Current Affairs of 10 April 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (10 एप्रिल 2017)
भारतीय वंशज महिलेला ‘बिझनेस वूमन ऑफ द ईयर’:
- ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीय वंशाच्या महिला शिक्षणतज्ज्ञाला ‘एशियन बिझनेस वूमन ऑफ द ईयर’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- आशा खेमका (वय 65) असे या शिक्षिकेचे नाव असून, त्यांचा आज येथील एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
- आशा खेमका या त्यांच्या विवाहानंतर ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाल्या. त्या वेळी इंग्रजी भाषेचे ज्ञान नसतानाही त्यांनी जिद्दीने ही भाषा आत्मसात करत आज त्या वेस्ट नॉटिंगहॅमशायर महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
- तसेच शिक्षणक्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
भारताकडून बांगलादेशला अर्थसाह्य :
- बांगलादेशमधील विविध विकासकामांसाठी भारताने त्या देशास 4.5 अब्ज डॉलरचे अर्थसाह्य देऊ केले आहे. याद्वारे बांगलादेशमधील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.
- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल रोजी 22 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
- पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘बांगलादेशचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले आहेत. भारत हा बांगलादेशचा विकासातील विश्वासू साथीदार आहे. बांगलादेशमध्ये माहिती-तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, अवकाश विज्ञान आणि अणुउर्जेच्या क्षेत्रात भारत सहकार्य करू इच्छितो.’
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसिना या दोघांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून कोलकाता ते ढाका या बससेवेचेही उद्घाटन केले. गेल्या सात वर्षांत प्रथमच बांगलादेशच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर आल्या आहेत.
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय :
- एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात धमाकेदार कामगिरी करताना भारताच्या महिला हॉकी संघाने बेलारुसचा 4-0 असा पराभव करून हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राची अंतिम फेरी गाठली.
- अंतिम सामन्यात भारताचा सामना चिलीविरुद्ध होईल. चिलीने उरुग्वेला 2-1 असा धक्का देत आगेकूच केली आहे.
- तसेच या विजयासह भारताच्या महिलांनी जून-जुलै महिन्यात होणाऱ्या महिला हॉकी विश्व लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील जागाही निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, ही स्पर्धा महिला विश्वचषक 2018 स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धाही असेल.
‘इंडिगो’ विमानाकडून नवा विक्रम प्रस्थापित :
- ‘इंडिगो’ एकाच दिवसात 900 उड्डाणे करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 7 एप्रिल रोजी ‘इंडिगो’च्या विमानांनी एकाच दिवसात 900 उड्डाणे पूर्ण केली आहेत.
- भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील इतिहासात एकाच कंपनीने एका दिवसात 900 उड्डाणे करण्याचा विक्रम आहे.
- ‘आम्ही एका दिवसात 900 उड्डाणे पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. आता आमचा संघ एका दिवसात 1000 उड्डाण करण्याचा मैलाचा दगड पार करण्यास उत्सुक झाला आहे,’ असे ‘इंडिगो’चे अध्यक्ष आदित्य घोष यांनी सांगितले.
- कंपनीने नुकतेच उन्हाळ्याचे वेळापत्रक जाहीर केले असून देशांतर्गत 35 तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सात नवीन मार्गांवर उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनविशेष :
- स्वामी दयानंद यांनी 10 एप्रिल 1875 रोजी ‘आर्य समाजाची स्थापना’ केली.
- 10 एप्रिल 1912 मध्ये जगप्रसिद्ध ‘टायटॅनिक’ बोटीचा पहिला प्रवास सुरु.
- भारताचा पहिला उपग्रह ‘इन्सॅट वन’ याचे 10 एप्रिल 1982 रोजी अंतराळात उड्डाण घेतली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा