऱ्यांना एका ग्रूपचे सदस्य व्हावे लागते. ही रशियन तरुणी त्या ग्रूपची अॅडमिन होती. जी मुले या सापळ्यात अडकायची त्यांना ती धमकावत असे. आपल्या सूचना न ऐकल्यास, टास्क पूर्ण न केल्यास आई-वडिलांना, बहीण-भावाला ठार मारण्याची धमकी ती द्यायची, अशी माहिती रशियन तपास पथकाने दिली. त्यांची या तरुणीची ओळख उघड केलेली नाही.
- तसेच जाळ्यात आलेल्या मुलांना ही तरुणी 50 टास्क द्यायची. त्यातून त्यांची शारीरिक आणि मानसिक छळवणूक करायची आणि अखेर त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडायची. ही विकृती नेमकी कुठून आली आणि त्यातून तिला काय आनंद मिळायचा, हे शोधण्याचा प्रयत्न रशियन पोलीस करत आहेत.
1993 मधील खटल्याचा दूसरा टप्प्याचा निकाल जाहीर :
- मुंबईतील 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातील दुसर्या टप्प्याचा निकाल 7 सप्टेंबर रोजी तब्बल 24 वर्षांनी लागला.
- आरोपी फिरोज खान व ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या या दोघांना विशेष टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. तर पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेम व करीमुल्ला खान या दोघांना जन्मठेपेची तर रियाज अहमद सिद्दिकीला 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
- अबू सालेमसह, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, फिरोज रशीद खान, करीमुल्ला खान यांना बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी टाडा तसेच भारतीय दंडसंहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल व शस्त्रास्त्रे कायद्यांतर्गत न्यायाधीश जी.ए. सानप यांनी शिक्षा ठोठावली.
- तर रियाझ सिद्दिकीला टाडाअंतर्गत 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. कय्युमवरील आरोप सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत. त्याची एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.
- तसेच सर्व आरोपींना मिळून 26 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या स्फोटांत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना नुकसान भरपाई म्हणून ही दंडाची रक्कम देण्यात येणार आहे.
आर्थिक विकासासाठी सहिष्णुता अत्यावश्यक :
- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर समाजातील वाढती असहिष्णुता संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी अपायकारक ठरू शकते. जर आर्थिक विकास साध्य करायचा असेल, तर सहिष्णुता अत्यावश्यक असल्याची भूमिका त्यांनी एका कार्यक्रमात मांडली.
- 2015 मध्ये एका कार्यक्रमात रघुराम राजन यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांच्यावर काही जणांकडून तीव्र टीका करण्यात आली. हाच धागा पकडून त्यांनी आपण त्यावेळी मांडलेली भूमिका बरोबर असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. जे लोक सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांनी देशाच्या भल्यासाठी चार शब्द बोलले पाहिजेत. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी हे विचार महत्त्वाचेच आहेत. मी त्यावेळी हाच महत्त्वाचा मुद्दा मांडला होता, असे रघुराम राजन यांनी सांगितले.
आता देशांतर्गत विमान प्रवासासाठी सरकारी ओळखपत्र बंधनकारक :
- विमानाने देशांतर्गत प्रवास करायचा असल्यास आता तुमच्याकडे सरकारी ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
- देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट किंवा पॅन कार्ड क्रमांक यापैकी एका ओळखपत्राचा क्रमांक देणे बंधनकारक असणार आहे.
- 8 सप्टेंबर रोजी केंद्र सरकार यासंदर्भातील नियम जाहीर करणार आहे. यामध्ये मतदान ओळखपत्राचा क्रमांकही चालण्याची शक्यता असून, त्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.
- तसेच याबाबत केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले, भारतात सुरक्षेच्या दृष्टीने ‘नो फ्लाय लिस्ट’ तयार करण्यात येत असून, हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर अनेक देशांमध्ये अशा प्रकारचा नियम करण्यात आला आहे. या नवीन नियमामुळे एका व्यक्तीच्या तिकीटावर दुसरा व्यक्ती प्रवास कऱण्याच्या घटना रोखल्या जाऊ शकतील. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम मंगोलिया येथे नुकत्याच झालेल्या ‘ग्लोबल रेग्युलेटर्स’च्या बैठकीला उपस्थित होती. त्याठिकाणी हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दिनविशेष :
- 8 सप्टेंबर 1933 हा भारतीय पार्श्वगायक “आशा भोसले” यांचा जन्मदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा