Current Affairs of 5 April 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (5 एप्रिल 2017)
गुजरातच्या पोलिस महासंचालकपदी प्रथमच महिला :
- गुजरातचे पोलिस महासंचालक पी.पी. पांडे यांना राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी गीता जोहरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे गुजरातच्या पोलिस महासंचालकपदी प्रथमच महिलेची निवड झाली आहे.
- बहुचर्चित सोहराबुद्दीन-तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणात जोहरी आरोपी होत्या. मात्र, राज्य सरकारने जोहरी यांना फिर्यादी करण्याची परवानगी नाकारल्याने सीबीआय न्यायालयाने मार्च 2015 मध्ये त्यांना निर्दोष ठरविले.
- गीता जोहरी या भारतीय पोलिस सेवेच्या 1982 सालच्या तुकडीतील आहेत. पांडे यांच्याकडे एप्रिल 2016 पासून प्रभारी पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी होती.
- जून 2004 मधील एका बनावट चकमक प्रकरणात पांडेंवर आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणानंतर फेब्रुवारी 2015 मध्ये पांडे यांच्याकडे भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):
सायबर सुरक्षेसाठी भारतीय लष्कराचे नवे सॉफ्टवेअर :
- आपले संपर्क आणि माहितीचे नेटवर्क यांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय लष्कर एक स्वदेशी सॉफ्टवेअर विकसित करीत आहे. विदेशी हेरांपासून संरक्षण करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग होणार आहे.
- भारत ऑपरेटिंग सिस्टम सोल्युशन्स (BOSS) असे या सॉफ्टवेअरचे नाव आहे. सायबर सुरक्षा वाढविण्यावर भर द्यावा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह आहे.
- तसेक्ग तिन्ही सेनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी सायबर क्षेत्रातील धोक्यांविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे.
- लष्कराच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित उत्तर विभागाने (नॉर्दर्न कमांड) स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टमचे लष्कराच्या गरजेनुसार मूल्यांकन सुरू केले.
- “नॉर्दर्न कमांड आपल्या मुख्यालयात BOSS चे मूल्यांकन करीत आहे.’ विदेशी सॉफ्टवेअरला पर्याय म्हणून हे सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. येथे तैनात फौजेच्या सुरक्षासंबंधी अत्यंत महत्त्वाच्या माहितीला अधिक संरक्षण देण्यासाठी हा उपयुक्त पर्याय ठरणार आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूशन रॅंकिंगमध्ये पुणे विद्यापीठाला स्थान :
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्तेचा झेंडा देशात फडकला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील विद्यापीठांच्या राष्ट्रीय मानांकनाच्या (नॅशनल इन्स्टिट्यूशन रॅंकिंग फ्रेमवर्क) श्रेणीमध्ये शंभर विद्यापीठांच्या क्रमवारीत या विद्यापीठाला दहावे स्थान मिळाले आहे.
- तसेच या श्रेणीत बंगळूरचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स प्रथम क्रमांकावर, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दुसरे आणि बनारस हिंदू विद्यापीठ तिसऱ्या स्थानावर आहे.
- राज्यातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये श्रेणीच्या क्रमवारीत एकही पारंपरिक विद्यापीठ नाही, त्यामुळे पुणे विद्यापीठ राज्यात अव्वल ठरले आहे. अभिमत विद्यापीठांनी मात्र या यादीत चांगले स्थान मिळविले आहे.
कॅरोलिन मरिनचा पराभव करत पी.व्ही. सिंधूला विजेतेपद :
- भारतीय बॅडमिंटनची सम्राज्ञी पी.व्ही. सिंधूने दिल्ली जिंकली आहे. शरीरवेधी स्मॅशचा धडाका करीत सिंधूने ऑलिंपिकविजेत्या कॅरोलिन मरिनला तिच्या क्षमतेचा पूर्ण कस बघण्यास भाग पाडले, पण अखेर ऑलिंपिक विजेती मरिन हिला सलग दुसऱ्यांदा सिंधूसमोर शरणागती पत्करावी लागली.
- 2 एप्रिल रोजी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूने ऑलिंपिक विजेतीचा प्रतिकार 21-19, 21-16 असा सहज मोडून काढला.
- सिंधूने पाऊणतास चाललेली ही लढत जिंकल्यावर गोपीचंद यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य मरिनला रोखण्याची योजना यशस्वी ठरली हेच दाखवणारे होते.
- सिंधूने लढत संपल्यावर प्रथम गोपीचंद यांच्याकडे जाऊन जणू त्यांचे आभार मानले आणि त्यानंतरच मरिनशी हस्तांदोलन केले.
दिनविशेष :
- सन 1663 मध्ये पुण्याच्या लाल महालावर अचानकपणे केलेल्या हल्ल्यात शिवाजीमहाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
- भारत स्काऊट गाईडची स्थापना 5 एप्रिल 1949 रोजी झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा