Current Affairs of 7 October 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 ऑक्टोंबर2015)

चालू घडामोडी (7 ऑक्टोंबर2015)

सुवर्ण ठेव योजना आणि सुवर्ण रोखे सुरू करण्याची शक्यता :

 • केंद्र सरकार पुढील महिन्यात (नोव्हेंबर) सुवर्ण ठेव योजना आणि सुवर्ण रोखे सुरू करण्याची शक्यता आहे.
 • सोन्याची मागणी आणि आयात आटोक्यात आणण्यासाठी लवकरच ही योजना सादर करू शकते.
 • “सुवर्ण ठेव योजना आणि सुवर्ण रोखे (गोल्ड बॉंड)” अश्या दोन योजना आहेत.
 • तसेच सरकार लवकरच अशोक चक्राचे चिन्ह असलेली सोन्याची नाणी विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे.
 • देशातील नागरिकांकडे विविध संस्थांकडे सुमारे 60 लाख कोटी रुपये मूल्याचा सोन्याचा साठा पडून आहे.
 • हा साठा चलनात आणण्यासाठी सरकारने सोने रोखेच्या (गोल्ड बॉण्ड) माध्यमातून नवीन योजना आणली आहे.
 • या योजनेंतर्गत एक व्यक्ती वर्षभरात जास्तीत जास्त 500 ग्रॅम गोल्ड बॉण्ड खरेदी करू शकणार आहे. ज्यावर सरकारकडून व्याज देण्यात येणार आहे, तसेच हे व्याज करमुक्त असणार आहे, अशी माहिती जेटली यांनी दिली आहे.
 • या योजनेअंतर्गत सोने जमा करणाऱ्यास 2.5 टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे.

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर :

 • विश्‍वात सापडणाऱ्या अतिलघू अशा न्यूट्रिनो कणांना वस्तुमान असते, असा शोध लावणारे जपानचे संशोधक तकाकी काजिता आणि कॅनडाचे संशोधक आर्थर बी मॅक्‌डोनाल्ड यांना या वर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
 • न्यूट्रिनो कणांना वस्तुमान असते या शोधामुळे पदार्थाच्या सगळ्यात छोट्या कणाचे कार्य कसे चालते, याची कल्पना जगाला आली आणि त्याचबरोबर जगाच्या मूलभूत प्रवृत्तीच्या अभ्यासाचे नवे दालन खुले झाले, असे रॉयल स्वीडीश ऍकॅडमी ऑफ सायन्सने म्हटले आहे.
 • पोटान्सच्या खालोखाल न्यूट्रिनो कण सर्वाधिक प्रमाणात आढळतात.
 • हजारो न्यूट्रिनो कण आपल्या शरीरातून प्रवाहित होत असतात. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबतची अत्यंत कमी माहिती आपल्याला होती.
 • तकाकी काजिता आणि आर्थर बी मॅक्‌डोनाल्ड यांनी “न्यूट्रिनो ऑस्सिलेशन”ची पद्धत शोधून काढली. त्यातून त्या कणांची अधिक माहिती मिळण्यास मदत झाली.
 • मॅक्‌डोनाल्ड हे कॅनडातील किंग्स्टनमधील क्विन्स विद्यापीठात “प्रार्टिकल फिजिक्‍स”चे प्राध्यापक आहेत.
 • नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ते म्हणाले, माझ्या संशोधनात अनेक सहकाऱ्यांचा हातभार आहे. त्यांना हा पुरस्कार समर्पित आहे.

अंबागड आणि नगरधन जीपीएसने जोडणार :

 • किल्ल्यांवर पर्यटन वाढावे, पुरातत्त्वीय महत्त्व जपले जावे, यासाठी राज्यातील 25 किल्ले ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमद्वारे (जीपीएस) जोडण्यात येणार आहेत.
 • यामध्ये तुमसरचा अंबागड आणि रामटेकच्या नगरधन किल्ल्याचा समावेश आहे.
 • जीपीएसमुळे जगात कुठेही बसून, गुगलवरून या किल्ल्यांची स्थिती आणि माहिती प्राप्त करता येणार आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज झाले ऑनलाइन :

 • महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाज आता ऑनलाइन झाले आहे.
 • विधानसभा आणि विधान परिषदेतील भाषणे प्रोसिडिंगच्या स्वरूपात एका क्लिकवर उपलब्ध होणार असून, यापुढे आमदारांना आपले प्रश्न, लक्षवेधी आदी विधिमंडळ सचिवालयाकडे देण्याची गरज भासणार नाही.
 • प्रश्न विचारण्याचीदेखील ऑनलाइन सोय झाली आहे.
 • संपूर्ण कामकाज पेपरलेस करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
 • ऑनलाइन पद्धती
 • आमदारांना लॉगिन नेम आणि पासवर्ड दिला जाईल.
 • तारांकित, अतारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चा, अल्प सूचना, अशासकीय ठराव, लक्षवेधी सूचना या गोष्टी ऑनलाइन देता येतील.
 • एखाद्या सदस्याला एकापेक्षा जास्त प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी ‘बल्क पूटअप’चा पर्याय निवडता येईल. प्रश्नांचे क्रमही आमदारांना ठरवता येतील.

‘स्मार्ट सिटी’ सल्लागारांची नावे केली जाहीर :

 • ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी निवड झालेल्या देशभरातील 98 शहरांपैकी 88 शहरांसाठी नेमलेल्या 37 सल्लागारांची नावे केंद्रीय नगरविकास मंत्रालयानेSmart City जाहीर केली.
 • यानुसार महाराष्ट्रातील 10 ‘स्मार्ट सिटीं’चे आराखडे तयार करण्यासाठी पाच सल्लागार नेमण्यात आले आहेत.
 • निवड झालेल्या प्रत्येक शहराला ‘स्मार्ट सिटी’चा संकल्प आराखडा तयार करण्यासाटी केंद्र सरकारने याआधीच दोन कोटी रुपये दिले आहेत.
 • आता हे सल्लागार त्या त्या शहरांचा विद्यमान विकास आराखडा विचारात घेऊन स्थानिक महापालिका व राज्य सरकारच्या देखरेखीखाली ‘स्मार्ट सिटी’चे आराखडे तयार करतील.
 • शहरे व त्यांचे सल्लागार :
 1. बृहन्मुंबई : अलिया कन्सल्टिंग सोल्युशन्स प्रा. लि. व जेनेसिस फिन.
 2. पुणे : मॅक्किन्सी कन्सलन्टंट्स
 3. नाशिक : क्रिसिल
 4. औरंगाबाद : नाईट फ्रँक (इं) प्रा. लि, फोर्ट्रेस इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस व पीएसपी फिनान्शियल कन्सल्टंट्स प्रा. लि.
 5. नागपूर: क्रिसिल
 6. नवी मुंबई : टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि., स्पॅटियल डिसिजन्स व महा इन्फोटेक प्रा. लि.
 7. ठाणे : क्रिसिल
 8. कल्याण-डोंबिवली : क्रिसिल
 9. सोलापूर : क्रिसिल
 10. अमरावती : क्रिसिल

भारत-पाकिस्तान सीमेचे अवकाशातून टिपलेले चित्र नासाने केले शेअर :

 • भारत-पाकिस्तान सीमेचे अवकाशातून टिपलेले एक अद्भूत छायाचित्र नासाने शेअर केले आहे. NASA
 • सीमारेषेवर सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या दिव्यांमुळे रात्रीच्या काळोखात भारत-पाक सीमारेषा या छायाचित्रात अगदी स्पष्ट उठून दिसते.
 • नासाच्या एका अंतराळवीराने निकॉन डी4 डिजिटल कॅमेरातून 28 मिलिमीटर लेन्सच्या साहाय्याने हे छायाचित्र टीपले असून ते पाकमधील सिंधू नदीपात्रापासून उत्तर दिशेकडे पाहताना टिपण्यात आले आहे.
 • छायाचित्रात भारत-पाक सीमा रेषा केशरी रंगात अतिशय ठळकपणे आपल्याला पाहायला मिळते.
 • तसेच पाकिस्तानातील कराची हे शहर या छायाचित्रात दिव्यांच्या प्रकाशामुळे उजळून निघालेले दिसते.
 • सिंधू नदीपात्र आणि हिमालयाचाही भाग या छायाचित्रात नमूद करण्यात आला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.