Current Affairs of 9 October 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 ऑक्टोंबर 2015 )

चालू घडामोडी (9 ऑक्टोंबर 2015 )

आता महिला फायटर पायलट म्हणून होणार सहभागी :

 • पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिला आता लढाऊ विमानाच्या पायलट (फायटर पायलट) म्हणून हवाई दलात लवकरच planeसहभागी होणार आहेत.
 • आजपर्यंत लढाऊ विमानांचे पायलट म्हणून पुरुषच होते.
 • पण आता महिला यात सहभागी होऊ शकतील असे हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल अरूप राहा यांनी घोषणा केली.
 • हवाई दलाच्या 83 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात ही घोषणा करण्यात आली आहे.मात्र, लढाऊ विमानाच्या पायलट म्हणून त्यांना सहभागी करून घेण्याबाबत निर्णय होऊ शकला नव्हता.
 • त्याबाबत काही कारणेही पुढे करण्यात आली होती.
 • लढाऊ सोडून हवाई दलातर्फे वाहतूक करणाऱ्या विमानांच्या आणि हेलिकॉप्टरच्या पायलट म्हणून त्या यापूर्वीच दाखल झाल्या आहेत.
 • अमेरिका, इस्राईल आणि पाकिस्तानसह अनेक देशांत महिला लढाऊ विमानाच्या पायलट आहेत.

स्वेतलाना अलेक्‍सिविच यांना यंदाचे साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर :

 • बेलारूसच्या लेखिका आणि पत्रकार स्वेतलाना अलेक्‍सिविच यांना यंदाचे साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.

  Nobel Prize

 • दुसरे महायुद्ध, सोव्हिएत महासंघाची पडझड आणि अफगाणिस्तानमधील सोव्हिएत महासंघाचे युद्ध याबाबतचे विदारक वास्तव मांडल्याबद्दल त्यांची या पारितोषिकासाठी निवड केल्याचे नोबेल पारितोषिकाच्या निवड समितीने म्हटले आहे.
 • स्वेतलाना यांचे लिखाण हे “गेल्या काळातील धाडस आणि हालअपेष्टांचे प्रतीक” असल्याचे निवड समितीने म्हटले आहे.
 • स्वेतलाना यांना 6 लाख 91 हजार पौंड इतकी पारितोषिक रक्कम मिळणार आहे.
 • स्वेतलाना अलेक्‍सिविच (वय 67) या राजकीय विश्‍लेषक असून, साहित्याचे नोबेल मिळविणाऱ्या त्या पहिल्या पत्रकार ठरल्या आहेत.
 • रशियातील चेर्नोबिल दुर्घटनेवरील “व्हॉइसेस फ्रॉम चेर्नोबिल” आणि सोव्हिएत महासंघ आणि अफगाणिस्तान यांच्या युद्धाच्या प्राथमिक अहवालावरील “झिंकी बाइज्‌” ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 • त्यांची पुस्तके 19 देशांमध्ये प्रकाशित झाली असून, पाच पुस्तकांचे इंग्रजीमध्ये रूपांतर झाले आहे.
 • त्यांनी तीन नाटकेही लिहिली असून, 21 माहितीपटासाठी पटकथा लिहिली आहे.
 • स्वेतलाना अलेक्‍सिविच यांचा जन्म 1948 मध्ये युक्रेनमधील इव्हानो फ्रॅंकिस्क या गावात झाला.
 • 1985 मध्ये त्यांनी “द अनवूमनली फेस ऑफ द वॉर” हे पहिले पुस्तक लिहिले.
 • त्यांना स्वीडनचा प्रतिष्ठेचा “पेन” हा पुरस्कारही मिळाला आहे.
 • यंदाच्या पारितोषिकासाठी जपानचे कादंबरीकार हारुकी मुराकामी आणि केनियाचे कादंबरीकार गुगी वा थिओन्गो हे स्पर्धेत होते.
 • साहित्यासाठी नोबेल मिळविणाऱ्या त्या चौदाव्या महिला ठरल्या आहेत.
 • 1901 ते 2015 या काळात 112 जणांनी साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळविले आहे.

गुगुलचे ‘दिल्ली पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऍप’ उपलब्ध :

 • शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक सुरळीत होण्यासाठी गुगुलने ‘दिल्ली पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऍप’ उपलब्ध करून दिले आहे.

  mobile app

 • सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना रस्त्यांची माहिती मिळावी या उद्देशाने हे ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 • या ऍपमध्ये गुगल मॅप बरोबरच रस्त्यांबद्दलची माहिती आहे.
 • एखाद्या प्रवाशाला इच्छितस्थळी पोचण्यासाठी या ऍपचा मोठा उपयोग होणार आहे.
 • शिवाय, इंटरनेट स्लो असले तरी हे ऍप वापरताना अडचणी येणार नाहीत, असे गुगुलने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 • दिल्ली मेट्रो, बसचे वेळापत्रक, बस स्थानके, प्रवासादरम्यानचा मार्ग या ऍपद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 • एकदा ऍप मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेट कनेक्‍शन नसतानाही या सेवेचा उपयोग करता येणार आहे.
 • मात्र, प्रवाशाला जर ताज्या घडामोडींबाबतची सेवा हवी असल्यास छोटी रक्कम भरावी लागणार आहे.

फिफाचे अधिकारी सेप ब्लाटर व मायकल प्लातिनी निलंबित :

 • फिफाच्या नैतिकता समितीने गुरुवारी फुटबॉलचे दोन दिग्गज अधिकारी सेप ब्लाटर व मायकल प्लातिनी यांना 90 दिवसांसाठी निलंबित केले.

  fifa

 • तसेच फिफाच्या स्वतंत्र नैतिकता समितीने दक्षिण कोरियाचे दिग्गज चुंग मोंग जून यांच्यावरही सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली.
 • मून यांचासुद्धा फिफा अध्यक्षपदाच्या दावेदारांमध्ये समावेश होता.
 • फिफाचे महासचिव जेरोम वाल्के यांनाही 90 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
 • तसेच त्यांना तिकीट घोटाळा प्रकरणात यापूर्वीच पदाचा राजीनामा देण्यास बजावण्यात आले होते.

आयआरएनएसएस सर्व सातही उपग्रह कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा :

 • क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह यंत्रणेतील (आयआरएनएसएस) सर्व सातही उपग्रह मार्च 2016 पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा असल्याचे ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने स्पष्ट केले.
 • केवळ भारतासभोवतालच्या सर्व देशांना नव्हे, तर संपूर्ण जगाला सिग्नल यंत्रणा पुरविण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे इस्रोचे अध्या ‘गगन’ यंत्रणा असलेले दोन उपग्रह कार्यरत असून चार दिशादर्शक उपग्रह अंतराळातून डाटा पुरवत आहेत.
 • जीसॅट-15 हा गगन पेलोड लावलेल्या नव्या उपग्रहाचे 10 नोव्हेंबर रोजी प्रक्षेपण होणार आहे.
 • सर्व सातही उपग्रह मार्च 2016 पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा आहे.
 • यामुळे देश अंतराळ क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.
 • सध्या ही यंत्रणा 1500 कि.मी. पलीकडे सिग्नल पोहोचविण्याचे काम करीत आहे.
 • तसेच आणखी काही भूभाग जोडत संपूर्ण जग व्यापणे शक्य होणार आहे.

कर्नाटक सरकार मॅगी नूडल्सवरील बंदी उठवण्याचा विचारात :

 • चार महिन्यांच्या बंदीनंतर कर्नाटक सरकार बच्चेकंपनीच्या आवडत्या मॅगी नूडल्सवरील बंदी उठवण्याचा विचार करत आहे.

  Maggi

 • लीड व मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण मर्यादेत असल्यामुळे बंदी उठवण्याचा विचार होत असल्याचे आरोग्यमंत्री यु.टी खादेर यांनी म्हटले आहे.
 • लोकांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये यासाठी फूड सेफ्टी स्टॅंडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडियाने मॅगी नूडल्यच्या निर्मीती आणि विक्रिवर बंदी घातली होती.
 • पण कर्नाटक सरकारने राज्यातील प्रयोगशाळांच्या तपासणीत हानीकारक घटक आढळले नसल्याने राज्यातील मॅगीवरील बंदी उठवण्याचा विचार करत असल्याचे सागिंतले.
 • मॅगीमध्ये शिशाचे अंश आढळून आल्याने त्यावर देशभरात बंदी घालण्यात आली आहे.

संगीतकार ए आर रेहमान यांना ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर :

 • ख्यातनाम संगीतकार ए आर रेहमान यांना ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला असून 26 ऑक्टोबररोजी सुभाष घई यांच्याहस्ते रेहमानला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
 • पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ह्रदयनाथ मंगेशकर’ हा पुरस्कार दिला जातो.
 • एक लाख रुपये व सन्माचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून आत्तापर्यंत हा पुरस्कार लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाताई यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
 • 26 ऑक्टोबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.