Current Affairs of 6 April 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (6 एप्रिल 2017)

चालू घडामोडी (6 एप्रिल 2017)

विराट कोहली 2016 मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू :

 • क्रिकेटमध्ये 2016 हे वर्ष सर्वार्थाने गाजवले ते भारताचा कर्णधार विराट कोहलीने. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विराटने धावांचा पाऊस पाडला. त्याबरोबरचा आपल्या कुशल नेतृत्वाखाली भारताला कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानीही पोहोचवले.
 • आता विराटच्या या कामगिरीची दखल क्रिकेटमधील बायबल अशी ओळख असलेल्या विस्डेनने घेतली असून, विराटची 2016 मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे.
 • तसेच असा मान पटकावणार विराट हा भारताचा वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरनंतरचा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 एप्रिल 2017)

सावित्रीबाई फुले स्त्री गौरव पुरस्कार जाहीर :

 • मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ संस्थेचा सुनीता देवधर पुरस्कृत ‘सावित्रीबाई फुले स्त्री गौरव’ पुरस्कार कामाठीपुऱ्यातील स्त्रियांचा आधार असलेल्या प्रीती पाटकर यांना जाहीर झाला असून, हा पुरस्कार सोहळा 8 एप्रिल रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे संपन्न होणार आहे.
 • निवृत्त अतिरिक्त पोलीस उपायुक्त शिरीष इनामदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

भारतात तज्ज्ञांना ‘इंटेल’ देणार ‘एआय’ प्रशिक्षण :

 • असे म्हणतात, की ‘डेटा’ म्हणजे नव्या युगातील ‘तेल’ आहे. तेलाच्या वापरानंतर जगाची अर्थव्यवस्था बदलली. नवे विकसित देश उदयाला आले. नव्या युगात ‘डेटा’चे व्यवस्थापन असेच बदल घडवेल, असे मानले जात आहे.
 • नव्या युगातील ‘डेटा’ नावाच्या तेलाची सर्वात मोठी ‘शुद्धिकरण’ फॅक्टरी म्हणून ‘इंटेल कॉर्पोरेशन’ कंपनीकडे पाहिले जाते.
 • आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ची पहाट होण्याचा सध्याचा काळ आहे. येत्या पाच वर्षांत, 2022 पर्यंत ‘एआय’ची उलाढाल तब्बल 1,250 अब्ज रूपयांवर पोहोचणार आहे.
 • उगवत्या ‘एआय’ क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी ‘इंटेल’ कंपनी पुढे सरसावली आहे.
 • भारत आणि चीनमधील कुशल मनुष्यबळाचा वापर करून ‘एआय’चा विकास करणे आणि ‘एआय’चा वापर या दोन्ही विशाल देशांमध्ये जास्तीत जास्त वाढविणे यासाठी कंपनी काम करणार आहे.
 • भारतात बंगळूरमधील ‘इंटेल इंडिया’च्या ऑफिसमध्ये 5 एप्रिल हा जगातील पहिला ‘एआय दिन’ साजरा झाला. भारतातील डेव्हलपर्स समुदायाला नव्या प्रशिक्षण कार्यक्रमात सामावून घेण्यासाठी ‘इंटेल’ने 15,000 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना ‘एआय’चे मुलभूत आणि प्रगत शिक्षण देण्याची घोषणा यानिमित्ताने केली.

एक दिवासीय क्रिकेट क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर :

 • भारतीय संघ अडीच महिन्यांपासून वन डे सामने खेळला नसला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नव्या क्रमवारीत चौथे स्थान टिकविण्यात यशस्वी ठरला.
 • विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे 112 गुण आहेत. द.आफ्रिका 119 गुणांसह अव्वल स्थानावर कायम असून, दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे 118 आणि तिसऱ्या स्थानावरील न्यूझीलंडचे 113 गुण आहेत.
 • भारताने जानेवारीत इंग्लंडविरुद्ध वन डे मालिका खेळली होती. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात 7 एप्रिल पासून तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला प्रारंभ होत आहे.
 • 2019 च्या आयसीसी विश्वचषकासाठी थेट पात्रता गाठता यावी, यादृष्टीने उभय संघ चढाओढ करतील. 1975 आणि 1979 चा विश्वविजेता विंडीज सध्या 84 गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
 • तसेच आठव्या स्थानावर असलेल्या पाकचे त्यांच्या तुलनेत पाच गुण जास्त आहेत. बांगला देश 92 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

दिनविशेष :

 • दांडी यात्रा 6 एप्रिल 1930 मध्ये समाप्त झाली.
 • 6 एप्रिल 1955 हा थोर समर्थ संत ‘विनायक महाराज मसुरकर’ यांचा स्मृतीदिन आहे.
 • भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांचा जन्म 6 एप्रिल 1956 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 एप्रिल 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.