Current Affairs of 7 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 मार्च 2016)

चालू घडामोडी (7 मार्च 2016)

सेवा क्षेत्रात एफडीआय वाढ :

  • सरकारने व्यापार सुगमता वाढविल्याने आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आल्याने सेवा क्षेत्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) एप्रिल ते डिसेंबर या अवधीत 85.5 टक्क्यांनी वाढून 4.25 अब्ज डॉलर झाली.
  • औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपी)च्या आकड्यांनुसार एप्रिल-डिसेंबर 2014 या कालावधीत एफडीआय 2.29 अब्ज डॉलरचा मिळाला होता.
  • सेवा क्षेत्रात बँकिंग, विमा, आऊटसोर्सिंग, कुरिअर, माहिती-तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
  • देशाच्या जीडीपीत सेवा क्षेत्राचे योगदान 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
  • देशात येणाऱ्या एकूण विदेशी गुंतवणुकीत या क्षेत्रातील एफडीआयचा वाटा 17 टक्के राहिला.
  • एफपीआयमधील गुंतवणूक रिझर्व्ह बँकेद्वारे व्याजदर कपात केली जाण्याच्या शक्यतेने आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाने शेअर बाजारात गेल्या चार सत्रांत 4,100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 मार्च 2016)

भारताचे सहाव्यांदा आशिया चषकावर विजय :

  • शिखर धवनच्या आक्रमक 60 धावा त्याला विराट कोहलीने 41 धांवाची दिलेली संयमी साथ आणि धोनीने केलेल्या 20 धावांच्या बळावर भारताने बांगलादेशला 8 गड्यांनी हरवत सहाव्यांदा आशिया चषकावर आपले विजय मिळविले.
  • शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशने ठेवलेल्या 121 धावांचा पाठलाग करताना भारताने अक्रमक सुरवात केली होती पहिल्या 7 षटकात 1 बाद 55 धावा केल्या होत्या.
  • भारताने बांगलादेशवर 8 गडी आणि 7 चेंडू राखून विजय मिळवला.
  • टी 20 मधील भारताचा हा सलग 7 वा विजय आहे, धोनीने आज 7 विजय मिळवत आपल्याच विक्रमाची बरोबरी केली.

नवी मुंबई विमानतळासाठी निविदा मंजुर :

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीसाठी आलेल्या चारपैकी तीन निविदांना प्रकल्प निरीक्षण आणि अंमलबजावणी समितीने मंजुरी दिली आहे.
  • जीएमआर एअरपोर्ट प्रा. लि., एमआयए इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांचा यात समावेश आहे.
  • व्हॉलूप्टास डेव्हलपर्स प्रा. लि. (हिरानंदानी समूह) आणि झुरिच एअरपोर्ट इंटरनॅशनल यांच्या चौथ्या निविदेच्या प्रस्तावास केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षा मंजुरी नाकारल्याने ही निविदा बाद झाली.
  • जीएमआर कंपनीला दिल्ली आणि हैदराबाद विमानतळाच्या विकासाचा अनुभव आहे; तर विन्सी कंपनीला जगातील 25 विमानतळ उभारणीचा अनुभव आहे.
  • एनएमआयए कंपनी सध्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पाहत आहे.
  • दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या तिन्ही निविदाधारकांना आता आर्थिक निविदा अर्ज देण्यात येईल.
  • तसेच त्यामध्ये निवड झालेल्या कंपनीला विमानतळ उभारणीचे काम देण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोगात प्रकरणे प्रलंबित :

  • गेल्या काही वर्षांत राज्य महिला आयोगातील प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली असून, सद्य:स्थितीत पाच हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत.
  • तसेच त्यांच्या निपटाऱ्याचे मोठे आव्हान असून, त्यासाठी महिला आयोगाने प्रकरणांची वर्गवारी केली आहे.
  • प्रकरणे निकाली काढण्यासाठी विभागाबरोबरच जिल्हास्तरावरसुद्धा सुनावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती नागपूर दौऱ्यावर आलेल्या राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया रहाटकर यांनी येथे दिली.
  • गंभीर स्वरूपाचे तसेच अनेक वर्षांपासून काहीही कार्यवाही न झालेली दीड हजाराहून अधिक प्रकरणे आहेत.
  • तसेच ते निकाली काढण्यासाठी विभाग व जिल्हानिहाय वर्गवारी केली आहे.

तिबेटला जोडणारा दुसरा लोहमार्ग :

  • तिबेटवर आपला हक्क सांगणाऱ्या चीनने आता तिबेट आणि चीनला जोडणारा दुसरा लोहमार्ग निर्माण करण्याची घोषणा केली आहे, या माध्यमातून तिबेटवरील आपली पकड अधिक मजबूत करण्याचा चीनचा विचार आहे.
  • तसेच, नव्या लोहमार्गाद्वारे तिबेटला लागून असलेल्या भारताच्या सीमेजवळ अधिक वेगाने सैन्य पोचविण्याचा पर्यायही चीनला उपलब्ध होणार आहे.
  • चीनमधील किंघाई शहर आणि तिबेटला जोडणारा लोहमार्ग 2006 पासून कार्यरत  आहे.
  • चीनच्या अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकासाबाबतच्या तेराव्या पंचवार्षिक योजनेच्या (2016 ते 2020) मसुद्यात तिबेटला जोडणारा दुसरा लोहमार्ग निर्माण करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
  • चीनने 2006 मध्ये किंघाई शहराला तिबेटशी जोडणारा पहिला लोहमार्ग सुरू केला होता.
  • एकूण एक हजार 956 किलोमीटर लांबीचा हा लोहमार्ग जगातील सर्वाधिक उंचीवरील लोहमार्ग असून, पठारी भागातील सर्वांत मोठा लोहमार्ग आहे.
  • पुढे या लोहमार्गाचा विस्तार करून तिबेटमधील अनेक ठिकाणे त्याला जोडण्यात आली.
  • भारत-तिबेट सीमेच्या अगदी जवळ हा लोहमार्ग पोचला आहे, त्याचबरोबर चीनने हिमालयीन भागात पाच विमानतळ उभे केले आहेत.

ईमेलचे जनक रे टॉमिल्सन यांचे निधन :

  • ईमेलचा शोध लावणारे अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन यांचं निधन झाले, ते 74 वर्षांचे होते.
  • रे टॉमिल्सन यांनी 1971 मध्ये बोस्टनमधील एका रिसर्च कंपनीत काम करत असताना पहिला ईमेल पाठवला होता. 
  • तसेच त्यानंतर ख-या अर्थाने ईमेलद्वारे संभाषणाला सुरुवात झाली.
  • रे टॉमिल्सन यांनी ही कामगिरी केली तेव्हा इंटरनेटची सुरुवादेखील झाली नव्हती, मात्र भारतात ही क्रांती घडायला पुढची 20 वर्षं जावी लागली होती.
  • 1960 सालीच टॉमिल्सन यांनी SNDMSG या प्रोग्रामद्वारे एकाच कॉम्प्युटरमध्ये एकीकडून दुसरीकडे पत्र पाठवण्याचं तंत्र विकसित केलं होते.
  • तसेच यात मेल कम्पोज करून, त्यावर पत्ता लिहून ते दुसऱ्या युजरला पाठवण्याची व्यवस्था होती.
  • टॉमिल्सन यांनी @ या साईनचा वापर केला होता जो आजपर्यंत वापरला जातो.
  • 2012 मध्ये इंटरनेट सोसायटीने इंटरनेच हॉल ऑफ फेममध्ये टॉमिल्सन यांचा समावेश केला होता.

दिनविशेष :

  • आल्बेनिया शिक्षक दिन.
  • 1771 : हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.
  • 1983 : नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 मार्च 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.