Current Affairs of 8 October 2015 For MPSC Exams

 चालू घडामोडी (8 ऑक्टोंबर 2015)

 चालू घडामोडी (8 ऑक्टोंबर 2015)

रसायनशास्त्रातील “नोबेल” पारितोषिक जाहीर :

 • ‘गुणसूत्रांतील दुरुस्तीचा तांत्रिक अभ्यास’ याविषयीच्या संशोधनासाठी स्वीडनचे संशोधक थॉमस लिंडाल, अमेरिकेचे पॉल मॉड्रीच व अमेरिकन-तुर्कीश शास्त्रज्ञ अझीज Nobel Prizeसॅंसर यांना या वर्षीचा रसायनशास्त्रातील “नोबेल” पारितोषिक जाहीर झाले आहे.
 • गुणसूत्रांतील दुरुस्तीच्या तांत्रिक अभ्यासामुळे जीवित पेशींच्या कार्यपद्धतीविषयीची मूलभूत माहिती जगासमोर येण्यास मदत होणार आहे.
 • कर्करोगाच्या उपचारांसहित इतर बाबींमध्ये सुधारणा होण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे रॉयल स्विडीश ऍकॅडमी ऑफ सायन्सने म्हटले आहे.
 • लिंडाल (वय 77) हे फ्रान्सिस क्रीक इन्स्टिट्यूट या संस्थेचे प्रमुख व ब्रिटनस्थित क्‍लॅरे हॉल लॅबोरेटरीमधील कर्करोग संशोधन विभागाचे संचालक म्हणून ते काम पाहत आहेत.
 • तर मॉड्रीच हे सध्या हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक असून, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना प्रांतातील ड्युरहॅममधील ड्यूक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडीसीन येथे ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
 • तसेच नॉर्थ कॅरोलीना प्रातांतील चॅपेल हिल भागातील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये सॅंसर (69) प्राध्यापक आहेत.

गजानन पेंढारकर यांचे निधन :

 • ‘विको’ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गजानन पेंढारकर यांचे प्रदीर्घ आजारानेनिधन झाले.
 • ते 82 वर्षांचे होते.

मामि 29 ऑक्टोबरल सुरू होणार :

 • देशविदेशातील उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश असलेला ‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे.
 • यंदाचे या महोत्सवाचे हे 17 वे वर्ष आहे.
 • ‘इंडिया स्टोरी’ या भारतीय चित्रपटांच्या विभागात देशातील 29 भाषांतील 248 चित्रपट दाखल झाले आहेत.
 • यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांसाठी ‘एक्सपरिमेंटल सिनेमा’ असा विशेष विभाग करण्यात आला आहे.
 • तसेच ‘हाफ तिकीट’ या नावाने या महोत्सवात प्रथमच बालचित्रपट महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे.
 • मुख्य प्रवाहातील चित्रपट आणि लघुपट मिळून देशविदेशातील 25 चित्रपटांचा या विभागात समावेश करण्यात आला आहे.
 • तसेच यंदाच्या ‘मामि’ महोत्सवात चित्रपटांच्या दुनियेत अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.
 • यासाठी दोन विभाग निश्चित करण्यात आले आहेत. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दिग्दर्शक एमॉंस गिताई यांना देण्यात येणार आहे.
 • भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल कथा व संवादलेखक सलीम-जावेद या जोडीला, म्हणजेच सलीम खान व जावेद अख्तर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंडिया गेटजवळील स्मारकास मंजूरी :

 • स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या 22500 पेक्षा जास्त सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्लीच्या इंडिया गेटशेजारी 500 कोटी रुपये खर्चाचे एक राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि संग्रहालय स्थापन करण्याची सशस्त्र दलांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली.
 • हे राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि संग्रहालय पुढच्या पाच वर्षांत बांधून पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

इस्रायल आणि व्हिएतनामसोबत कर समझोता :

 • काळ्या पैशाला आळा घालण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी इस्रायल आणि व्हिएतनामसोबत कर समझोता आणि संबंधित प्रणालीत दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

‘पोलो’ या हॅचबॅक श्रेणीतील गाडीची विक्री थांबविण्याचे आदेश :

 • फोक्सवॅगनच्या गाड्यांचा बनाव उघड झाल्यावरही भारतात मौन बाळगणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘पोलो’ या हॅचबॅक श्रेणीतील गाडीची विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश वितरकांना दिले आहेत.
 • कंपनीच्या अन्य मॉडेलच्या तुलनेत विक्रीच्या आकडेवारीचा वेध घेतल्यास हे मॉडेल लोकप्रिय मानले जाते.
 • मात्र, याची विक्री कंपनीने थांबविली आहे. परंतु, हा निर्णय घेतानाही कोणतेही कारण कंपनीने स्पष्ट केलेली नाही.
 • चालू आर्थिक वर्षात कंपनीने एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत एकूण 20,030वाहनांची निर्मिती केली.
 • यापैकी 13,827 पोलो गाड्यांची कंपनीने भारतात विक्री केली तर सुमारे 6052 पोलो गाड्यांची निर्यात केली आहे.
 • भारतात पोलोची विक्री थांबविली असली तरी ज्या गाड्यांची निर्यात झाली आहे, त्यांच्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 • फोक्सवॅगन कंपनीचा महाराष्ट्रातही प्रकल्प असून तो पुण्यात आहे. या प्रकल्पातून वर्षाकाठी एक लाख 30 हजार वाहनांची निर्मिती कंपनी करते.

जगातील 51 कंपन्यांची यादी ‘फॉर्च्युन’ने केली प्रसिद्ध :

 • भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत उच्च दर्जाचे कृषी तंत्रज्ञान पोहोचवून त्यांच्या जीवनात क्रांती घडविणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या योगदानाची ‘फॉर्च्युन’ या प्रतिष्ठित मासिकाने दखल घेतली आहे.
 • ‘यांनी जग घडवलं’ संकल्पनेवर आधारीत जगातील 51 कंपन्यांची यादी ‘फॉर्च्युन’ने सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध केली.
 • अर्ज न मागवता हे मासिक प्रख्यात आंतरराष्ट्रीय संस्थांच्या तज्ज्ञांची मदत घेऊन औद्योगिक संस्थांच्या कामकाजाचे विश्लेषण करते.
 • एखाद्या उत्पादनामुळे ग्राहकाच्या जीवनात आमुलाग्र बदल घडला आहे का, यास महत्त्व असते.
 • सीएसव्ही (क्रीएटिंग शेअर व्हॅल्यू) ही नाविन्यपूर्ण संकल्पना ‘फॉर्च्युन’ने मांडली आहे.

नयनतारा यांच्यानंतर अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार केला परत :

 • प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांच्यानंतर ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला आहे.
 • सध्या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले असून, जगण्याचा हक्कही हिरावून घेण्यात आला आहे.
 • या साऱ्या स्थितीचा निषेध म्हणून आपण हा पुरस्कार परत करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एम्स स्थापन करण्यास सरकारने दिली मंजुरी :

 • महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल येथे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेत तीन नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
 • त्यासाठी 4949 कोटी रूपये खर्च येणार आहे.
 • दरम्यान युद्धस्मारकासाठी 500 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाली.
 • तसेच त्यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून महाराष्ट्रात नागपूर, आंध्रात मंगलागिरी व पश्चिम बंगालमध्ये कल्याणी येथे या संस्था स्थापन केल्या जाणार आहेत.
 • प्रत्येक प्रस्तावित संस्थेत 960 खाटांचे रूग्णालय असणार आहे, शिवाय तेथे शिक्षण, प्रशासन, आयुष, परिचर महाविद्यालय, रात्र निवारा, वस्तिगृह व निवासी सुविधा असतील.
 • तसेच ‘हर खेत को पानी’ या उद्देशाने ही योजना मांडली आहे, असे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

चीन आणि पाकिस्तान संरक्षण करार :

 • चीन आणि पाकिस्तान यांच्या झालेल्या संरक्षणविषयक करारानुसार चीन पाकिस्तानला आठ पाणबुडय़ांची बाधणी करून देणार असून, त्यापैकी चार पाणबुडय़ांची Kararबांधणी कराचीत करण्यात येणार आहे.
 • पाणबुडय़ांच्या बांधणीचे काम चीन आणि पाकिस्तानमध्ये एकाच वेळी सुरू होणार आहे, असे संरक्षण उत्पादनमंत्री राणा तन्वीर हुसेन यांनी सांगितले.
 • पाणबुडय़ांच्या बांधणीसाठी चीन पाकिस्तानला तंत्रज्ञान हस्तांतरित करणार आहे.
 • या कराराच्या अंमलबजावणीमुळे सध्या असलेल्या पाणबुडय़ांशी संबंधित क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.
 • पाकिस्तानच्या नौदलात असलेली अगोस्ता 90-बी ही पाणबुडी कराची जहाज बांधणी आणि अभियांत्रिकी बांधकाम कारखान्यात 2008 मध्ये बांधण्यात आली आहे.
 • तसेच ही पाणबुडी युआन वर्गवारीतील 041 प्रकारची डिझेल-विजेवरील असेल आणि ती एआयपी यंत्रणेने सुसज्ज असेल, असे सांगण्यात येत आहे.

बॉक्सर जयभगवान याला हरियाणा पोलीस निरीक्षकपदावरून निलंबित :

 • येथील आदमपूर मंडीतील एका व्यापाऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेला ऑलिम्पिक आणि अर्जुन पुरस्कारविजेता बॉक्सर जयभगवान याला हरियाणा पोलीस निरीक्षकपदावरून निलंबित करण्यात आले आहे.
 • जयभगवान याला मंगळवारी पोलीस अपअधीक्षक भगवान दास यांच्या तपास अहवालाच्या आधारे अधीक्षक सतेंदर गुप्ता यांनी निलंबित केले.
 • या प्रकरणात एक पोलीस कर्मचारीदेखील निलंबित झाला आहे.
 • वादग्रस्त बनलेला जयभगवान हा हरियाणाचा दुसरा ऑलिम्पिक बॉक्सर आहे.
 • याआधी2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकचा कांस्यविजेता विजेंदरसिंग याचे नाव पंजाबातील एका ड्रग रॅकेटमध्ये आले होते.

देबोराहने तैवान 5 पदके जिंकून रचला इतिहास :

 • भारतीय सायकलपटू देबोराहने तैवान चषकात आतंरराष्ट्रीय क्लासिक स्पर्धेत एका सुवर्णपदकासह 5 पदके जिंकून इतिहास रचला आहे.
 • 20 वर्षांच्या या सायकलपटूनने महिला एलिट वर्गात सुवर्णपदक प्राप्त केले.
 • हा विक्रम करणारी ती पहिली महिला सायकलपटू आहे.
 • तिने एक सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्य पदक मिळविले.

 • महिला एलिट स्प्रिंटमध्ये सुवर्ण जिंकणारी देबोराहने मलेशियाच्या अव्वल स्थानावर असलेल्या सायकलपटूला मागे टाकले.
 • तर, कोरियन स्पर्धेत या भारतीय खेळाडूचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.
 • फोटो फिनिशमध्ये देबोराहला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.