Current Affairs of 8 April 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 एप्रिल 2017)
64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर :
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदीतील ‘नीरजा’, तर मराठीतील ‘कासव’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- ‘कासव’ला ‘सुवर्णकमळ’ मिळाले आहे. सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला संपूर्ण कारकिर्दीत प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘रुस्तम’ चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतीच 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार ‘दंगल’मधील झायरा वासिम हिला मिळाला आहे. जम्मू-काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्याने चर्चेत आली होती.
- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्सचा पुरस्कार ‘शिवाय’ला मिळाला. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता पुरस्कार ‘दशक्रिया’साठी मनोज जोशीने पटकावला.
- व्हेंटिलेटरला सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंगचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार ‘धनक’ला मिळाला आहे.
Must Read (नक्की वाचा):
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौर्यावर :
- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी 7 एप्रिल रोजी येथे आगमन झाले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर जाऊ न त्यांचे स्वागत केले. भारत दौऱ्यादरम्यान त्या पंतप्रधान मोदींशी विविध मुद्यांवर चर्चा करतील.
- मोदी पंतप्रधान बनल्यानंतर हसीना यांचा हा पहिला भारत दौरा आहे. हसीनांच्या दौऱ्यात दोन्ही देशांत नागरी अणुसहकार्य आणि संरक्षणासह विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रात किमान 25 करार अपेक्षित आहेत.
- तथापि, तीस्ता पाणीवाटपावर करार होण्याची शक्यता कमी आहे. मोदी आणि हसीना सविस्तर चर्चा करतील.
- भारत लष्करी पुरवठ्यासाठी बांगलादेशला 50 कोटी डॉलरचे कर्ज सुविधा देण्याच्या तयारीत आहे.
‘मातीतली कुस्ती’ या लघुपटाला रजत कमल पुरस्कार :
- 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची 7 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘सर्वोत्तम शोध, साहस फिल्म कॅटेगरी’मध्ये यवतमाळच्या प्रांतिक विवेक देशमुख या युवकाने तयार केलेल्या ‘मातीतली कुस्ती’ या लघुपटाला ‘रजत कमल’ पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच निर्माता व दिग्दर्शकाला प्रत्येकी 50 हजार रुपये रोख पारितोषिक जाहीर झाले आहे.
- प्रांतिकने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संप्रेषण विभागात प्रकल्प म्हणून हा लघुपट केला.
- 234 वर्षांची प्रचंड मोठी परंपरा असलेल्या पुण्याच्या चिंचेच्या तालमीची कथावस्तू म्हणून त्याने निवड केली.
गोव्यातील पर्यटन विभागासाठी विशेष पथके स्थापन :
- गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर होणारा शेजारी कर्नाटक राज्यातील लमाणांचा उपद्रव कमी करण्यासाठी पर्यटन विभागाने विशेष पथके स्थापन केली आहेत.
- तसेच याविषयी गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर म्हणाले, ‘ही विशेष पथके पोलिसांना सोबत घेऊन किनाऱ्यांवरून लमाणांना हटविणार आहेत. किनाऱ्यांवर हे लमाण उपद्रव देत आहेत. तसेच, किनाऱ्यांवर बेकायदा वस्तूंची विक्री करीत आहेत. ते गटाने फिरत असून, विशेषत: विदेशी पर्यटकांना त्रास देत आहेत. या लमाणांना किनाऱ्यावरून न हटविल्यास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.’
दिनविशेष :
- 8 एप्रिल 1857 हा हुतात्मा मंगल पांडे यांचा स्मृतीदिन आहे.
- भारत आणि पाकिस्तान यांच्या लियाकत-नेहरू करारावर 8 एप्रिल 1950 मध्ये स्वाक्षर्या झाल्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा