Current Affairs of 9 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 मार्च 2016)

चालू घडामोडी (9 मार्च 2016)

महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी :

  • तीन सैनिकांचा समावेश असलेली महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी येत्या 18 जून रोजी भारतीय वायुदलात सामील करण्यात येईल.
  • एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी (दि.8) ही माहिती दिली.
  • तीन महिला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी या लढाऊ भूमिकेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे राहा यांनी सांगितले.
  • ‘आम्ही 1991 मध्ये महिलांना वैमानिकाच्या रूपात सामील केले होते, परंतु ते फक्त हेलिकॉप्टर्स आणि परिवहन (विमान) यापुरतेच मर्यादित होते.
  • तसेच आता महिलांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात सामील करण्याच्या भारतीय वायुदलाच्या (आयएएफ) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  • नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित ‘वुमेन इन आर्म्ड मेडिकल कॉर्प्स’वर आयोजित संमेलनात राहा बोलत होते.
  • तसेच यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते, संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महिलांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात भारतीय वायुदलात सामील करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 मार्च 2016)

तेलंगणा सोबत सिंचन करार :

  • महाराष्ट्र आणि तेलंगण राज्यातील आंतरराज्य सिंचन प्रकल्पाबाबतचे सर्व निर्णय परस्पर सामंजस्याने घेण्यासाठी तसेच निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आंतरराज्य नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले.
  • तसेच यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत उभय राज्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
  • दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भात (दि.8) सह्याद्री अतिथीगृहात उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली.
  • तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले, आजचा दिवस दोन्ही राज्यांसाठी ऐतिहासिक आहे.
  • राज्यात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, नदीतील समुद्रात जाणारे पाणी दोन्ही राज्यांना वापरता येईल.
  • लेंडी, प्राणहिता, चवेल्ला, निम्न पैनगंगा नदीवरील राजापेट, चानखा-कोटी, पिपरड-परसोडा येथील बॅरेज तसेच भविष्यात हाती घ्यावयाच्या अन्य सिंचन प्रकल्पांसाठी हे आंतरराज्य नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले.
  • निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 1 लाख 40 हजार 818 हेक्टरलेंडी प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 26,924 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.

डॉ. ऑर्थोचे अ‍ॅम्बेसेडर जावेद अख्तर :

  • वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित अशा दिवासा हर्बल केअर कंपनीच्या डॉ. ऑर्थो या प्रसिद्ध ब्रँडचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून विख्यात लेखक व गीतकार जावेद अख्तर यांना नेमण्यात आले आहे.
  • कंपनीचे सहसंस्थापक संजीव जुनेजा यांनी नुकतीच याची घोषणा केली.
  • संजीव जुनेजा यांनी सांगितले की, कंपनीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदासाठी आम्ही एका सर्जनशील कलावंताचा शोध घेत होतो.
  • तसेच या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील आम्हाला होकार दिला आहे.

एसबीआय प्रत्येक जिल्ह्यात महिला शाखा सुरू करणार :

  • महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासोबत महिलांनी बँकिंग सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) प्रत्येक जिल्ह्यात बँकेची महिला शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • एसबीआयने विभागवार आधीच 14 शाखा सुरु केल्या आहेत.
  • महिलांना कामकाज करणे सोयीचे होईल, अशा पद्धतीने या सर्व बँकात व्यवस्था असेल.
  • महिलांसाठी कामकाजासाठीच्या दृष्टीने सुरक्षित आणि योग्य वातावरण निर्माण करण्याबाबत आम्ही दक्ष आहोत, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले.

महिला बीट मार्शल्सला ‘दामिनी’ ही नवी ओळख :

  • शहरात शाळा-महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी मुली-महिलांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या महिला बीट मार्शल्सला जागतिक महिला दिनी ‘दामिनी’ ही नवी ओळख मिळाली आहे.
  • तसेच या ‘दामिनीं’ आता शहरात लष्करी गणवेषात फिरून गुन्हेगारांवर वचक बसविणार आहेत.
  • शहरात जुलै 2015 पासून महिला बीट मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 33 बीट मार्शल असून त्यांना फिरण्यासाठी 17 दुचाकी वाहने मागील सहा महिन्यांत या मार्शल्सकडून अनेक प्रकरणे समोर आणून 55 पेक्षा अधिकगुन्हे दाखल केले आहेत.
  • प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये या मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सकाळी 8 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते रात्री 9 अशा दोन शिफ्टमध्ये या मार्शल काम करतात.
  • (दि.8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या महिला बीट मार्शल्सला मंगळवारपासून ‘दामिनी’ ही नवी ओळख मिळाली आहे.
  • ‘दामिनी बीट मार्शल्स’ म्हणून त्यांना यापुढे ओळखले जाईल.
  • तसेच शहरात फिरत असताना त्यांचे वेगळेपण जाणवावे म्हणून त्यांना लष्करी गणवेशदेण्यात आला आहे.
  • जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस आयुक्तालयामध्ये पाठक यांच्या हस्ते महिला बीट मार्शल्सचा विशेष सत्कार करण्यात आला.

दिनविशेष :

  • लेबेनॉन शिक्षक दिन
  • 1952 : पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन झाले.
  • 1959 : बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 मार्च 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.