Current Affairs of 8 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (8 डिसेंबर 2017)

राहुल गांधींची मणीशंकर अय्यर यांना सूचना :

 • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांच्या पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त टीकेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अय्यर यांना पंतप्रधान मोदींची माफी मागण्यास सांगितले आहे. मोदी दररोज काँग्रेसवर खालच्या शब्दात टीका करत असले, तरीही त्यांच्यावर त्याच शब्दात टीका करणे ही काँग्रेसची संस्कृती नसल्याचे राहुल यांनी म्हटले.
 • अय्यर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या विधानाबद्दल माफी मागितली. ‘मला खालच्या पातळीवरील टीका असे म्हणायचे होते. मात्र, माझी मातृभाषा हिंदी नसल्याने त्याचा अर्थ वेगळा निघाला असावा. माझ्या बोलण्यातून वेगळा अर्थ प्रतीत होत असल्यास त्याबद्दल मी माफी मागतो,’ असे अय्यर यांनी म्हटले.
 • ‘नीच’ या शब्दाचे विविध अर्थ होतात. मोदींच्या जातीचा उल्लेख करणे हा माझा हेतू नव्हता. याबद्दल मला पुसटशीही कल्पना नव्हती. मी वापरलेल्या शब्दाचा अर्थ जातीवाचक होत असल्यास त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आहे. मी गुजरातमध्ये पक्षाचा प्रचारदेखील करत नाही आहे. मग माझ्या विधानावरुन इतका वादंग का माजला आहे?,’ असा प्रश्न अय्यर यांनी पत्रकारांना विचारला.

भारताच्या मार्गात पुन्हा चीनचा अडथळा :

 • भारताला आण्विक पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्त्व न देण्याच्या भूमिकेवर आम्ही अजूनही ठाम असल्याचे चीनकडून स्पष्ट करण्यात आले.
 • चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी 7 डिसेंबर रोजी बीजिंगमध्ये पत्रकारांशी बोलताना याविषयीची भूमिका स्पष्ट केली.
 • काही दिवसांपूर्वीच रशियाचे उप-परराष्ट्र मंत्री सर्जी रॅबकोव्ह यांनी भारताला NSGचे सदस्यत्त्व मिळवून देण्यासाठी चीनशी चर्चा करू, असे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर चीनकडून हे वक्तव्य करण्यात आले.
 • विविध देशांच्या सरकारांमध्ये पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने चर्चा होऊन एकमताने निर्णय घेतला जाण्याच्या NSGच्या कार्यपद्धतीला चीनचा पाठिंबा असल्याचेही गेंग शुआंग यांनी सांगितले.
 • आण्विक पुरवठादार गटाचा महत्त्वपूर्ण सदस्य असलेला चीन सातत्याने भारताला या गटात घेण्याला विरोध करत आहे. भारताने अण्वस्त्रप्रसार करारावर स्वाक्षरी केली नसल्यामुळे आपला भारताच्या सदस्यत्त्वाला विरोध असल्याचे चीनचे म्हणणे आहे.
 • एनएसजीचे सदस्यत्त्व मिळवण्यासाठी गटातील 48 देशांपैकी प्रत्येक सदस्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे. या एका नियमामुळे चीनने गेल्या अनेक वर्षांपासून भारताचा NSG मधील प्रवेश रोखून धरला आहे.

सहा दशकानंतर म्हैसूर राजघराण्यात पुत्र जन्म :

 • तब्बल सहा दशकानंतर म्हैसूर संस्थानच्या यदूवंशाला पुत्रप्राप्ती झाली आहे. राणी त्रिषिका कुमारी यांच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला आहे. त्यामुळे राजमाता प्रमोदादेवीराजा यदुवीर यांचा आनंद व्दिगुणीत झाला आहे.
 • बंगळुरातील इंदिरानगरातील खासगी रुग्णालयात राणी त्रिषिका कुमारी यांनी 6 डिसेंबर रोजी रात्री 9-50 वाजता राजवंशाच्या पुत्राला जन्म दिला. राजमाता प्रमोदादेवी व राजा यदुवीर जातीने बाळाची व बाळाच्या आईची काळजी घेत आहेत. यापूर्वी 1953 मध्ये श्रीकंठदत्त नरसिंहराज वडेयर यांचा राजघराण्यात जन्म झाला होता. त्यांनंतर आजवर राजघराण्याला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. त्यामुळे राजमाता प्रमोदादेवी यांनी यदूवीर यांना राजघराण्याचा उत्तराधिकारी म्हणून दत्तक घेतले होते.
 • तसेच त्रिषिका कुमारींना पुत्रप्राप्ती झाल्याचे समजताच म्हैसूर येथील राजवाडा व म्हैसूर शहरातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राजा यदुवीर यांच्यावर राज्यभरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

औरंगाबाद विद्यापीठ अधीसभेत प्रणित उत्कर्ष पॅनेल विजयी :

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण प्रणित उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांची विजयी घौडदौड सुरू आहे. राखीव प्रवर्गातील 5 जागांचे निकाल 8 डिसेंबर रोजी सकाळपर्यंत जाहीर झाले. यातील 5 ही जागा उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना दारुण पराभव स्वीकारावा लागला.
 • उत्कर्ष पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात प्रा. सुनील मगरे, अनुसूचित जमातीमध्ये सुनील निकम, ओबीसींमध्ये सुभाष राऊत, व्हीजेएनटी गटात संजय काळबांडे आणि महिला गटात शीतल माने यांनी विद्यापीठ विकास मंचाच्या उमेदवारांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

यिन मंत्रिमंडळाची घोषणा :

 • राज्यातील यिन परिवाराची उत्सुकता शिगेला पोचलेल्या यिन मंत्रिमंडळाची घोषणा 7 डिसेंबर रोजी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली.
 • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सुरू असलेल्या ‘यिन’च्या नेतृत्व विकास परिषदेच्या समारोपाच्या अखेरच्या सत्रात ही घोषणा करण्यात आली.
 • नाशिक शहर मतदारसंघातील तेजस पाटील यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. सोलापूरचे नंदकुमार गायकवाड उपमुख्यमंत्री म्हणून निवडून आले.
 • यिनच्या नेतृत्व विकास परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री निवडीसाठी ऑनलाईन मतदान घेण्यात आले. 7 डिसेंबर रोजी परिषदेच्या अखेरच्या सत्रात मंत्रिमंडळाची घोषणा झाली. त्यानंतर सभापती आणि उपसभापति पदासाठी मतदान झाले. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानामध्ये ऋषिकेश सकनूर यांची सभापती म्हणून निवड झाली. उपसभापती म्हणून स्मितेश म्हात्रे यांची निवड घोषित करण्यात आली.

दिनविशेष :

 • 8 डिसेंबर हा दिवस जागतिक मतिमंद पुनर्वसन दिन’ म्हणून पाळला जातो.
 • पॉपय कार्टून चे निर्माते ‘ई.सी. सेगर’ यांचा 8 डिसेंबर 1894 हा जन्मदिन आहे.  
 • जगद्विख्यात भारतीय नर्तक ‘उदयशंकर’ चौधरी यांचा जन्म 8 डिसेंबर 1900 मध्ये झाला.
 • 8 डिसेंबर 1985 मध्ये सार्क परिषदेची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ

{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/D45z-_7dU1E?rel=0″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.