Current Affairs of 7 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2017)

चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2017)

देशात पुणे विद्यापीठाचा सातवा क्रमांक :

 • टाइम्स हायर एज्युकेशन या जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणार्‍या संस्थेने शैक्षणिक वर्ष 2017-18 ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे.
 • या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकावला असून, पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे ते अव्वल ठरले आहे.
 • तसेच हे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा क्रमवारीत समावेश झालेला नाही.
 • देशात बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था पहिल्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर पहिल्या अडीचशे विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही.
 • ‘टाइम्स’ या संस्थेकडून दर वर्षी देशातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून मानांकन जाहीर केले जाते. या मानांकनाला जागतिक पातळीवर मोठे महत्त्व आहे. या वर्षी संस्थेने 77 देशांमधील विविध संस्थांचा अभ्यास करून जागतिक क्रमवारी जाहीर केली.
 • या यादीत ऑक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. तर, 27 देशांतील किमान एका विद्यापीठाचा समावेश पहिल्या 200 मध्ये आहे.
 • मात्र, भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश पहिल्या अडीचशेमध्ये होऊ शकलेला नाही. एक हजार संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील केवळ 42 संस्थांचा समावेश करण्यात आला आहे.
 • पहिल्या 300 संस्थांमध्ये व देशात पहिल्या स्थानावर बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेचा क्रमांक लागला आहे. त्यापाठोपाठ मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर आणि रुरकी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांना स्थान मिळाले आहे.

प्रकाश मेहतांच्या चौकशीला हिरवा कंदिल :

 • गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये केलेल्या कथित घोटाळ्याची चौकशी राज्याच्या लोकायुक्तांमार्फत करण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंजुरी दिली आहे.
 • मेहता हे मंत्री असल्याने नियमानुसार त्यांच्या चौकशीसाठी राज्यपालांची मंजुरी गरजेची ठरते. तशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली होती.
 • ताडदेव एमपी मिल कम्पाऊंडच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गतच्या गृहनिर्माण प्रकल्पात मेहतांनी घोटाळे केल्याचा आरोप करीत पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी आरोपांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्याचे आश्वासन दिले होते.

पानिनो भारतात 200 रेस्टॉरंट सुरू करणार :

 • पानिनो रेस्टॉरंट शृंखलेची सुरुवात डिसेंबर 2010 मध्ये नागपुरात 200 चौरस फूट जागेत झाली. सध्या नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती येथे 10 रेस्टॉरंट सुरू आहेत. विस्तारीकरणात छत्तीसगडमध्ये 12 रेस्टॉरंट सुरू करणार आहे.
 • 2020 पर्यंत कंपनीचे संपूर्ण देशात 100 रेस्टॉरंट सुरू करण्याची योजना असल्याची माहिती पानिनोचे संस्थापक संचालक अंकित अग्रवाल यांनी दिली.
 • मानेवाडा रोड, पतंजली स्टोरवर पानिनोच्या फ्रे न्चाईसी स्टोरचे उद्घाटन व्हीआयएचे उपाध्यक्ष सुरेश राठी आणि किशोर ठुठेजा यांच्या उपस्थितीत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे यांच्या हस्ते झाले. मंदार सरोदे फ्रे न्चाईसी संचालक आहेत.
 • पत्रपरिषदेत अंकित अग्रवाल म्हणाले, पानिनो आसपासच्या क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी त्यांच्या सुटीच्या दिवशी ‘झिंगालाला वेड्नस्डे’ म्हणजे पानिनोमध्ये रविवार हा आनंद साजरा करण्यासाठी नवीन कार्यक्रम सुरू करत आहे.
 • खाद्यशौकिनांमध्ये आनंद पसरविणारा पानिनोचा ‘सँडविच वर्ल्ड’ हा मध्य भारतातील प्रसिद्ध ब्रॅण्ड आहे.

मेडिकल कॅमेरा घडवणार नवी क्रांती :

 • जगभरातील असंख्य रुग्णांसाठी उपकारककिफायतशीर ठरेल अशा मेडिकल कॅमेराच्या निर्मितीचे काम लंडन येथील विद्यापीठात सुरू आहे.
 • विशेष म्हणजे एक भारतीय संशोधक ही निर्मिती करणाऱ्या गटाचे प्रमुख आहेत. केव ढालिवाल असे या संशोधकाचे नाव असून ते एडनबर्ग विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
 • या विद्यापीठातील काही संशोधक हा मेडिकल कॅमेरा निर्माण करण्याच्या कामी गुंतले असून हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होणार आहे.
 • या कॅमेराच्या निर्मितीनंतर डॉक्टरांना स्कॅन किंवा एक्स-रेसारख्या महागड्या चाचण्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही, असा दावा केला जात आहे.
 • तसेच हा कॅमेरा बहुपयोगी ठरेल, यात शंका नाही. डॉक्टर व रुग्णांना त्याचा खूप फायदा होईल, असा विश्वास ढालिवाल यांनी व्यक्त केला.

298 भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व :

 • इस्लामाबाद मध्ये गेल्या पाच वर्षांत भारतातून स्थलांतरित झालेल्या 298 नागरिकांना पाकिस्तानने नागरिकत्व दिले आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने दिली आहे.
 • सन 2012 पासून 14 एप्रिल 2017 पर्यंत एकूण 298 भारतीय स्थलांतरितांना पाकिस्तानने नागरिकत्व दिले आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने दिली आहे.
 • सत्ताधारी मुस्लिम लीगचे (नवाझ गट) नॅशनल असेब्लीचे सदस्य शकील रोहील असगर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली.
 • सन 2012 मध्ये 48, 2013 मध्ये 75, 2014 मध्ये 76, 2015 मध्ये 15, 2016 मध्ये 69 आणि 14 एप्रिल 2017 पर्यंत 15 जणांना नागरिकत्व देण्यात आले आहे.
 • पाकिस्तानचे नागरिकत्व मिळविणे ही एक अवघड प्रक्रिया आहे; पण भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान, म्यानमार येथून बेकायदा पद्धतीने आलेले स्थलांतरित पाकिस्तानमध्ये राहण्यास प्राधान्य देतात.

दिनविशेष :

 • हिंदुस्थानी संगीत परंपरेतील एक थोर प्रतिभावंत गायक “बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर” यांचा जन्म 7 सप्टेंबर 1849 मध्ये झाला.
 • भारतीय समाजसेविका ‘सेवा’ या संस्थेच्या संस्थापिका आणि मॅगसेस पुरस्कार विजेत्या “इला रमेश भट” यांचा जन्म 7 सप्टेंबर 1933 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.