Current Affairs of 1 April 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 एप्रिल 2017)

चालू घडामोडी (1 एप्रिल 2017)

स्टेट बँकांचे विलीनीकरण होणार :

  • स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) 1 एप्रिल रोजी पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण होणार आहे.
  • एसबीआयमध्ये विलीन होणाऱ्या बँकांत स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि स्टेट बँक ऑफ पतियाळा यांचा समावेश आहे.
  • विलीनीकरणात या सर्व बँकांची सर्व प्रकारची मालमत्ता एसबीआयकडे हस्तांतरित होईल. या बँकांचे कर्मचारी आणि ग्राहकही एसबीआयकडे हस्तांतरित होतील. विलीनीकरण होत असलेल्या या बँका आपापल्या राज्यात महत्त्वाच्या आहेत.
  • स्टेट बँक ऑफ हैदराबादचा महाराष्ट्र आणि तेलंगणात मोठा पसारा आहे. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर केरळातील प्रमुख बँक आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूरचे राजस्थानात तर स्टेट बँक ऑफ पतियाळाचे पंजाबात मोठे जाळे आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 मार्च 2017)

माजी सैनिकांना पेन्शनसाठी आधार आवश्‍यक :

  • माजी सैनिकांना पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार क्रमांक आवश्‍यक असल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली.
  • माजी सैनिक कल्याण विभागाने 3 मार्च रोजी एक अधिसूचना काढून माजी सैनिकांना आधार कार्डचे पुरावे सादर करावेत, अशा सूचना केल्या असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे.
  • पेन्शनचा लाभ घेणारे अथवा घेऊ इच्छिणाऱ्यांपैकी ज्यांनी अद्यापी आधार नोंदणी केलेली नाही. अशांनी 30 जून 2017 पर्यंत ती करावी, असेही भामरे यांनी सांगितले.

शरद पवार यांना पद्मविभूषण प्रदान :

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  • विराट कोहली, अनुराधा पौडवाल, स्वामी निरंजनानंद सरस्वती, शेफ संजीव कपूर, कैलाश खेर यांच्यासारख्या दिग्गजांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा :

  • उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असून त्यांना व्हीव्हीआयपी व्यक्तींना असलेली सशस्त्र सुरक्षा रक्षकांची झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
  • देशातील एकूण 450 अतिमहत्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येते.
  • गुप्तचर विभागाने आदित्यनाथ यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर संभाव्य धोका निदर्शनास आणून दिल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
  • झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत आदित्यनाथ यांच्यासोबत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे 25-28 सशस्त्र कमांडो (सीआयएसएफ) कायम सोबत असतील. ते देशभरात जेथे जातील, तेथे हे कमांडो त्यांच्यासोबत असतील.
  • ‘मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून आता त्यांना सतत, ते देशात जेथे जातील तेथे सीआयएसएफचे कमांडो सक्षम सुरक्षा पुरवतील.

दिनविशेष :

  • 1 एप्रिल 1882 मध्ये पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.
  • भारतीय विमानदलाची स्थापना 1 एप्रिल 1933 मध्ये झाली.
  • भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली.
  • 1 एप्रिल 1969 मध्ये भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.
  • गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली 1 एप्रिल 2004 मध्ये सुरू केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 एप्रिल 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.