Current Affairs of 8 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 मार्च 2016)

चालू घडामोडी (8 मार्च 2016)

सेमी-हायस्पीड रेल्वेमार्ग महाराष्ट्रातून जाणार :

  • मुंबई-अहमदाबाद मार्गावरील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन हे भलतेच खर्चिक प्रकरण असल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात येऊ लागले आहे.
  • त्यामुळे आहे त्याच रेल्वेरुळांची-मार्गांची क्षमता वाढवून त्यावरून प्रतितास किमान 160 किलोमीटर या वेगाने ‘गतिमान’ या वेगवान गाड्या चालविण्याच्या प्रकल्पाला सरकारने गती दिली आहे.
  • तसेच यातही अशा सहापैकी तब्बल चार सेमी-हायस्पीड रेल्वेगाड्या महाराष्ट्रातून धावतील असे नियोजन रेल्वे मंत्रालयाने केले आहे.
  • सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या दिल्ली-आग्रा या सेमी हायस्पीड ट्रेनची अखेरची चाचणी पुढील काही महिन्यांत होईल व ती गाडी धावू लागेल.
  • तसेच यामुळे दिल्ली-आग्रा हे अंतर केवळ 105 मिनिटांत गाठले जाईल.
  • सहा मार्गांवरच्या हाय स्पीड रेल्वेच्या प्रकल्पास गती मिळाली आहे, या प्रस्तावित सहा मार्गांमध्ये राज्यांतील मुंबई-गोवा, मुंबई-अहमदाबाद, नागपूर-विलासपूरचेन्नई-नागपूर यांचा समावेश आहे.
  • मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सुरक्षेबाबतचा ‘फिजिबलिटी अहवाल’ रेल्वे मंडळाला मिळालाही आहे, याशिवाय म्हैसूर-चेन्नईदिल्ली-चंडीगड हे दोन मार्गही सरकारने हाय स्पीड गाड्यांसाठी प्रस्तावित केले आहेत.
  • रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत सूतोवाच केले होते; पण त्याचा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 मार्च 2016)

ऋषभदेव मूर्तीची गिनीज बुकात नोंद :

  • सिंहस्थासह विविध पौराणिक संदर्भांमुळे जागतिक ख्याती मिळालेल्या नाशिकच्या लौकिकात आणखी एका वैभवाची भर पडली.
  • मांगीतुंगी येथील जैन तीर्थस्थळाच्या ऋषभदेवांच्या 108 फुटांच्या मूर्तीची गिनीज बुकात नोंद झाली.
  • तसेच या वेळी झालेल्या समारंभात भाविकांनी मूर्तीला वैश्‍विक स्तरावर मान्यता मिळाल्याने आनंदोत्सव साजरा केला.
  • पहिल्यांदाच जैन मूर्तीची जागतिक स्तरावर नोंद झाली आहे.
  • मांगीतुंगी देवस्थानच्या आर्यिका शिरोमणी ज्ञानमती माताजी, प्रज्ञाशिरोमणी चंदनामतीजी आणि पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी यांना (ता. 6) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर यांनी त्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.
  • मांगीतुंगी येथील पहाडावर अखंड पाषाणातील 113 फूट उंचीच्या अखंड शिळेत 108 फुटांच्या भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीची नोंद झाल्याने ती जैन धर्मीयांची पहिली मूर्ती ठरली आहे.
  • जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या जैन तत्त्वज्ञानामुळे या मूर्तीचे ‘स्टॅच्यू ऑफ अहिंसा’ असे नामकरण करण्यात आले.
  • गेली 18 वर्षे त्याची तयारी सुरू होत, 2011 मध्ये प्रत्यक्ष मूर्ती उभारण्याच्या कामास प्रारंभ झाला होता.

आंतरराष्ट्रीय महिला दिन :

  • राज्य पोलीस दलात महिलांचे प्रमाण जेमतेम 8 टक्क्यांपर्यंत असले तरी (दि.8) मंगळवारचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
  • राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत अंमलदारांची धुरा त्यांच्याकडे असणार असून, हद्दीत घडणारे सर्व गुन्हे आणि ‘डायरी’ वरील महत्त्वाची नोंद त्यांच्या स्वाक्षरीनिशी होणार आहे.
  • 8 मार्चला जगभरात साजऱ्या होणाऱ्या महिला दिनाचे औचित्य साधून खात्यातील महिलांसाठी प्रोत्साहनपर हा अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे.
  • राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये आणि अधीक्षक कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात 1,076 पोलीस ठाणी आहेत.
  • 8 मार्चला महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘ठाणे अंमलदार’पदी नेमणूक करावी, असे आदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयुक्त व जिल्हा पोलीसप्रमुखांना दिलेले आहेत.
  • एकाचवेळी या सर्व ठिकाणच्या अंमलदार महिला असण्याची पोलीस दलाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असणार आहे.

जगात भारताचे स्थान 26 व्या क्रमांकावर :

  • विविध क्षेत्रात महिला उच्चपदे भूषवीत असताना भारतीय कंपन्यांत मात्र उच्चपदावरील महिलांची संख्या आजही कमी आहे.
  • कंपन्यांच्या संचालक मंडळात महिलांचे प्रमाण पाहिले, तर 7.0 टक्क्यांसह भारत 26 व्या क्रमांकावर आहे, तर नॉर्वे 40 टक्के प्रमाणासह पहिल्या स्थानी आहे.
  • माय हायरिंग क्लब डॉट कॉम आणि जॉब पोर्टल डॉट को डाट इनच्या ‘संचालक मंडळात महिला’ सर्वेक्षणानुसार भारतीय कंपन्यांतील संचालक मंडळात महिला सदस्यांची संख्या विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे.
  • भारतीय कंपन्यांच्या संचालक मंडळात महिला सदस्यांची संख्या अत्यंत कमी आहे.
  • विकसित देशांच्या एकूण सरासरीच्या तुलनेत कमी आहे, असे राजेश कुमार यांनी सांगितले.
  • तसेच या सर्वेक्षणात जगभरातील एकूण 38,313 नोंदणीकृत कंपन्याचा सहभाग घेतला, तर भारतातील 1,459 नोंदणीकृत कंपन्याचा सहभाग घेतला.

सरकारी बँकांची संख्या घटणार :

  • वाढत्या तोट्यामुळे अडचणीत आलेल्या सरकारी बँकांबाबत केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतचे संकेत दिले असून, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी दोन डझनपेक्षा जास्त असलेल्या सरकारी बँकांपैकी काहींचे विलीनीकरण केले जाण्याची शक्यता आहे.
  • बँकांच्या या विलीनीकरणाच्या प्रस्तावाचे विविध बँकर्सनीही स्वागत केले आहे.
  • तसेच त्याबरोबर अशा विलीनीकरणाची रणनीती निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती गठीत करण्याचीही सूचना केली आहे.
  • देशातील बँकिंग उद्योगातील एकूण संपत्तीपैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त हिस्सा सरकारी बँकांच्या ताब्यात आहे; पण याच बँकांकडे जवळपास 85 टक्के बुडीत कर्जही आहे, ही रक्कम जवळपास आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
  • सरकारी बँकांच्या थकीत कर्जाच्या समस्येबाबत सरकार अनेक पावले उचलत आहे, यासाठी कर्ज वसुली न्यायाधिकरण आणि वित्तीय संपत्तीचे प्रतिभूमीकरण, कायदे मजबूत करण्याबाबत विचार केला जात आहे.

’18 कॅव्हलरी’ रेजिमेंटला राष्ट्रपतींकडून सन्मान :

  • स्थापना झाल्यापासून सुमारे 174 पेक्षा अधिक वर्षांपासून राष्ट्राच्या सेवेत मोठे योगदान दिल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यातर्फे दिला जाणारा ‘स्टॅंडर्ड’ (मानाचा ध्वज) (दि.7) लष्करप्रमुख जनरल दलबिरसिंह सुहाग यांच्या हस्ते ’18 कॅव्हलरी’ रेजिमेंटला प्रदान करण्यात आला.
  • ’18 कॅव्हलरी’ रेजिमेंटची 31 जानेवारी 1842 रोजी स्थापना करण्यात आली होती.
  • भारतीय लष्कराच्या स्थापनेपासून सर्वाधिक मोहिमांमध्ये सहभागी होत मोठी कामगिरी बजावलेल्या ’18 कॅव्हलरी’ रेजिमेंटला राष्ट्रपतींकडून दिला जाणारा मानाचा ‘स्टॅंडर्ड’ देण्यात आला आहे.
  • तसेच हा ‘स्टॅंडर्ड’ राष्ट्रपतींच्या वतीने लष्करप्रमुखांनी ’18 कॅव्हलरी’ रेजिमेंटला प्रदान केला.
  • विशेष म्हणजे विद्यमान लष्करप्रमुख सुहाग हे ’18 कॅव्हलरी’ रेजिमेंटचे मानद कर्नल असून, त्यांचे वडील रिसालदार मेजर रामपाल सिंग (निवृत्त) यांनीही 1965 आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भाग घेतला होता.

दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा :

  • जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या नागपूर येथील दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
  • नागपूर येथील दीक्षाभूमी ऐतिहासिक महत्त्वाची असून, या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
  • तसेच त्यानंतर गेली 60 वर्षे हे स्थळ केवळ देशातीलच नव्हे; तर जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी पवित्र मानले जाते, या ठिकाणी उभारण्यात आलेला भव्य स्तूप पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरला आहे.
  • देशातील बोधगया या शहराव्यतिरिक्त केवळ दीक्षाभूमीवरच बोधिवृक्ष आहे.
  • वर्षभरात जवळपास 11 लाख एवढ्या मोठ्या संख्येने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटक, भाविक आणि अभ्यासक या ठिकाणी भेट देत असतात.
  • तसेच यापूर्वी दीक्षाभूमीस ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देण्यात आला होता.
  • मात्र गेल्या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्ताने दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
  • पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला, त्यास मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली.

दिनविशेष :

  • 1864 : मराठीतील जेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म.
  • 1948 : सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.
  • 1975 : आंतरराष्ट्रीय महिला दिन

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 मार्च 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.