Current Affairs of 7 April 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 एप्रिल 2017)
जागतिक क्रमवारीत सिंधू दुसऱ्या क्रमांकावर :
- ऑलिंपिक रौप्य पदक विजेती भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तिच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम रँकिंग आहे.
- रिओ ऑलिंपिक स्पर्धेत सिंधूला रौप्य पदक मिळाले होते. त्यानंतर तिच्या कामगिरीत खूप सुधारणा झाली असून, तिने नुकतेच इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचेही विजेतेपद मिळविले होते.
- रिओ ऑलिंपिकमध्ये तिला पराभूत करणाऱ्या कॅरोलिन मरीनचा पराभव तिने केला होता. मात्र, मलेशिया ओपन स्पर्धेत तिला पहिल्याच फेरीतून बाहेर व्हावे लागले होते.
- तसेच या मोसमातील कामगिरीच्या आधारावर सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱे स्थान मिळविले आहे.
- भारताची फुलराणी अशी ओळख असलेल्या साईना नेहवालने 2015 मध्ये क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले होते.
Must Read (नक्की वाचा):
स्मार्ट सिटी योजनेचा कोरियन कंपनीशी करार :
- कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेने कोरिया लॅण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीशी सामंजस्य करार केला. ही कंपनी महापालिकेस स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता तांत्रिक व आर्थिक सहाय्य पुरवणार आहे.
- कोरिया सरकार चार हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देणार आहे. यामुळे प्रकल्प अधिक गतीमान होणार आहे.
- तसेच यावेळी कंपनीचे पदाधिकारी कॅन कून फाँग, हु से चँग, पार्थ ज्यून सिमो, सॉन्ग जी सॉन्ग यांच्यासह महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन आणि कोरियन कंपनीचे सल्लागार विवेक विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगातील सर्वांत सुंदर स्त्रियांमध्ये प्रियांका दुसर्या क्रमांकावर :
- प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाय रोवले. येथे नाव कमावून आपला एक वेगळा चाहता वर्ग तयार झाल्यावर त्यावर समाधान न मानता तिने हॉलिवूडमध्ये यशस्वी ‘एंट्री’ केली.
- जगातील सर्वांत सुंदर स्त्रियांच्या यादीत तिने दुसऱ्या क्रमांकाला गवसणी घातली आहे.
- बझनेट या संकेतस्थळाने एका सर्वेक्षणामध्ये लोकांची मते जाणून घेतली. त्यामध्ये सर्वाधिक मते मिळालेल्यांमध्ये प्रियांका आघाडीवर राहिली.
- अमेरिकन गायिका आणि गीतकार बेयॉन्स हिने प्रथम क्रमांक पटकावून ती जगातील सर्वांत सुंदर महिला ठरली आहे. ‘व्हिक्टोरिया सिक्रेट’ची मॉडेल टेलर हिल ही तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- ‘ब्युटी अँड द बीस्ट’मधील अभिनेत्री एमा वॉट्सन ही चौथ्या क्रमांकावर, तर ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’मधील स्टार डॅकोटा जॉन्सन ही पाचवी सर्वांत सुंदर स्त्री ठरली आहे.
राज्यात जलयुक्त शिवारसाठी स्वतंत्र प्राधिकरण :
- जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.
- तसेच यावर्षी जलयुक्त शिवार योजनेतील निधी अखर्चित राहिला आहे. याबाबत भाजपाचे परिणय फुके यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.
- पाऊस आणि निवडणूक आचारसंहितेमुळे काही कामे उशिराने सुरू झाली. एकूण 21 कोटी 14 लाख रुपयांचा निधी अखर्चिक राहिला होता; मात्र तो मार्चअखेरीला खर्च करण्यात आला आहे.
- जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गेल्या वर्षी 20,015 कामे हाती घेण्यातआली. त्यापैकी 13,582 कामे पूर्ण झाली आहेत.
दिनविशेष :
- 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतात.
- 7 एप्रिल 1920 हा भारताचे प्रसिध्द सतारवादक ‘पंडित रविशंकर’ यांचा जन्मदिन आहे.
- आय.बी.एम. तर्फे सिस्टम/360 ची घोषणा 7 एप्रिल 1964 मध्ये करण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा