Current Affairs of 29 March 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 मार्च 2017)

चालू घडामोडी (29 मार्च 2017)

निमलष्करी दलाला हुतात्मा दर्जा लागू :

  • दंगल, निदर्शने अशा प्रकारची कोणतीही बिकट परिस्थिती हाताळताना निमलष्करी दलातील एखाद्या जवानाला मृत्यू आल्यास त्याला “हुतात्मा” असे घोषित केले जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत दिली.
  • गेल्या चार वर्षांत विविध ठिकाणी निदर्शने व दंगलीसारख्या घटना घडल्या. यात एकूण 3436 जवान जखमी झाले आहेत, तर 2013-15 या काळात अशा घटनांमध्ये 12 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, 4780 कर्मचारी जखमी झाल्याचे अहीर यांनी सांगितले.
  • विविध ठिकाणी तैनात असलेल्या जवानांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक शस्त्रे देण्यात आली असून, त्यांच्या सुरक्षेस सरकारचा प्राधान्यक्रम राहील.  
  • देशातील महत्त्वाची विमानतळे दहशतवाद्यांच्या रडारावर असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली असून, या पार्श्वभूमीवर संभाव्य हल्ले रोखता यावेत, यासाठी गृह मंत्रालयाकडून विमानतळांवरील सुरक्षेचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 मार्च 2017)

विख्यात घटनातज्ज्ञ अंध्यारुजिना कालवश :

  • सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील, विख्यात विधिज्ञ आणि घटनातज्ज्ञ थेम्प्टन रुस्तमजी (टी.आर.) अंध्यारुजिना यांचे 28 मार्च रोजी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या सरकारच्या काळात सन 1996 ते 1998 पर्यंत अंध्यारुजिना भारताचे सॉलिसिटर जनरल होते. त्याआधी सन 1993 ते 1995 या काळात ते महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल होते.
  • तसेच त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून सर चार्लस सार्जंट शिष्यवृत्ती व विष्णू धुरंधर सुवर्णपदकासह कायद्याची पदवी प्राप्त केली. यानंतर अ.भा. सेवा परीक्षा दिली व त्यात तिसरे आल्याने त्यांची भारतीय विदेश सेवेसाठी निवड झाली. परंतु, त्यांनी वकिलीच करण्याचे ठरविले.
  • मुंबई विद्यापीठ, भारतातील अनेक राष्ट्रीय विधी विद्यापीठ, पुण्याचे सिम्बॉयसिस लॉ कॉलेज आणि इंग्लंडमधील बेलफास्ट विद्यापीठातही त्यांनी कायद्याचे अध्यापन केले. त्यांनी अनेक महत्वाच्या सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांच्याच समितीने केलेल्या शिफारशीनुसार आताचा ‘सरफासी’ कायदा केला गेला.

डोनाल्ड ट्रम्प यांचा एच 1बी सुधारणा विधेयकास पाठिंबा :

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एच 1बी व्हिसा सुधारणा विधेयकास पाठिंबा असून या विधेयकामुळे एच 1बी व्हिसा असलेल्या नोकरदारांच्या वेतनात भरघोस वाढ होण्याचा विश्वास त्यांना वाटत असल्याचे अमेरिकी काँग्रेस प्रतिनिधींनी म्हटले आहे.
  • काँग्रेस प्रतिनिधी डॅरेल इसा यांनी एच 1बी व्हिसा प्रणाली विकसित करण्यासाठी जगभरातील तज्ज्ञांची मदत घेण्यात येत असल्याचे या वेळी स्पष्ट केले.
  • अध्यक्षांचा एच 1बी व्हिसा सुधारणा विधेयकास पाठिंबा असून या मुद्दय़ावर आम्हाला सिनेटमध्येही भक्कम पाठिंबा मिळणार आहे.
  • भारतातील कंपन्या या व्हिसा प्रणालीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही इसा यांनी केला आहे.
  • एच 1बी व्हिसामध्ये काही सुधारणांमुळे भारताची चिंता वाढली आहे. या विधेयकाचा भारताला लक्ष्य करण्याचा हेतू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता झारखंडमध्येही अवैध गौ हत्याला बंदी :

  • उत्तर प्रदेश पाठोपाठ आता झारखंड सरकारदेखील अवैध कत्तलखान्यांविरोधात कारवाई करणार आहे. अवैध कत्तलखाने 72 तासांमध्ये बंद करण्यात यावेत, असा आदेश झारखंड सरकारकडून देण्यात आला आहे.
  • 27 मार्च रोजी झारखंड सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला. विशेष म्हणजे झारखंड सरकारकडे राज्यातील वैध कत्तलखान्यांबद्दलची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
  • झारखंड सरकारकडून राज्यातील सर्व उपायुक्त, वरिष्ठ पोलीस अधिक्षक आणि पोलीस अधिक्षकांना त्यांच्या अखत्यारित येणारे अवैध कत्तलखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • हिंदुत्ववादी संघटनांनी अवैध कत्तलखान्यांवर कारवाई केली जावी, यासाठी आंदोलन केले होते. राज्यातील कत्तलखान्यांवर बंदी घातली जावी आणि गो-तस्करीला आळा बसावा, यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी या संघटनांकडून करण्यात आली होती.
  • अवैध कत्तलखान्यांवर कारवाई न केल्यास 10 एप्रिलपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या संघटनांकडून सरकारला देण्यात आला होता. त्यामुळे सरकारने अवैध कत्तलखान्यांविरोधात कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.

दिनविशेष :

  • 29 मार्च हा राष्ट्रीय नौका दिवस म्हणून साजरा करतात.
  • ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीने 29 मार्च 1849 रोजी पंजाब खालसा केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 एप्रिल 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.